मोकाट पशुपालकांवर कारवाईची गरज
बेवारस गोमातेवर झाला विधीवत अंत्यसंस्कार!
तळोदा शहरातील ख्वाजा नाईक परिसरात मयत अवस्थेत बेवारस पडलेल्या गोमातेवर
श्रीराम सोशल ग्रुपच्या पदाधिकार्यांनी विधीवत अुत्यसंस्कार केला. श्रीराम सोशल ग्रुपच्या तरुणांच्या या सामाजिक कामाचे शहरातून कौतुक करण्यात येत आहे. तळोदा शहरातील ख्वाजा नाईक चौकात सकाळच्या वेळी एक गाय मयत अवस्थेत बेवारस स्थितीत पडली होती. याची माहिती शहरातील सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या श्रीराम सोशल ग्रुपच्या तरुणांना मिळाली. ग्रुपच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक डॉक्टरांना पाचारण केले. तपासणी केली असता गाय मयत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे तरुणांनी गाईवर विधीवत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. मयत गोमातेला ग्रुपच्या सदस्यांनी अँपेरिक्षेच्या सहाय्याने शहादा रस्तावरील मोकाट ग्राऊंडमध्ये आणले. याठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करण्यात आला. गाईला पंचामृताने स्नान घालून फुलहार व पुष्पगुच्छ अर्पण करून विधिवत पध्दतीने अंतसंस्कार करण्यात आले. गोमातेच्या अंत्यसंकारावेळी परिसरातील अनेक गाई याठिकाणी उपस्थित झाल्याने हे पाहून सर्वांचेच डोळे पाणावले.हिंदु धर्मियांत गाईला आईचे रूप मानले गेले आहे. या मृत गाईवर अंत्यसंस्कार करण्याचे आम्हाला भाग्य लाभले. गाईसह मोकाट प्राण्यांवर होणारे हल्ले थांबले पाहिजेत, असे मत यावेळी श्रीराम सोशल ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केले. यावेळी चिंटू जोहरी, युवराज चौधरी, कार्तिक शिंदे, अमन जोहरी, रणजित पाडवी, अजय ठाकरे, दिनेश मराठे, आकाश भोई, पारस परदेशी, शुभम दिगवा, महारु भोई, हिरालाल भोई, धिरज भोई, भोला भरवाड आदीसह ग्रुपच्या सदस्यांनी गोमातेला सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. तळोदा शहरात दिवसभर अनेक गाई मोकाट फिरत असतात. भाजीपाला मार्केट व इतर परिसरात पडलेला पालापाचोळा खात असतात. अनेकदा खाण्यास काही मिळत नसल्याने गाई प्लास्टिकच्या कॅरीबॅग व विषारी पदार्थ खातात. यामुळे अनेकदा त्यांना जीवही गमवावा लागतो. पालिकेने बेवारस गाई मालकांवर कारवाई करण्याची मागणी श्रीराम सोशल ग्रुपने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा