Breking News

रविवार, ९ एप्रिल, २०१७

शौचालयांच्या अनुदानाबाबत ग्रामसेविकेला कारणे दाखवा नोटीस

जीवननगर येथील प्रकार : गटविकास अधिकार्‍यांनी केली कारवाई
 तालुक्यातील जीवननगर येथेसन.२0१२-२0१३ या वर्षात १0 शौचालय लाभार्थ्यांचे ४६ हजार रुपयांचे अनुदान प्रत्यक्ष लाभार्थ्यांना न देता परस्पर काढून घेतल्याप्रकरणी गटविकास अधिकारी यांच्या आदेशावरुन संबंधित ग्रामसेविकेच्या मासिक वेतनातून ती रक्कम वसूल करण्यात येत आहे. आतापर्यंत ३६ हजाराची वसूली करण्यात आली असून उर्वरीत रक्कम तात्काळ वसूल केली जाणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी शरद मगर यांनी दिली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळोदा तालुक्यातील गोपाळपूर येथील ग्रामस्थांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाचे अनुदान न मिळाल्याने येथील ग्रामसेविका यांच्याकडे विचारणा केली होती. त्यावर त्यांनी २0१२ व २0१३ या वर्षातील शौचालयाचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे ज्यांनी लाभ घेतला त्यांना दुबार लाभ मिळणार नाही असे सांगितले. याबाबत ग्रामस्थानी शौचालयाचे अनुदानात अपहार केल्याचा संशय व्यक्त करीत याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. गटविकास अधिकारी शरद मगर यांच्या आदेशांन्वये ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करुन पंचनामा करण्यात आला होता. चौकशीच्यावेळी लाभार्थ्यांना लाभ दिला नसल्याचे निदर्शनास आले. तसेच लाभार्थ्यांना अनुदान न देता प्रत्येकी चार हजार ६00 याप्रमाणो १0 लाभार्थ्यांचे एकूण ४६ हजार एवढी रक्कम काढण्यात आल्याचे दिसून आले. सदर अहवाल गटविकास अधिकारी शरद मगर यांना सोपविण्यात आला. त्यानुसार मगर यांनी संबंधित गरमसेविकेला नोटीस बजावून सदर रक्कम तात्काळ भरावी असे आदेश बजाविले होते. नोटीस नंतरही संबंधीत ग्रामसेविकेने रक्कम जमा न केल्याने त्यांच्या २0१६ च्या अखेरच्या दोन महिन्यांच्या मासिक वेतनातून १८ हजार प्रती महिना असे एकूण 36 हजार रुपये कपात करण्यात आले आहेत. एकूण ४६ हजारापैकी ३६ हजार रुपयांची वसूली करण्यात आली असून उर्वरीत रक्कम त्वरीत वसूल करण्यात येणार असल्याचे मगर यांनी सांगितले. याबाबत ३ एप्रिल २0१७ रोजी संबंधित ग्रामसेविकेला कारणो दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा