दोन-तीन डोकं असणारी जुळी मुले, प्राणी, दोन व्यक्ती असून हात-पाय एकत्र चिटकेलेली असणारी किंवा शरीराचे अवयव एकत्रित असणाऱ्या व्यक्तिविषयी आपण सर्वजण ज्ञात आहोतच. तळोदा तालुक्यातील प्रतापपुर येथील एका कोंबडीच्या पिलाबाबत असाच काहीसा प्रकार घडला असून या कोंबडीच्या पिलाला चक्क तीन पाय आहेत. प्रतापपुर येथील राणा प्रताप माध्यमिक विद्यालयत शिक्षकेतर कर्मचारी असणारे श्यामप्रसाद आगळे हे शेती बरोबर मर्यादित स्वरूपात कुकुटपालन देखील करतात.नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या कोंबळ्याच्या फैलाव व्हावा यासाठी पुनरुत्पादनासाठी अंडी उबवायला ठेवली होती.निर्धारित कालावधी पूर्ण होऊन उबवायला ठेवलेल्या अंडीमधून कोंबडीचे पिलू बाहेर आलेत.पण यापैकी एक पिल्लू हे चक्क तीन पाय असणारे जन्माला आले आहे. सुरुवातीचे आठ दिवस हे पिल्लू लहान असल्याने त्याला तीन पाय आहेत हे कोणाच्या लक्षात आले नाही. मात्र,आठ-दहा दिसनानंतर ते पिल्लू तीन पायाचे असल्याचे आगळे कुटुंबियांच्या लक्षात आले. तीन पायांचे पिलू असल्याने त्याची सर्वांना उत्सुकता वाटली. तीन पाय असल्याने या पिलूला चालतांना अडचण होत असल्याचे दिसून आले आहे. अंधश्रद्धेचा पगडा असणारे अनेक जण याला दैवी चमत्कार असल्याचे समजत आहेत. तर अनेक लहान मुलांना ते पिलू दाखवून त्यांची करमणूक करण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे. सोशल मिडियावर या तीन पायांच्या कोंबडीच्या पिल्लुचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून अनेक जण त्याला पाहण्यासाठी आवर्जून हजेरी लावत आहेत. सध्या हे तीन पायाचे कोंबडीचे पिल्लू गावात व परिसरात आश्चर्याचा व चर्चेचा विषय ठरला आहे.
*कंजनाईटेल अबनॉर्मलिटी' या प्रकारामुळे असे तीन पायाचे,किंवा तीन,सहा डोक्याचे प्राणी व पक्षी जन्मास येऊ शकतात.गर्भातच तशी त्यांची' गुणसूत्रे जुळतात.काही प्राणी-पक्षी त्या स्थितीत जुळवून घेतात. तर काहींना ते शक्य नसते.त्यांची दगावण्याची शक्यता जास्त असते. अश्या परिस्थिती शक्य असल्यास शस्त्रक्रिया करून जास्तीचे अवयव काढून टाकले जातात.* *डॉ.किशोर सामुद्रे* *तालुका पशुवैद्यकीय अधिकारी,तळोदा*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा