आपले तळोदे- तळोदा तालुक्यातील क्रीडाप्रेमी आतुरतेने वाट पाहत असलेल्या तालुका क्रीडासंकुल लोकार्पण सोहळा पर्यटन मंत्री तथा जील्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचा हस्ते आज होणार आहे. या सोहळ्याला खासदार हिनाताई गावित आमदार उदयसिंग पाडवी जिल्हाधिकारी मलीनाथ कलशेट्टी, तसेच क्रीडायुवक सेवा संचानालय नाशिक विभाग संचालक जयप्रकाश दुबळे तसेच उपविभागीय अधिकारी तळोदा अमोल कांबळे आदी उपस्थित राहणार आहेत.
अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या क्रीडा संकुलाचे लोकार्पण व्हावे याकरिता तळोदा शासकीय विश्राम गृहात आमदार उदेसिंग पाडवी यांचा प्रमुख अध्यक्षतेखाली विविध सदस्यच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी तळोदा तहसीलदार योगेश चन्द्रे, जिल्हाक्रीडाधिकारी घानश्याम राठोड कार्यकारी अभियानता अनिल पवार आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शहादा व तळोदा तालुका क्रीडा संकुलाच्या हस्तांतरण तसेच इतर म्हत्वपुर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. शनिवारी दिनांक १० रोजी शहादा व तळोदा या दोन्ही ठिकाणच्या तालुका संकुलाचे उद्घाटन केले जाणार असल्याचे ठरले..
तळोदयातील आय. टी. आय. कॉलेजचा शेजारी तालुका क्रीडा संकुलाचा बांधकाम करण्यात आले आहे. याकरिता आमदार उदेसिंग पाडवी यांनी क्रीडा संकुलाचा निर्मितीकडे विशेष लक्ष दिले आहे. लवकरच क्रीडा संकुल तयार होवून त्याचा उपयोग खेळाडूंना घेता येनार आहे. क्रीडा संकुलला रंग रंगोटी करून लोकार्पनासाठी तयार करण्यात आले आहे, येत्या 10 तारखेला पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार हिना गावित, आमदार उदेसिंग पाडवी आदींच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा संकुलाचे उदघाटन होणार आहे.
या क्रीडा संकुळामुळे शहरातील व तालुक्यातील खेळाडूं व क्रीडा पटूंना हक्काचं स्थळ उपलब्ध होणार आहे, संबंधित ठेकेदाराने अद्याप पावेतो संकुलाची इमारत क्रीडा संकुल प्रशासनाकडे हस्तांतरित केलेली नसल्याने क्रीडा प्रेमींचा हिरमोड होत होता, इमारत हस्तांतरित झाल्यानंतरच क्रीडा संकुलाचा इमारतीत बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ आदी खेळांचे तर परिसरात खो - खो, कबड्डी आदी खेळांसाठी आवश्यक असणारे साहित्य व त्यासाठी लागणारे मैदान तयार करता येणार आहे, क्रीडा संकुलाचे जवळपास काम पूर्ण झाले आहे. आणि उर्वरित काम झाल्यानंतर शहरातील व तालुक्यातील खेळाडूंना सरांवासाठी आपल्या हक्काचे मैदान उपलब्ध होणार आहे. या सर्व खेळांना त्याद्वारे एकप्रकारे चालना मिळण्यास मदत होणार आहे....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा