Breking News

रविवार, ४ जून, २०१७

तळोदयात बियाणे विक्री दुकानावर जिल्हास्तरीय पथकाची धाड.

तळोदा तालुका आदीवासी बहुल तालुका आहे. शेतकर्‍यांचा अशिक्षितपणाचा फायदा घेत अनेक विक्रेते बोगस बियाणो सर्रासपणे विक्री करुन फसवणूक करीत असल्याचे प्रकार वारंवार उघडकीस येतात. राशी ६५९ या बीटी वाणावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होत असल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम होवून ६ मे रोजी शासनाकडून या वाणावर निर्बंध घालण्यात आला. बंदी होऊन १५ दिवसाच्यावरती झाले असून अद्यापही ठिकठिकाणी या बियाण्यांची विक्री करण्यात येत असल्याची तक्रार शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अनुप उदासी यांनी स्थानिक पातळीवरील संबधित अधिकार्‍यांकडे केली होती. मात्र थातूर-मातूर कारवाई करून याकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोप करीत उदासी यांनी दुरध्वनीवरून जिल्हा कृषी विभागाला याबाबत माहिती देवून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. या तक्रारवरुन कृषी विभागाचे जिल्हास्तरिय भरारी पथकातील कृषी विकास अधिकारी उमाकांत पाटील, मोहीम अधिकारी पी.बी.शेंडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ए.एफ.तायडे यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी तळोदा शहरातील चिनोदा चौफुली परिसरात असलेल्या बियाणे विक्री केंद्रावर भेट देवून तपासणी केली. तपासणीत निर्बंध घालण्यात आलेले बियाणे आढळून आले नाही. मात्र स्टेटमेंट एक व दोन नसल्याकारणाने दोन हजार २६५ कॉटन पाकीटांना विक्रीबंद आदेश देण्यात आले. त्यानंतर पथकाने संबंधित दुकानदाराच्या घरी जाऊन देखील तपासणी केल्याची चर्चा शहरात सुरु असून याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
 वेधशाळेने यंदा पावसाळा लवकर होणार असल्याचे अंदाज वर्तविल्यामुळे शेतकऱ्यांकडून बी-बियाणे व खतांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. शासनाच्या आदेशावरून बीटीचे ‘राशी ६५९’ हे वाणवर निर्बंध घालण्यात आला आहे. बोगस बियाणे विक्री करणाऱ्याची तपासणी करिता जिल्हास्तरीय भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाकडून बियाणे विक्री करणाऱ्या दुकाणाची तपासणी सुरू आहे. बोगस बियाणे विक्री करताना कोणीही आढळले तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. बाजारात बोगस बियाणे आणि खत विक्री करणाऱ्यांकडून त्याची फसवणूक होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना सावधान राहण्याचा सल्ला देण्यात आला असून कोणतेही बियाणे खरेदी करताना त्याची पावती घेणे गरजेचे आहे. 
*पी.बी.शेंडे मोहीम अधिकारी*

 शासनाने राशी 659 बीटी या बियानावर निर्बंध घातला आहे. मात्र तळोदा शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी या वाणाचे हे बियाणे सरासपणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करून लूट केली जात आहे. याबाबत स्थानिक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती, मात्र यावर थातूर मातूर कारवाई करण्यात आली आली. यामुळे सदर प्रकार दूरध्वनीद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्याने कळवून बोगस बियाणे विक्री करणाऱ्याची तपासणी करून कायदेशीर कारवाई व्हावी याबाबत तक्रार केली. अद्यापही शहरात ठीक ठिकाणी निर्बंध घातलेले बियाणे विक्री होत आहे. यावर शासनाने कडक कारवाई करून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी. अन्यथा शिवेसेनकडून आंदोलन करण्यात येईल. *शिवसेना तालुका अध्यक्ष अनुप उदासी*



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा