Breking News

रविवार, ४ जून, २०१७

मोड येथील शेतकरी भागवतोय वाटसरुंची तृष्णा!

 रस्त्यावर लावली पाणपोई : पाच वर्षापासून अवितरत उपक्रम सुरू
पुण्याचे काम म्हणुन ठिकठिकाणी अनेक व्यक्ती, राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्था वाजागाजा करीत, प्रसिद्धी मिळविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पाणपोई लावतात. काही दिवसापूरतेच पाणपोईच्या माठात पाणी पडते त्यानंतर पाणपोई कधी बंद होते हे कुणाला कळत नाही. मात्र मोड येथील शेतकरी माणक पाटील यांनी निस्वार्थ भावनेने मागील पाच वर्षापासून तहानलेल्या वाटसरुंची तृष्णा भागवण्याचे काम करीत आहेत. स्वार्थासाठी समाजकारण व समाजकारणातून राजकारण करणारे नेते व स्वयंघोषित समाजसेवक यांना उन्हाळ्यात शहरासह तालुक्यातील गावोगावी पाणपोई लावण्याचा विसर पडत चालला आहे. पाणपोई लावली तर फक्त फोटोसेशन करुन दोन-चार दिवस चालविली जाते. मात्र यास अपवाद तळोदा तालुक्यातील मोड येथील एक शेतकरी ठरले आहेत. माणक पाटील यांनी निस्वार्थ भावनेने मागील पाच वर्षापासून स्वखर्चाने
बोरद-मोड रस्त्यावर पाणपोई सुरु केली आहे. बोरद हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. येथे बाजार भरत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक मोठय़ा प्रमाणात बाजार करण्यासाठी येथे येतात. मोड ते बोरद या चार की.मी. रस्तावर अनेकदा पायपीट करणारे प्रवासी, गुराखी, शेतमजूर या रस्त्याने प्रवास करतात. रस्ता अंतर्गत कुठेही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे वाटसरुंची जिव्हाची लाही लाही होते. हे लक्षात घेत वाटसरुंची तहान भागावीया हेतूने मोड येथील माणक गोपाळ पाटील यांनी आपल्या शेताच्या बाधांवर दोन माठ ठेवून पाण्याची सोय उपलब्ध केली आहे. गुढीपाडवा पासून या पाणपोईला कुठलाही वाजागाजा न करता सुरुवात झाली असून ती अविरत सुरु आहे. दिवसातून तीनवेळा न चुकता माणकभाई पाण्याचे माठ भरतात. शेताजवळ झाडे असल्याने अनेकदा वाटसरू त्या झाडाच्या सावलीच्या थांबत होते. त्यांची तहाण भागावी म्हणुन मागील चार वर्षापासून पाणपोई सुरु केली आहे. यामुळे आत्मिक समाधान मिळत असल्याचे माणक पाटील दै.'पुण्यनगरी'शी बोलतांना म्हणाले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा