Breking News

सोमवार, १९ जून, २०१७

चिनोदा चौफुलीला आदिवासी क्रांतीकारकाचे नाव द्या.

तळोदा शहरात मुख्य रस्त्यावर अथवा मोक्याच्या ठिकाणी तयार करण्यात
आलेल्या चौफुलीवर आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा, आदिवासी क्रांतिकारक यांचे नाव अथवा पुतळे उभारून आदिवासी संस्कुर्तीचे जतन करा अशी मागणी तळोदा आदिवासी महामोर्चा संघटने कडून करण्यात आली आहे. याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार व लोकप्रतिनिधीना निवेदन देण्यात आले आहे. तळोदा शहराच्या मुख्य रस्त्यावर अथवा मोक्याच्या ठिकाणी आदिवासी संस्कृती टिकावी या करिता चौफुलीना क्रांतीवीर किंवा आदिवासी संस्कृतीचे प्रतीके, पूर्णकृती पुतळे, आदिवासी क्रांतीवीर बिरसामुंडा अथवा आदिवासी क्रांतीवीर यांचे चौफुलीला नाव देण्यात यावे, अथवा पूर्णकृती पुतळे बसविण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन आदिवासी महामोर्चा संघटनेकडून मुख्याधिकारी जनार्दन पवार सह जिल्ह्यातील आमदार खासदार आदींसह लोकप्रतिनिधीना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हा हा आदिवासी म्हणून ओळखला जात असून. तळोदा तालुका हा आदिवासी समाजाच्या गड समजला जातो. तळोदा तालुक्यात 90/ आदिवासी समाज राहतो. मात्र तळोदा शहराला आदिवासी महापुरुषाचे एकही चौफुली अथवा रस्त्याला महपुरुषाचे नाव, पूर्णकृती पुतळे, बसविण्यात आले नसल्याने आदिवासी समाजावर एकप्रकारे अन्याय होत असून ही गँभिर बाब असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. तळोदा शहरात बसस्थानक समोरील चिनोदा रस्त्यालगत असलेल्या चौफुलीला महापुरुष क्रांतिकारी बिरसामुंडा यांचे नाव देण्यात यावे. क्रांतीवीर बिरसामुंडा यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी अत्यंत कमी वयात ब्रिटिशांविरुध्द लढा देऊन सळो की पळो करून सोळले होते. इंग्रजांनी त्यांना कपटनीतीने पकडून फ़ाशी दिली. त्यांचा रक्ताचा प्रत्येक थेंब स्वतंत्रयासाठी त्यांनी वाहून देशासाठी बलीदान दिले. त्यांचे बलीदान व्यर्थ न जाता त्यांचे कार्य सतत तरुण पिढीला स्मरणात रहावे. या हेतूसत्व क्रांतिवीर बिरसामुंडा यांची पूर्णकृती पुतळा अथवा त्यांचे नाव, तथा आदिवासी सांस्कृतीचा प्रतीके अथवा पुतळे बसस्थापक समोरील चिनोदा चौफुलीत बसविण्यात यावे. येत्या 15 नोव्हेंबर क्रांतिसूर्य बिरसामुंडा यांची जयंती पूर्वीच पालिकेने याबाबत निर्णय घोषित करावा अन्यथा आदिवासी समाजाचा वतीने तळोदा तालुक्यात हजारोंच्या संख्येच्या उपस्थित रस्ता रोको व तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदनावर अध्यक्ष गणपत पाडवी, उपाध्यक्ष योगेश रमेश पाडवी, सचिव उमेश वसावे, दिनेश पाडवी, दिपक वळवी, जेमलाल वळवी, ईश्वर पाडवी, चंदन पाडवी, रवि पाडवी,विष्णु गावीत, अजय वळवी, विजय पावरा, उमेश पाडवी, सागर पाडवी, राजूदादा पाडवी, सुनिल पाडवी, नितेशदादा पाडवी, पिंटू पाडवी, गोविंदा पाडवी, देविसिगं पाडवी, अमृत वळवी, आदींच्या सह्या आहेत....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा