शिक्षणाचा दर्जा सर्वत्र उंचावला आहे ज्ञानाची गंगा सर्वत्र वाहू लागली आहे. परिस्थिती नुरूप खेड्या पाड्यातील पालक मुलाना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या एकंदरीतच फटका मराठी माध्यमाच्या शाळांना बसला आहे. विद्यार्थ्या अभावी मराठी अमध्यमांच्या शाळावर गंडांतर येऊन शिक्षण संकटात सापडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागातील अनेक मराठी शाळांवर विद्यार्थ्यांची कमतरता जाणवत आहे. विद्यार्थी पटसंख्या पूर्ण नसल्याने वर्ग बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांच्या फटका शिक्षकांसह शाळा व्यवस्थापनाला बसत आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेतील शिक्षकांना शाळा उघडण्याच्या आठवड्या पूर्वीच विद्यार्थी गोळा करून पटसंख्या वाढविण्याचे आदेश मिळाले आहेत. नौकरी वाचविण्यासाठी शिक्षक प्रत्येक खेड्या पाड्यात अतिदुर्गम भागत विद्यार्थ्यां शोधन्यासाठी धडपड करताना दिसून येत आहे. विद्यार्थी मिळाले तर शाळा सुरू राहील व आपली नौकरी कायम राहील म्हणून शाळेत ज्ञानार्जन करून भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांवर विद्यार्थी देता का विद्यार्थी असे म्हणण्याची वेळ आली आहे.
त्यातच आदिवासी विकास प्रकल्पामार्फत विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश दिला जात असल्याने विद्यार्थ्यांची कमतरता जाणवत आहे...
जिल्हा परिषद अन खाजगी शाळांना 5 व 10 वि पुढील शिक्षण देणाऱ्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळविण्याकरिता विद्यार्थी व पालकांना कसरत करावी लागत होती. मात्र आता हे चित्र बदलले आहे. प्रत्येक मराठी माध्यमाचा विद्यार्थ्यांचा शोधासाठी दारोदारी फिरत आहेत. इतर शाळांपेक्षा आपली शाळा कशी चांगली आहे. आपल्या शाळेत भौतिक सुविधा आहेत, उत्तम दर्जाचे शिक्षक आहेत, भव्य पटांगण आहे, विविध खेळणी आहेत, अशी स्वतःच शाळेची जाहिरात करून विद्यार्थी व पालकांचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत आहे. तर काही
पालकांसाठी खास भेट वस्तू देण्याचे आमिशही शिक्षाकांकडून दाखविले जात आहे. एवढा आटापिटा करून देखील विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे, उन्हा तान्हात शिक्षक विद्यार्थी मिळविण्यासाठी अनेक की.मी ची पायपीट करत आहेत. उन्हाळच्या सुट्या सुरू असताना शासनमान्य खाजगी शाळेचे शिक्षक गावोगावी जाऊन विद्यार्थीची शोध करीत फिरत आहेत. आपल्या शाळेतील संबंधित वर्ग वाचविण्यासाठी, तुकडी वाचवण्यासाठी विद्यार्थी पटसंख्या टिकविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या खेड्यापाड्यात ज्याप्रमाणे स्थानिक नेते मतदान मागन्यासाठी जातात, त्याचप्रमाणे शिक्षक अतिदुर्गम भागापर्यंत विद्यार्थी मिळविण्यासाठी पोहचले आहेत. जिल्ह्यातील काही शाळांचे चेअरमन हे राजकीय पदाधिकारी असल्याने आसपासची गावे खेड्यापाड्यातील सरपंच, ग्रामसेवक, स्थानिक शिक्षक पक्ष, यांच्याशी संपर्क ठेवून आहेत. अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, तालुक्यातील अतिदुर्गम भागात बस नसल्याने या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या खर्चाने खाजगी वाहन लावून दिले जाणार असल्याचे आश्वासन विद्यार्थी व पालकांना दिले जात आहे. तर काही ठिकणी शाळा सुरू होण्यापूर्वीच स्थानिक शिक्षकांना भेटून पटसंख्या जाणून घेऊन पटावरील नवे मिलवली आहेत. एका शाळेतील विद्यार्थी मिळविण्यासाठी 3 ते 4 शाळेचे शिक्षक त्या शाळांना भेटी देत आहेत, स्थानिक पदाधिकारी, सरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक भेटी घेऊन विद्यार्थी आमच्या शाळेला द्यावे, अशी मागणी करीत आहेत. काही ठिकाणी प्रतिस्पर्धी शाळेच्या शिक्षणसोबत वाद देखील उफाळत आहेत. तर काही ठिकाणी प्रतिस्पर्धीचे वर्चस्व असल्याने गावातून शिक्षकांना कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने शिक्षक वैतागला आहे.शाळेचे अस्तित्व टिकवण्यासाठी संस्थाचालक व शिक्षकांना परिश्रम घ्यावे लागत आहे आधुनिक काळात इंग्रजीचे शिक्षक अत्यन्त गरजेचे असते तरी मातृभाषेतीलजपणे गरजेचे आहे....
मागील वर्षांपासून आदिवासी विकास विभागाचा वतीने मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शालामध्ये प्रवेश देण्यास येत आहे. यावर्षी देखील सुमारे दोन हजार तीस विध्यार्थी तळोदा प्रकल्पातून अहमदनगर,नाशिक जिल्ह्यातील पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.पालकही या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येते. मोठ्या संख्येने आदिवासी विध्यार्थी या शाळांमध्ये प्रवेशित होत असल्याने जिल्हयातील आदिवासी आश्रमशाळाना अनुसूचित जमातीचे विध्यार्थी मिळविणे जिकरीचे जात आहे....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा