Breking News

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

तळोद्यातील दादा गणपतीची प्रबोधनकार आरास ठरतेय आकर्षण!


तळोदा येथील दादा गणेश मंडळाकडून अचानक उद्भवलेल्या आपत्तीला कशा पद्धतीने सामोरे जावे, असे प्रसंग आल्यास प्रथमोपचार पद्धती कोणत्या वापराव्यात, प्रशासकीय स्तरावरील उपाययोजना याबाबत जनजागृतीपर सजीव देखावा सादर केला आहे. आरासच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी देखील आपत्ती व्यवस्थापना बाबत जनजागृती केली आहे. सदर देखावा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. . तळोदा येथील सार्वजनिक दादा गणेश मंडळ मागील ७० वर्षांपासून विविध सामाजिक विषयांवर प्रभोधनात्मक आरास सादर करीत आहे. तळोदा शहरात सजीव देखाव्यांचे सुरुवात दादा गणेश मंडळाकडून झाली असून आतापर्यत शहीद जवानांना श्रद्धांजली, पशुधन वाचावा देश वाचावा, डॉ कलामांचा स्वप्नातील युवक, मोबाईल एक व्यसन(दुष्परिणाम) आदी विषयांवर त्यांनी सजीव देखावे सादर करून अनेकदा प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिकांचे मानकरी ठरले आहे. यंदा रविंद्र गुरव यांच्या मार्गदर्शनाने अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष योगेश गुरव, सचिव प्रशांत गवळे, खजिनदार पंकज गुरव, सदस्य रविंद्र गाढे, गणेश पाटील, योगेश पाटील, राकेश गुरव, दत्तात्रय चित्ते, राहुल पाटील, सुभाष शिंदे, नवनीत लोहार, चेतन गुरव, किरण गुरव आदीं सदस्यांनी या वर्षीही सजीव देखाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. अचानक आलेला भूकंप, महापूर, ढगफुटी, चक्रीवादळ, अग्नीउपद्रव, आतंकवादी हल्ले, सर्प दंश, विजेचा शॉक, हृदय विकाराचा झटका, अपघात, गॅस सिलेंडरला लागलेली आग, रस्त्यावरील अपघात आदींना घाबरून न जाता कशा पद्धतीने सामोरे जावे, अशाावेळी कुठले प्रथमोपचार सेवा पुरविणे याबाबत सजीव देखावाद्वारे प्रभोधन करण्यात आले आहे. या आरासीचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, तळोदा नगरपालिका मुख्याधिकारी जनार्धन पवार, पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे आदींच्या मार्गदर्शनात्मक प्रतिक्रियेचा समाविष्ट करण्यात आल्याने सदर देखावाला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. ही आरास पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे..



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा