Breking News
कष्ट, प्रेम आणि एकता यांचे प्रतीक ; शांताराम मराठे (आप्पा) संघर्ष, कष्ट आणि यशाचा गाथा
sudhaspari - May 01 2025
बुधवार, २० डिसेंबर, २०१७
नंदुरबार नवापुरात काँग्रेस तर, तळोद्यात भाजप विजयी
नंदुरबार : राज्याचे लक्ष लागून असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर व तळोदा नगरपालिकेचे निकाल काल (दि. १८) जाहीर झाले. त्यात, नंदुरबारला कॉँग्रेसच्या रत्ना रघुवंशी, नवापूरात काँग्रेसच्या हेमलता पाटील तर तळोद्यात भाजपचे अजय परदेशी विजयी झाले आहेत़ .
नंदुरबार जिल्ह्यातील तिनही पालिकांच्या निवडणूका अत्यंत चुरशीच्या झाल्या. विशेष म्हणजे प्रचारासाठी भाजप आणि काँग्रेसतर्फे आजी-माजी मुख्यमंत्र्याच्या सभा झाल्याने चुरस वाढली होती. त्यामुळे निकालाकडे सर्वाचे लक्ष होते. सकाळी १० ला मतमोजनीला सुरुवात झाली. दीड तासात जवळपास सर्वच निकालाचे चित्र स्पष्ट झाले. तर नंदुरबारात चुरशीची लढत झाली़ याठिकाणी काँग्रेसने आपली सत्ता कायम ठेवली आह़े नगराध्यक्षपदासाठी रत्ना चंद्रकांत रघुवंशी या ४ हजार ७८१ मतांनी विजयी झाल्या. तर, नवापूरात काँग्रेसच्या हेमलता पाटील या १ हजार ७४२ मतांनी विजयी झाल्या आहेत. तळोद्यात मात्र काँग्रेसला सत्ता कायम ठेवता आली नाही. या ठिकाणी भाजपचे अजय परदेशी हे १ हजार ७९५ मतांनी विजयी झाले आहे. नगरसेवक पदासाठीही काँग्रेस सेना युतीने नंदुरबारात एकूण ३९ पैकी २८ जागा राखल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. नवापूरातदेखील काँग्रेसने २० पैकी १४ जागा राखून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तळोद्यात सत्ता परीवर्तन करीत भाजपने एकूण १८ पैकी ११ जागा जिंकून बहुमत मिळवले आहे..
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा