पालिका निवडणूक विकासाचे व्हिजन घेऊन लढविली असून घराणेशाही व सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला जनता कंटाळली असल्यानेच जनतेने तळोद्यात भाजपाला साथ दिली आहे. निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यास कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन आ.उदेसिंग पाडवी यांनी केले..
तळोदा पालिकेत भाजपाचा झेंउा फडकल्यानंतर आ.उदेसिंग पाडवी व लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी आमदार कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. आ.पाडवी म्हणाले की, तळोदा पालिका निवडणुकीत विकासाचे व्हिजन घेऊन लढविली. निवडणुकीत दिलेल्या २१ कलमी वचननामा दिला आहे. त्यानुसार पाच वर्षात पूर्ण करू व शहराचा चौफेर विकास करून जनतेचा विश्वास सार्थकी ठरविणार. येथील पालिका १६७ वर्ष जूनी असून एकाच घराकडे काँग्रेसची सत्ता राहिली आहे. शहराला न्याय मिळाला नाही म्हणून जनतेने काँग्रेसला नाकारले असून भाजपाचा विकास व्हिजनला साथ दिल्याचे सांगितले. शहराध्यक्ष हेमलाल मगरे, प्रदीप कर्पे, दिनेश खंडेलवाल, डॉ.किशोर पाटील व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भाजपा नेत्यांनी माझ्यासह नगरसेवक पदाच्या तळागाळातील उमेदवारांवर विश्वास दाखवीत उमेदवारी देऊन खा.हीना गावित, आ.उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत सामोरे जाऊन नागरिकांनी विश्वास दाखविला. मतदारांचा विश्वास व अपेक्षांना जबाबदारीने पेलवून सार्थकी ठरविण्यात येईल. हा विजय माझा नसून पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा विजय आहे. प्रामुख्याने फिल्टर प्लॅन, कचर डेपो व डी.पी.रोड मोकळा करून रहदारी खुला करण्यावर भर देणार असल्याचे नगराध्यक्ष म्हणुन निवडून आलेले अजय परदेशी यांनी सांगितले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा