
१३ डिसेंबर रोजी मतदान असून प्रचारासाठी केवळ सहा दिवसांचा कालावधी राहीला आहे. यामुळे नेते, उमेदवार व त्यांचे समर्थक विविध क्लुप्ती वापरुन आपापल्या प्रभागातील मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत.. येथील पालिका निवडणुकीत काँग्रेस, भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादीसह अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काही प्रभागांमध्ये दुरंगी तर काही प्रभागांमध्ये तिरंगी लढती होत आहेत. दि. १३ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असल्याने उमेदवारांकडे प्रचारासाठी केवळ सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणूक असल्याने नेते, नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना केवळ एक प्रभाग न करता संपूर्ण प्रभागात प्रचारासाठी पायपीट करावी लागत आहे. यामुळे वैयक्तीक भेटी, हितसंबंध यावर जास्तीत जास्त भर दिला जात आहे. तसेच बॅनर बनवून ते व्हाट्सअप, फेसबुक यावर अपलोड करुन सोशल मिडीयावर प्रचार करण्यात येत आहे. कॉर्नर सभासह वाजत गाजत प्रचार फेऱ्या काढण्यात येत आहेत. राजकीय पक्षाच्या कार्यालयाकडून विविध पक्षाचे झेंडे, दुपट्टा, टोपी आदी साहित्य कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे. त्याचा वापर प्रचाराच्या वेळी केला जात आहे. मोटारसायकलींना पक्षाचे झेंडे लावून ते प्रभागात फिरतांना दिसत आहेत. काही ठिकाणी महिला व
पुरुष गटागटाने मतदारांना भेटत आहेत. काही प्रभागात मतदारांसाठी पाट्र्यांचे आयारेजन केले जात आहे. तसेच उमेदवार व कार्यकर्त्यांच्या डोक्यावर, अंगावर पक्षाचे चिन्ह असलेले कपडे, टोपी परिधान करुन प्रचारावर भर दिला जात आहे. काँग्रेसकडून पक्षाची चिन्ह असलेले कपडे परिधान केलेले चौधारी दाम्पत्य तर भाजपातर्फे गाढे हे प्रचार करीत असल्याने ने आकर्षण ठरले आहेत. पक्षाचा प्रचार-प्रचारसाठी शहर पिंजून काढत असून प्रचाराचे मोठे माध्यम ठरले आहे. पक्षांकडुन प्रचाराचे माध्यम म्हणुन लोप पावत चाललेल्या लोककलेचा उपयोग केला जात आहे. वासुदेवचा माध्यमातून दान पावल! म्हणत विविध गीतांच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा