डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या तळोदा नगरपालिकेची रणधुमाळी सुरु असतांना काही उमेदवारांच्या अपिलामुळे सदर निवडणूक प्रक्रियेत राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. त्यामुळे दि.१३ डिसेंबर रोजी होणारी मतदान प्रक्रिया दि.१७ रोजी व १८ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा यांनी दिली..
तळोदा : डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या तळोदा नगरपालिकेची रणधुमाळी सुरु असतांना काही उमेदवारांच्या अपिलामुळे सदर निवडणूक प्रक्रियेत राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. त्यामुळे दि.१३ डिसेंबर रोजी होणारी मतदान प्रक्रिया दि.१७ रोजी व १८ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा यांनी दिली..
तळोदा येथे निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा यांनी पत्रपरिषदेत घेवून निवडणूक कार्यक्रमात बदल झाल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील मुदत संपणाऱ्या पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार व नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी निवडणूकीची प्रक्रिया सुरु झाली. मात्र निवडणूक रिंगणातील काही उमेदवारांच्या बाबतीत न्यायालयीन प्रक्रियेमुळे महाराष्ट्र नगरपरिषद निवडणूक नियम १९६६ मधील नियम क्रंमाक (ड) मधील तरतुदी विचारात घेवून तिन्ही पालिकेतील मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. तळोदा नगरपालिकेसाठी दि.१३ डिसेंबर रोजी होणार मतदान दि.१७ डिसेंबर रोजी रविवारी होईल. तसेच दि.१८ रोजी मतमोजणी प्रक्रिया घेण्यात येणार असल्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहेत. तळोदा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १(ब) व ९(ब) नगरसेवक तसेच नगराध्यक्ष पदाचा निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रावर झालेल्या अपिलामुळे जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार मतदान तारखेत बदल करणे आवश्यक होते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने पालिका निवडणूकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा