Breking News
केअर पब्लिक स्कूलच्या शिशुकुंज विभागात "Best Student of the Month" पुरस्कार प्रदान
sudhaspari - Mar 08 2025साधेपणात लपलेला मोठा अर्थ: प्रशांत पाटील
sudhaspari - Mar 08 2025*डॉ. महेंद्र चव्हाण – एक दिलदार माणूस*
sudhaspari - Mar 05 2025सागर पाटील: परिस्थितीशी दोन हात करणारा एक कर्तव्यदक्ष योद्धा
sudhaspari - Feb 21 2025पंकज राणे: एक साधा पण प्रभावी समाजसेवक
sudhaspari - Jan 18 2025दीपमाला मॅडम: विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या शिक्षिका
sudhaspari - Jan 06 2025- sudhaspari - Dec 31 2024
दिपक परदेशी: चप्पल हरवलेला कार्यकर्ता
sudhaspari - Dec 08 2024नात्यांचा उत्सव: के.आर. पब्लिक स्कूलमध्ये आजी-आजोबांसाठी आगळावेगळा कार्यक्रम
sudhaspari - Dec 02 2024"नात्यांचे महत्त्व उलगडणाऱ्या संगीता काकूंना अखेरचा निरोप"
sudhaspari - Dec 01 2024कर्तबगार, दिलखुलास, दिलदार अन् सदाबहार मित्र ; मनोज ढोले
sudhaspari - Nov 29 2024- sudhaspari - Nov 21 2024
महिलांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या; भाजप की काँग्रेसला फायदा?
sudhaspari - Nov 21 2024हिमाचल टूरचा चुरशीचा प्रसंग: नियमांवरील विजय
sudhaspari - Nov 17 2024दै.पुण्यनगरीचे निष्ठावंत सेवक: सुरज पाटील यांचे अल्पायुष्य जीवन ; भावपूर्ण श्रध्दांजली
sudhaspari - Nov 17 2024"रेल्वे प्रवासातील अडचणी आणि आनंदाचा प्रवास"
sudhaspari - Nov 16 2024दिल्लीहून सुरतपर्यंतचा प्रवास: अनुभव, निसर्ग आणि आठवणी*
sudhaspari - Nov 15 2024'हिमाचलची जादू, पंजाबचा रंग आणि दिल्लीचा वैभव: एक अविस्मरणीय सफर"
sudhaspari - Nov 15 2024शिक्षक सुनील सूर्यवंशी यांचे अथक प्रयत्न आणि खेळाडू दिपिका छापोला हिचे यश
sudhaspari - Nov 15 2024अमित गाभा: शांत, संयमी आणि दिलदार ढाबा मालकाचा अविस्मरणीय पाहुणचार
sudhaspari - Nov 15 2024पुरोगामी विचाराचा धैर्यवान वारसदार : विशाल सुर्यवंशी
sudhaspari - Nov 15 2024हिमाचलच्या रस्त्यांवर एक निष्ठावंत सहकारी: रोहित शर्मा
sudhaspari - Nov 14 2024जगदीश शर्मा: एक उत्कृष्ट ड्राइवर और एक विश्वसनीय मार्गदर्शक
sudhaspari - Nov 14 2024सुवर्ण मंदिर दर्शन आणि अमृतसरचा संस्मरणीय प्रवास
sudhaspari - Nov 14 2024धर्मशाला: निसर्ग सौंदर्य आणि भाऊसाहेब यांचा कर्तव्याचा अभिमान
sudhaspari - Nov 11 2024
गुरुवार, २५ जानेवारी, २०१८
तळोद्यातून पुन्हा बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न

मंगळवार, २३ जानेवारी, २०१८
तळोद्याचा अमोल करणार 'पे्रमाचा राडा'!
मराठी चित्रपटात मिळाली सहनायकाची भूमिका : मार्च मध्ये चित्रपट प्रदर्शित
तळोदा येथील अमोल कर्णकार या तरुणास दिग्दर्शक अवधूत खराडे यांच्या प्रेमाचा राडा या मराठी चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली आहे. मार्च महिना अखेरीस चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सातपुडयाच्या पायथ्याशी असलेल्या तळोदा या गावाचा अमोल कर्णकार हा उदयोन्मुख कलाकार रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याने त्याची सर्वांनाच उत्सूकता लागून आहे. . दुर्गम भागातील तळोदा शहरात अजूनही काही सोयी-सुविधा पोहचलेल्या नाहीत. स्थानिक कलावंतांसाठी कुठलेही स्टेज उपलब्ध नसताना शहरातील कलावंतांच्या कलेला विविध माध्यमातून वाव मिळत आहे. कठोर मेहनत, जिद्द व चिकाटी या त्रिसुत्राच्या जोरावर सामान्य कुटुंबातील अमोल कर्णकार या युवकाने अभिनयन क्षेत्रात पदार्पण केले आहे. तळोदा येथील वनरक्षक वासुदेव माळी यांचा मुलगा अमोल हा मुंबई मायानगरीत जाऊन आपल्या परिश्रमाच्या जोरावर अभिनय क्षेत्रात आपले नशिब अजामाविण्यासाठी दाखल झाला आहे.शहादा महाविद्यालयात एम.बीएचे शिक्षण घेत त्याच्यातील
कलाकार त्याला अभिनय क्षेत्रात काही तरी करण्यासाठी प्रोत्साहीत करीत आहे. लहानपणापासून नृत्याची आवड असल्याने विविध ठिकाणी स्पर्धेत तो सहभागी होत होता. यासाठी त्याला अनेक पारितोषिके देखील प्राप्त झाली आहेत. एके दिवशी फेसबुकवरून प्रेमाचा राडा या चित्रपटासाठी साईड हिरो साठीची ऑडिशन बाबतची जाहिरात त्याने पहिली. सदर जाहिरात पाहून आपणही अभिनय क्षेत्राकडे वळावे, याबाबत एक प्रयत्न जरूर करावा असे त्याला वाटले. याबाबत त्याने आपल्या मित्रांना व आई वडिलांना कल्पना दिली. आई वडिलांनी देखील होकार दिल्याने अमोलने तातडीने फलटण गाठले. योगायोगाने पहिल्याच ऑडिशनमध्ये त्याची निवड झाली. दिग्दर्शक अवधूत खराडे यांच्या आगामी चित्रपट प्रेमाचा राडा या चित्रपटात मुख्यनायकाचा मित्राचे पात्र करण्याची संधी अमोलला मिळाली आहे. या चित्रपटाचे निर्माते मोहन घोडके आहेत. .प्रेमाचा राडा ही एक
प्रेम कथा असून यात मुख्यनायक म्हणून दीपक पारसे, मुख्यनायिका ऐश्वर्या घोडके आहेत. खलनायक म्हणून मराठी चित्रपटातील संजय खापरे व जयवंत भालेकर, नितीन सरवदे या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. चित्रपट हा प्रेम कथेवर आधारित असुन पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नरसिंगपूर येथे त्याचे चित्रिकरण झाले आहे. येत्या मार्च अखेरीस दोनशे चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामाध्यमातून अमोलचे स्वप्न साकार होणार असून याचे सर्व श्रेय तो आई-वडिलांना देतो. या चित्रपटातील अभिनय पाहून त्याला महाराष्ट्र कलाकार संघटनेचे अध्यक्ष लुनेश्वर भालेराव व नितीन सरोदय यांनी एका हिंदी चित्रपटासाठी त्याची निवड केली आहे. सध्या तो वर्दी या मालिकेत झळकणार आहे. तर अधुरी एक प्रेम कथा या चित्रपटात मुख्य नायकाचा रोल मिळाला असून एप्रिल नंतर या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे..

शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८
अखेर प्रकल्पाधिकारी शुक्राचार्य दुधाळ यांच्या सेवा समाप्तीचे आदेश
अपहार व फसवणूकीच्याप्रकरणी तळोदा पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल होऊन दोन वर्षापासून जिल्हा कारागृहात बंदीवासात असलेल्या तसेच फौजदारी व न्यायालयीन कारवाई सुरु असलेल्या आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या तळोदा प्रकल्पाचे परिविक्षाधिन प्रकल्पाधिकारी शुक्राचार्य दुधाळ यांना निलंबित करण्यात आले आहे. शासनाचे सहसचिव सुनिल पाटील यांनी दुधाळ यांच्या सेवा समाप्तीचे आदेश बजावले आहेत. .
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आदिवासी विकास सेवेतील प्रकल्पाधिकारी या पदावर शुक्राचार्य दुधाळ यांची शासन निर्णयान्वये नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, दुधाळ यांनी परिविक्षा कालावधीत कामाचा अपेक्षित दर्जा प्राप्त केला नाही. तसेच काम व वर्तवणूक अयोग्य व अशोभनिय आढळून आले. यासंदर्भात ५ ऑक्टोबर २०१५ रोजी तळोदा पोलिस ठाण्यात दुधाळविरुद्ध भादंवि कलम ४०९, ४२०, ४६७, ४३८, ४७१, ४७७ (अ), ३४ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुधाळ हे दि.२ फेब्रुवारी २०१६ पासून नंदुरबार जिल्हा कारागृहात बंदीवासात असून त्यांच्याविरुद्ध फौजदारी व न्यायालयीन कारवाई सुरु आहे. यामुळे शासन परिपत्रक दि.७ मार्च १९८३ मधील तरतूदीनुसार दुधाळ यांना सेवेतून कमी करण्यास पात्र ठरत असून शासन निर्णय ८ जानेवारी २०१३ मधील अट क्र.(२)नुसार तसेच शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्र.पीएससी-१०८०/१११८/सीएन/८२/८०/८ दि.७ मार्च १९८३ मधील तरतूदीनुसार शुक्राचार्य दुधाळ यांच्या सेवा समाप्तीचे आदेश सहसचिव सुनिल पाटील यांनी बजावले आहेत.. दरम्यान शुक्राचार्य दुधाळ यांनी यावल येथील आदीवासी प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी म्हणून देखील सेवा बजावली आहे. त्यांच्या प्रकल्प अधिकारीच्या कार्यकाळात आदीवासी वसतीगृहाच्या मुलांनी मोठे आंदोलन केले होते. शुक्राचार्य दुधाळ यांची प्रशासकीय कारकीर्द ही वादग्रस्त ठरली..
*शिष्यवृत्ती अपहार प्रकरणात संशीयितआरोपी*
तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुक्राचार्य दुधाळ, दिनेश कोळी रा. नंदुरबार तसेच तुळजा भवानी महिला मंडळ आष्ठी, जिल्हा बीड यांचे अध्यक्षा श्रीमती. नालंदा बलभिम खाडे, श्रीमती. कमल मधुकर दळवी उपाध्यक्ष, श्रीमती. संगीता विष्णु दळवी सचिव, व स्वामी समर्थ सामाजिक बहुउदेशिय विकास संस्था, रंजाने तालुका शिंदखेड़ा, जिल्हा धुळे यांचे पदाधिकारी श्री.दिलीप संपत पाटील अध्यक्ष, साहेबराव मंगा बागुल उपाध्यक्ष, श्रीमती हीराबाई दीपचंद पाटिल सचिव, आदीं अपहार केला प्रकरणी बंदिवासात आहेत...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)