ना.रावलांची बदनामी प्रकरण : श्यामसिंग राजपूत यांची पत्रकार परिषदेत माहिती
सरकारी प्रकल्प जाहीर झालेल्या गावातील जमिनी कवडीमोल दराने विकत घेऊन सरकारला त्या वाढीव किमतीला विकण्याचा आरोप करीत भाजपाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात तळोदा न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष श्यामसिंग राजपूत यांनी दिली. .
नवाब मलिक यांनी कोणतीही खातरजमा न करता खालच्या पातळीवर जाऊन पालकमंत्री तथा पर्यटनमंत्री जयकुमार रावल तसेच भारतीय जनता पार्टीवर आरोप केले होते. धर्मा मंगा पाटील यांच्या मृत्यूनंतर जयकुमार रावल व पक्षाला बदनाम करण्याच्या उद्देशाने व राजकीय प्रतिष्ठा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आले. ना.रावल यांच्यावर खोटे व तथ्यहीन व बिनबुडाचे आरोप केले आहेत. रावल कुटुंबीय धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करत असून पैसे कमावण्याचा सोपा मार्ग त्यांनी अवलंबले आहे. धुळे जिल्ह्यातील अनेक जमिनी जयकुमार रावल किंवा त्यांच्या कंपनीच्या नावे आहेत. रावल हे भूमाफिया असून त्यांनी माजी राष्ट्रपती यांची देखील जमीन बळकावली असल्याचा आरोपासह विविध आरोप पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले होते. यामुळे जयकुमार रावल विरुद्ध केलेले आरोप हे केवळ वयक्तीक व पक्षाची बदनामी करण्याच्या हेतूने आहेत. यात केवळ त्यांची वयक्तीक व सामाजिक तसेच पक्षाची बदनामी करण्याचा हेतू असून त्यांची राजकीय प्रतिष्ठा संपवण्याच्या कट असल्याचे श्यामसिंग राजपूत यांनी यावेळी सांगितले. विरोधकांच्या केलेल्या आरोपात कुठलाही शुद्ध हेतू नाही, तसेच बिनबुडाचा आरोपामुळे संघटनेची व व्यक्तीची बदनामी झाल्याने नवाब मलिक यांच्या विरोधात वकीलांमार्फत तळोदा न्यायालयात ४९९, ५०० प्रमाणे फिर्याद नोंद करण्यात आली असल्याची माहिती श्यामसिंग राजपूत यांनी पत्रकार परिषदेत दिली..
सदर प्रकरणी तळोदा न्यायालयात अर्ज क्रमांक 51/18 असा दाखल झाला आहे. दि.17 मार्च रोजी सदर प्रकरण पडताळणी कामी ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाची प्रथम वर्ग न्याय दण्डाधीकारी यांच्या समोर सुनावणी होणार आहे.. वकील संदीप पवार
सदर प्रकरणी तळोदा न्यायालयात अर्ज क्रमांक 51/18 असा दाखल झाला आहे. दि.17 मार्च रोजी सदर प्रकरण पडताळणी कामी ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाची प्रथम वर्ग न्याय दण्डाधीकारी यांच्या समोर सुनावणी होणार आहे.. वकील संदीप पवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा