रात्र असो की दिवस, ऊन असो अथवा वारा मात्र डेब्रामाळच्या ग्रामस्थांचा संघर्ष सुरु असतो तो तहान
भागविण्यासाठी. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरींनी तळ गाठल्याने व परिसरात दुसरी पाण्याची सोय नसल्याने तहान भागविण्यासाठी दोर बांधून खोल विहिरीत उतरुन येथील ग्रामस्थ पाण्याची तहान भागविण्यासाठी कसरत करीत आहेत. यामुळे जीवितही धोक्यात येते. रात्रं-दिवस विहिरीत असणाऱ्या झऱ्यातून घोटघोट पाण्याचा उपसा करुन हंडाभर पाणी मिळविण्यासाठी मोठे दिव्य डेब्रामाळच्या रहिवाश्यांना पार पाडावे लागत आहे. प्रशासनातर्फे सुमारे ४१ लाखाची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली खरी मात्र ही योजना पूर्ण होऊन ग्रामस्थांची तहान भागणार कधी याची प्रतिक्षा कायम आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा नदी काठी वसलेले डेब्रामाळ हे गाव अक्कलकुवा पासून 120 km अंतरावर 620 लोकवस्ती असलेले छोटेसे गाव आहे. सातपुडयाच्या पायथ्याशी व नर्मदा नदीच्या काठी वसलेले या गावाला निसर्गाने भरभरून दिले आहे. आजही या भागात बांबू, साग, बेहडा, सोलई, सीताफळे आदीसह विविध वृक्षाचे जतन बऱ्यापैकी आहे. असे असले तरी योग्य उपाययोजना अभावी धरण उशाला असून देखील नागरीकाना पाण्यासाठी जीव धोक्यात घालत 200 फूट खोल विहिरीत उतरून पाणी आणावे लागत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात या भागातील ग्रामस्थांना
पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असून वर्षानुवर्षे हेच रडगाणे डेब्रामाळ ग्रामस्थाच्या नशिबी आले आहे. गावात पिण्याचे पाण्याचे स्रोत म्हणून 4 हातपंप व 2 विहिरी आहेत. एप्रिल मे महिन्यात पाणी पातळी खालावूनदरवर्षी भर उन्हाळ्यात जलस्रोत आटतात परिणामी पाणी टँचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागतो.. गावात असलेल्या 200 फूट विहिरीत जीव धोक्यात टाकत दोन तरुण दोरच्या साहाय्याने विहरित उतरतात, या विहरीत जेमतेम एक झरा असून तो अल्पप्रमाणात पाझरतो. या झऱ्यातुन पांझरणारे पाणी ताटलीत साठवून ते एका हंड्यात भरून वर चढवले जाते, एक हँडा भण्यासाठी अर्धा ते एक तासाचा अवधी लागतो. ही प्रक्रिया सकाळ पासून सुरू होऊन रात्री उशिरा पर्यत सुरू असते. लवकर पाणी मिळावे याकरिता
ग्रामस्थ दिवसभर विहरिचा अवतीभवती तात्काळत उभे राहतात. दर 4 तासाने आळीपाळीने तरुण विहरित उतरून पाणी काढतात. अनेकवेळा पाय निसडून अपघात घडण्याच्या घटना देखील येथे घडल्या आहेत. शासनाच्या विविध योजना यापूर्वी कागदोपत्री येथे राबविल्या गेल्याचे चित्र असले तरी प्रत्यक्ष स्थिती वेगळी आहे. गावात यापूर्वी छोटे मोठे मातीचे बंधारे बांधण्यात आले होते. त्यावर मेंटनेस करून त्याच्या फायदा ग्रामस्थाना होण्याकरिता उपाययोजना आखल्या गेल्या पाहिजे होत्या मात्र तसे झालेले दिसत नाही. गावात यापूर्वी जलयुक्त शिवाराचे निवड झाली असली तरी केवळ कृषी विभागाकडूनच जलयुक्त शिवाराचे कामे झाले आहेत, या भागात वनविभागाची जमीन अधिक असून देखील अद्याप पावेतो कामे झालेले नसल्याचे बिकट स्थिती आहे. यापूर्वी सदर गाव जलयुक्त शिवार सह मुख्यमंत्री ग्राम दत्तक
योजनासह व विविध योजनेसाठी या गावांची निवड करण्यात आली होते. मात्र यात राजकीय घडामोडीमुळे डेब्रामाळ व परिसरातील गावे सुटले, मात्र नर्मदा बचाव कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष घातल्याने पुन्हा नियोजन कृती आराखडा तयार करून गावे निवडण्यात आली. सध्या डेब्रामाळ गावकरिता आदिवासी उपाययोनांतर्गत मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अंतर्गत नर्मदा नदीतून पाणी आणण्याबाबत प्रशासन नळ पाणीपुरवठा योजनेकरिता 40 लाख 83 हजाराची योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. वेळोवेळी याबाबत झालेली तक्रारीच्या आढावा घेत नियोजनाच्या अभाव दूर करण्यासाठी खुद्द दस्तखुद जिल्हाधिकारी यांनी या गावाची प्रथमच पाहणी करून याबाबत समस्यां जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या विशेष दौऱ्यात खुप वर्षापासुन गंभीर असलेल्या पाण्याच्या टंचाई वर कायम स्वरूपी मात कशी करता
येईल याकरिता 10 में 2018 ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात सामिल असलेल्या डेबरामाळ ग्राम पंचायतीत फलकाचे अनावरण व समस्यां जाणून जाणून घेण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, मा. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या जिल्हा कार्यवाह, योगिनी खानोलकर, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी श्री विनय गौड़ा, आदींच्या उपस्थित भेट दिली. यावेळी आसुसलेल्या जनतेकडून त्यांचे स्वागत ढोल तश्याने केले. साहेब आले म्हणजे समस्यां सुटणार अशी धारणा ठेवत जणू देवच आपला दारी आल्यागत पारंपरिक ढोल वाजवत जिल्हाधिकाऱ्याचे स्वागत केले. डेबरामाळचे सरपंच , उपसरपंच , होतकरु युवक व ग्रामस्थ महिला पुरुषांसह जाऊन गावातील पाण्याचे सर्व स्त्रोत पाहिले. यावेळी पाणी पातळी उंचावण्यासाठी व पाण्याची योग्य नियोजनासाठी आम्ही काहीही करण्यास तयार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यावर पाण्याचे कमी झालेले स्त्रोत परत कसे मिळवता येतील या वर जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. आजच्या स्थितीला प्रशासन डेब्रामाळ या अतिदुर्गम भागात पोहचले असले तरी पाणी कधी पोहचणार हा प्रश्न कायम असून, तात्पुरता स्वरूपात उपाययोजना न होता कायमस्वरूपी व्हावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
प्रतिक्रिया*
➤➤➤ नळ पाणीपुरवठा योजनेला मंजूरी मात्र अंमलबजावणी तात्काळ होणे अपेक्षित डेब्रामाळ गावासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल. नळ पाणी पुरवठा योजनेस मंजूरी देण्यात आली असून निधी उपलब्ध करण्यात आला आहे. परिसरातील जलयुक्त शिवार कामांची पाहणी केली असून कामे प्रगतीपथावर आहेत. टंचाई निवारणासाठी उपाययोजना सुरु असून लवकरच समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. .
- डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी जिल्हाधिकारी, नंदुरबार.
*प्रतिक्रिया*
➤➤➤ या अतिदुर्गम भागात पलासखोब्रा, कंजाला, वेलखेड़ी आणि सांबर हे गावे असून डेब्रामाळ या गावाट सर्वात जास्त पाणी टँचाई आहे. डेब्रामाळ गाव हे सातपुड्याच्या कुशीतले गाव असून जवळच नर्मदा नदी आहे. हे गाव डोंगराळ भागात असल्याने प्रशासन येथे पोहचण्यास कमी पडत आहे. शासनाचे योग्य ते नियोजन नसल्यांने या भागात पाणी साठवण होत नसून दरवर्षी एप्रिल महिन्यातच पाणी पातळी खालावते परिणामी पाण्याचे स्रोत आटतात्. ग्रामस्थांना रोजनदारी बुडवत विहिरीत उतरून जीव घोक्यात घालत पाणी काढावे लागते.
*सखाराम वळवी* सामाजिक कार्यकर्ते डेब्रामाळ
*प्रतिक्रिया*
➤➤➤ डेब्रामाळ हे अक्कलकुवा तालुक्यातील शेवटच्या गावांपैकी एक असून या भागत आजही प्रशासनाच्या योजना पूर्णतः पोहचत नाही, त्या पोहचण्यास दिरंगाई होते. भौतिक सुविधा नसल्याने अधिकारी देखील येथे येण्यास धजावत नाहीत. काही योजना या केवळ कागदावरच रंगविला जातात. निसर्गाची साथ लाभली असताना केवळ उपाययोजनेच्या अभावामुळे पाणी टँचाईला समोर जावे लागत आहे.
*पोपटी वळवी*
*ग्रामस्थ डेब्रामाळ*
*प्रतिक्रिया*
➤➤➤ डेबरामाळ ग्राम पंचायत मुखमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तनाचा एक भाग झाल्याबददल खुप आंनद होत आहे.अतिदुर्गम असलेल्या व साध्या साध्या गोष्टीपासून वंचित असलेल्या आदिवासी बाँधवाना या अभियानाच्या निमित्ताने त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यात आमचा वाटा असेल हे आमचे भाग्य समजतो. *योगिनी खानविलकर*
मा. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या जिल्हा कार्यवाह,

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा