नागरिकांच्या आरोग्याचे सोयरसूतक नाही
तळोदा शहर व ग्रामीण भागात विविध ठिकाणाहून पाण्याचा उपसा होतो. विहिरी, बोअरवेल व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विविध माध्यमातून तालुक्यातील लाखो नागरीकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होते. तळोदा तालुक्यात नुकत्याच सादर केलेल्या सर्व्हेक्षण अहवालानुसार हातपंप, विहिरी, बोअरवेल असे एकुण ६७ जलस्त्रोत आहेत. प्रशासनाकडून मान्सूनपूर्व व मान्सून सुरु झाल्यावर तालुक्यातील सर्व गावातील जलस्रोताचे नमुने संकलित करुन ते तपासणीसाठी तालुका आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले जातात. तिथे विविध पाणी नमुन्याची अनुजीव व रासायनिक तपासणी केली जाते. मात्र १२ ग्रामपंचायतींनी अद्यापपर्यंत पाण्याचे नमुनेच तपासणीसाठी पाठविले नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सदर ग्रामपंचायतींचा कामातील बेजबाबदारपणा दिसून येत असून या ग्रामपंचायतींना त्यांचा परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा आरोग्याची काहीच चिंता नसल्याचे दिसून होते.पेयजलासाठी वापर होणाऱ्या पाणी स्त्रोताची वेळोवेळी तपासणी होणे आवश्यक आहे. अनुजीव तपासणी वर्षातून चार वेळा तर रासायनीक तपासणी किमान दोनवेळा होणे अपेक्षित आहे. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विशेष अभियानात मान्सूनपूर्व व मान्सूनोत्तर अशी दोन वेळा पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. उर्वरित काळात नाममात्र शुल्क आकारुन पाणी नमुना तपासणी प्रयोगशाळेतून केली जात असल्याची चर्चा आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा