तळोद्यातील प्रभाग क्र.२ च्या नगरसेवकांचा उपक्रम अनेकवेळा फोन करूनही पालिका कर्मचारी येत नाही, कचरा साचून असतो, दुर्गंधी पसरते, रोगराई निर्माण होते, यासारख्या समस्यांवर पर्याय काढत तळोदा येथील प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक अनिता परदेशी व हितेंद्र क्षत्रिय यांच्या संकल्पनेतून स्व-खर्चाने कचरा संकलनासाठी घंटागाडी तयार करण्यात आली आहे. या वाहनाची जबाबदारी एका गरजू महिलेकडे राहणार असून ती प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन कचरा संकलन करणार आहे. मोबदल्यात त्या महिलेस १ रुपया द्यावा लागणार आहे. एक रुपयातूनच महिलेच्या पगाराची सोय होणार असून रोजगार प्राप्त होणार आहे.. दररोज एक रुपया देऊन परिसर होणार स्वच्छ तळोदा येथील प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व अनिता परदेशी यांनी नवनवीन उपक्रम राबवून एक वेगळी छाप निर्माण केली आहे. विविध समाजपयोगी कामांमुळे ते जिल्हाभरात परिचित आहेत. पालिकेमार्फत कचरा व्यवस्थापनाचा ठेका अनेकवेळा विविध कारणास्तव बंद पडतो. कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे नियमित कचरा संकलन करणे कठीण होते. परिणामी दुर्गंंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. यावर मार्ग निघावा यासाठी नागरिक पालिकेत चकरा मारतात, अनेकवेळा या कारणांमुळे वाद उफाळण्याच्या घटना घडल्या आहेत. यावर कायमचा मार्ग काढत एक नामी शक्कल प्रभाग क्रमांक २ च्या नगरसेवकांनी लढवली आहे. पालिकेवर अवलंबून न राहता प्रत्येकाने स्वावलंबी व्हावे, 'हम सब का एकही नारा साफ सुधरा हो प्रभाग हमारा' हा विचार ठेवून त्यांनी स्व-खर्चाने एक कचरा संकलन वाहन तयार केले आहे. या वाहनाची जबाबदारी एका गरीब महिलेकडे सोपविण्यात आली आहे. सदर वाहन नियमितपणे प्रभाग क्र.२ मध्ये दारोदारी जाऊन कचरा संकलन करणार आहे. पर्यायी प्रत्येक घरातून १ रुपया या महिलेस द्यावयाचा आहे. या एक रुपयातूनच या महिलेला पगार दिला जाणार आहे. त्या माध्यमातून तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार असून चिमुकल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मिटणार आहे. लग्न, समारंभ, वाढदिवस आदी कार्यक्रमस्थळी सदर वाहन दिवसभर उभे राहणार आहे. गणेश चतुर्थीचे औचित्य साधत रिद्धी-सिद्धी मंदिरात नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, अनिता परदेशी, योगेश मराठे, छोटू चौधरी यांच्या उपस्थितीत या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा