पदाधिकाऱ्यांनी नाशिक मेळाव्यात केला कॉँगेसमध्ये प्रवेश
मागील काही महिन्यांपासून भाजपात नाराज असलेले जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा. विलास डामरे यांनी नुकताच नाशिक येथे काँगेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत इतर १५ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला..
संघर्ष यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात विभागीय मेळावा नाशिक येथे घेण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील,युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे , माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत निवृत्त वनक्षेत्रपाल लक्ष्मण पाडवी, लक्ष्मण माळी, माधव मराठे, भिमसिंग ठाकरे, शाहीद पठाण, इस्माईल शेख, प्रविण पाडवी, माजी नगरसेवक भरतसिंग राहसे, शिक्षक आघाडीचे एस.डी.पाटील, भाजप युवा मोर्च्यांचे उपाध्यक्ष अमृत पावरा, राहुल पाडवी, जत्र्या पावरा,
अस्लम पिंजारी,सेवा निवृत्त प्राचार्य अशोक वाघ, शिक्षक आघाडीचे एस.एम. महिरे आदींनी कॉग्रेसमध्ये प्रवेश घेतला.यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील, तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, काँग्रेसचे तळोदा शहराध्यक्ष गौरव वाणी, माजी नगरसेवक सतीवान पाडवी, बापू कलाल, तळोदा-शहादा समन्वयक योगेश मराठे, लक्ष्मण पाडवी,कुणाल चौधरी उपस्थित होते.प्रा.विलास डामरेंसह अनेकांनी भाजपात प्रवेश केल्याने शहरात एकच चर्चा सुरू आहे..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा