Breking News

गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१८

ओंकार काका गाढे तळोदा गणेशोत्सवाचे एक आकर्षण

गणरायावर विशेष श्रद्धा असणारे तळोदा येथील ओंकार शंकर गाढे हे मागील 50 वर्षापासून सार्वजनिक दादा गणपती मंडळात सक्रिय आहेत. दरवर्षी गणरायाच्या स्थापनेपासून मूर्तीची विटंबना होऊ नये याकरिता देखरेखेची जबाबदारी त्याच्याकडे असते. त्याकरिता 11 दिवस मंडपातच त्याचा पडावा असतो. शेवटल्या दिवशी कागद व बांबू पासून साकारलेले प्राणी व पशुचे प्रतिकात्मक अवतार धारण करून ते मिरवणूकित सहभागी होतात. मागील 50 वर्षांपासून अखंडीतपणे सुरू असलेल्या हा अवतारी उपक्रम आजही मिरवणुकीचे आकर्षण ठरत आहे. ओंकार गाढे यावर्षी कुठला अवतार बनवतील याकडे सर्वांचेच लक्ष लागून असते. यंदाचा मिरवणुकीत गाढे यांनी अश्व तयार केले होते. अश्वनृत्य पाहण्यासाठी बघ्याची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. ओंकार गाढे हे हमालीचे काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. ओंकार गाढेचे सार्वजनिक दादा गणपती मंडळाला लाभलेले कार्य उल्लेखनीय आहे. यावरूनच त्यांची गणराया बद्दल असलेली श्रद्धा लक्षात येते. वयाच्या आकडेवारीत म्हातारपण आलेला पण तरुणाला ही लाजवणारे 67 वर्षीय ओंकार गाढेचा या कार्याला सर्वाच दाद मिळत आहे... ह्यापुर्वी स्व: बाबू परदेशी हे गंणेशोत्सवापूर्वी सवा महीना उपवास करुण विसर्जनाच्या दिवशी हनुमानाचे रूप धारण करत होते. त्यांचे हे रूप पाहण्यासाठी कल्लोळ गर्दी दाटत होती. त्यानंतर ओंकार गाढेनी ही परंपरा कायम ठेवली आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा