Breking News

शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

संत गोरा कुभार देखावा ठरला आकर्षण

तळोद्यातील बडादादा गणेश मंडळाची ६० वर्षाची परंपरा चिखल मळताना विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेले गोरा कुंभार आपल्या बालकाला चिखलात तुडवतात, मात्र त्यावेळी विठ्ठल धावून येत बालकाला कसे वाचवितात हा अविस्मरणीय भक्तीमय प्रसंग तळोदा शहरातील बडादादा गणेश मंडळाने साकारला आहे. सदर जिवंत देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. . तळोदा शहरातील शनिगल्लीतील बडादादा गणेश मंडळाची स्थापना ६० वर्षा पासून करण्यात येत आहे. मंडळाकडून दरवर्षी प्रबोधनात्मक देखावे सादर केले जातात. यापूर्वी शिवाजी महाराज दरबार, फिरते कमळाचे फुल, गाढवाचे लग्न, जमिनीवर चालणारे विमान, फिरते मंदिर, कडक लक्ष्मी, असे अनेकाधिक जनप्रभोधनात्मक देखावे मंडळाने सादर केले आहेत. यावर्षी जनप्रबोधन देखाव्याची परंपरा कायम ठेवत १९६७ साली राजू ठाकूर यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘संत गोरा कुंभार’ या चित्रपटातील देखावा सादर केला आहे. यात गोऱ्या कुंभराची पांडुरंगावरील असलेल्या अतूट भक्तीचे दर्शन घडविले आहे. भक्त्तीत तल्लीन झालेला गोरा कुंभार हा प्रत्येक घटकात पांडुरंगाचे नाम स्मरण करतो..
एकेदिवशी त्याची पत्नी तानुल्या बाळाची जबाबदारी सोपवून नदीवर पाणी भरण्यास जाते. पांडुरंग नामस्मरनात तल्लीन होऊन कुंभार हा मटकी घडण्याकरिता माती मळनेचे काम करत असतो. दरम्यान चिमुकले बालक किंकाड्या करून जोराजोराने रडू लागते. मात्र भक्त्तीत तल्लीन झालेल्या गोरा कुंभाराला त्याचे भान नसते. बाळ रेंगाळत रेंगाळत पायीखाली येते. भक्त्तीत वेळा झालेला गोरा कुंभार अक्षरशः पाया खाली आपले चिमुरडे बाळ तुडवुन काढतो. त्याची पत्नी पाणी भरून परतल्यावर घडलेला सर्व प्रकार पाहते. पायाखाली रक्तभभाळ अवस्थेत पडलेल्या बाळाला पाहून माझे बाळअअअअअअ अशी जोराची किंचाळी देते. कसे वडील आहेत तुम्ही, स्वतःच्या पोटाचा पोराला पायाखाली चिरडून मारून टाकले. तरी सुद्धा तुला विठलाची पडलीय,
त्यावेळी भानेवर आलेल्या कुंभार सर्व प्रकार पाहून अचंबित होतो. हे कसे घडले त्यावर त्याला विश्वास बसत नाही. तो हमरडा फोडून रडतो. विठला कुठल्या पापाची शिक्षा दिली असा प्रश्न करतो. हे ऐकून त्याची पत्नी विठलाचा अंध भक्त्तीत तुला तुझा स्वतःचा मुलगा दिसला नाही. तू त्याला पाया खाली रोंदले, हत्यारा आहेस तू, पापी आहे. एवढे होऊनही त्या काळ्या विठलाचे नाव काढतोय. ज्याचे तुझ्या पूजा अर्चनाने पोट भरले नाही. तुझा एकुलता एक मुलाचा बळी तुझ्याकडून मागितला. अश्या कठोर हृदयाचा काळ्या देवासाठी माझ्या घरात जागा नाही. या दगडाला बाहेर काढ जर मी हे पहिले केले असते तर आज हा दिवस आला नसता. अश्यावनिक शब्दात राग व्यक्त करून विठलाची मूर्ती घरा बाहेर नेते. तेवढ्यात गोरा कुंभार तिच्या हातातून मूर्ती घेतो. व असा अनर्थ करू नकोस म्हणतो. यानंतर विठलाचे दर्शन होते. अश्या परिस्थितीत सुद्धा तू माझी साथ सोडली नाहीस,
माते तुझ्या मुलांसाठी देवासोबत सुद्धा भाडण्यास तू तयार झाली. जसा आईसाठी तिचा पुत्र तसाच माझ्यासाठी माझा भक्त असे म्हणत विठ्ठल त्या बाळाला जीवदान देतो. या देखाव्यात गोरा कुंभाराची भूमिका पवन गुरव यांनी साकारली तर त्याची पत्नीची भूमिका गौरव गुरव याने साकारली आहे. अत्यंत सात्त्विक असा चेहरा आणि भावना ओतून साकारलेल्या ही भूमिका पाहण्यासाठी आलेल्या भक्ताचा अंगावर शहारे उभे करत आहे. सदर देखावा पाहताना अनेकांचे डोळे पाणावत आहे. देखावा सादरीकरनासाठी निंबा गुरव , भिला गुरव, तुषार गुरव, दिनेश लोहार,नितीन दातीर, रितेश देडगे, महेंद्र गुरव, सनी पाटील, हरीश साळुंखे, सुयोग पाटील, गोकुळ मिस्तरी, राकेश गुरव,सूरज शिंपी, नंदू पाटील, शिरीष भावसार आदींसह सदस्यांनी संयोजन केले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा