शहरातील सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याच्या शक्यतेने प्रभाग क्र.२ मधील नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व संदीप परदेशी यांनी सफाई कर्मचाऱ्यांना मास्क वाटप केले. .
तळोदा शहरात दररोज घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी येते. नागरिक रोजच्या-रोज कचरा टाकत नसून तो घरात साठवून ठेवतात. त्यामध्ये, शरीराला घातक किडे, मुंग्या, अळ्या, माश्या तयार होतात. कर्मचारी मोजे किंवा मास्क न घालताच हॉटेल व्यवसायिक तसेच नागरिकांनी दिलेला कचरा वाहनांमध्ये बसून वेगळा करतात. शहरात अनेकवेळा कुत्रे,डुक्करे आदी प्राणी मृत्यूमुखी पडून कुजतात. दरम्यान कचऱ्यामध्ये काम करतांना कामगारांनी सुरक्षा साधने वापरणे बंधनकारक असते. परंतु ठेकेदारांकडून अशीे साधने उपलब्ध केली जात नसल्याने प्रभाग क्र.२ चे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, अनिता परदेशी व त्यांचे पती युवा जिल्हा उपाध्यक्ष संदीप परदेशी यांनी सफाई कामगारांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करत त्यांना मास्क वाटप केले. तर यापूर्वी सफाई कर्मचाऱ्यांना सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. मात्र कर्मचारी ते वापरत नसल्याचे आढळून आले आहे. सदर बाब आरोग्याच्या दृष्टीने घ.ातक असल्याबाबत त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक सुविधा पुरवित नसल्याने ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे. .
अटी शर्ती प्रमाणे कामे करणे मक्तेदारावर बंधनकारक आहे. आरोग्याच्या दृष्टीने सफाई कर्मचाऱ्यांना हातमोजे व मास्क पुरविणे बंधनकारक आहे. संबधित ठेकेदाराला याबाबतचे पत्र देण्यात आले आहे.. -जनार्दन पवार, मुख्याधिकारी.
अटी शर्ती प्रमाणे कामे करणे मक्तेदारावर बंधनकारक आहे. आरोग्याच्या दृष्टीने सफाई कर्मचाऱ्यांना हातमोजे व मास्क पुरविणे बंधनकारक आहे. संबधित ठेकेदाराला याबाबतचे पत्र देण्यात आले आहे.. -जनार्दन पवार, मुख्याधिकारी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा