Breking News

सोमवार, १४ जून, २०२१

तळोदा तालुक्यातील पोलीस पाटील ही दिसणार गणवेशात : मासिक सभेत संघटनेचा निर्णय

तळोदा:- तळोदा येथे पोलीस पाटील संघाची मासिक सभा रविवारी तळोदा पोलीस ठाण्याचा आवारात पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडली. 

             तालुक्यातील पोलीस पाटील यांची बैठक रविवारी प्रशासकीय इमारतीचा आवारात घेण्यात आली. या बैठकीत पो.नी सोनवणे यांनी सर्व पोलीस पाटील यांना लसीकरण मोहिमेत सहभाग घेऊन आपापल्या गावातील लसीकरण 100% कसे करता येईल या संदर्भात सूचना दिल्या. यासोबतच पोलीस पाटील यांनी एक नोंद वही ठेवून त्यात आपआपल्या गावातील गुन्हे किती व कोणत्या स्वरूपाचे अथवा कश्या प्रकारचे आहेत या संदर्भात नोंद ठेवण्याचे आवाहन केले. 
              पोलीस पाटील हा प्रशासनाच्या दुवा असून गावात वादविवाद होणार नाहीत यासंदर्भात लक्ष द्यावे किरकोळ वादविवाद झालेच तरी ते गावातच आपापसात मिटवावे पक्षपाती पणा करू नये, गावात शांतता टिकून राहील यासाठी सर्व पोलीस पाटीलानी यत्नशील राहून शांतता कशी निर्माण होईल याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.
               भांडण-तंटेमुळे गावाच्या विकास खुंटतो, तंटामुक्त गावांला शासनाकडून विविध प्रकारच्या निधी मिळतो. त्या निधीचा साह्याने गावाच्या विकास करता येऊ शकतो. माळखुर्द येथील पोलीस पाटील आकाश वळवी यांनी आपली नोंदवही दप्तर अतिशय योग्य प्रकारे असल्यामुळे पंडित सोनवणे यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
              पोलीस किंवा होमगार्ड यांनी परिधान केलेल्या गणवेशावरून सहज त्यांची ओळख पटते. पोलीस पाटील यांचे ड्रेस कोड नेमल्यास सहज पोलीस पाटील असल्याचे ओळखता येईल. अशी संकल्पना पो.नी पंडित सोनवणे यांनी मांडली. यांच्या या प्रस्तावाला पोलीस पाटील संघटनेने सकारात्मक प्रतिसाद देत पुढील बैठकीला एकाच ड्रेस कोडवर उपस्थित राहण्याचे आश्वासन संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बापू पाटील व तालुका अध्यक्ष अशोक पाडवी यांनी दिले. या बैठकीत तालुक्यातील पोलीस पाटील, पो अजय कोळी, मगन पाडवी, रवींद्र वळवी, गुलाबसिग पाडवी, दीपक ठाकरे, रवींद्र नाईक, हूरजी गावित, भरतसिग पावरा तसेच महिला वर्ग व इतर 50 ते 55 पोलीस पाटील उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा