तळोदा : तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षपदी सुनिल सुर्यवंशी, शहर उपाध्यक्षपदी सम्राट महाजन, ग्रामीण उपाध्यक्ष नारायण जाधव, सचिवपदी उल्हास मगरे तर कोषाध्यक्षपदी सुधाकर मराठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक माजी अध्यक्ष विकासदीप राणे यांच्या अध्यक्षतेखाली सोशल डिस्टन्सचे पालन करीत रविवारी वनविभागाचा विश्रामगृहात वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीस नूतन कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसह तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक प्रा.ए.टी. वाघ, भरत भामरे, मंगेश पाटील, ईश्वर मराठे, किरण पाटील, विकासदीप राणे, महेंद्र लोहार, नरेश चौधरी, हंसराज महाले, दिपक मराठे, सुशील सूर्यवंशी, राकेश गुरव, मानसिंग राजपूत, अक्षय जोहरी, राहुल शिवदे, आदी उपस्थित होते.
सुरुवातीला मावळत्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले. बैठकीत मागील हुशोब व इतिवृत्त वाचून दाखविण्यात आले. बैठकीत साधक बाधक चर्चा होऊन अध्यक्षपदी सुनिल सुर्यवंशी, शहर उपाध्यक्षपदी सम्राट महाजन, ग्रामीण उपाध्यक्ष नारायण जाधव, सचिवपदी उल्हास मगरे तर कोषाध्यक्षपदी सुधाकर मराठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
संघाच्या पुढील कार्याचे नियोजन करून अधिक जोमाने काम करण्याचे ठरले. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आला. पत्रकार संघाच्या माध्यमातून दरवर्षीय गणेश आरास स्पर्धा, दिवाळी स्नेह मिलन, वार्तांकन स्पर्धा, गरजूना उबदार कपडे वाटप, इफ्तार पार्टी, महिला दिना निमित्त महिलाचा सम्मान, पत्रकार दिनी जेष्ठ पत्रकारांचा सन्मान, तसेच पेपर विक्रेत्याच्या सत्कार, विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सत्कार आदींसह समाजपयोगी कार्यात तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ अग्रेसर आहे. पत्रकार संघाची निवडीनंतर विविध क्षेत्रातुन त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा