गणेश स्थापनेच्या दिवशी बोअरवेल करण्याचा निर्णय घेतला. मात्र स्थापने नंतर म्हणजेच १ सप्टेंबर २०२२ रोजी प्रत्यक्षात बोरवेल करण्यास सुरुवात केली, पाणी कोणत्या दिशेला लागेल याबाबत कुठल्याही तज्ञाशी चर्चा न करता अथवा कुणालाही न दाखवता पाणी या ठिकाणी हमखास लागेल, कारण चिंतेश्वर महादेव शेजारी आहे याशिवाय पश्चिमेला बाजूला सार्वजनिक व उत्तरेला खुशाल सागर यांचे असे साधारणत: २० फुटाच्या अंतरावर दोन बोअरवेल असल्याने पाणी लागेलच अशी श्रद्धा व आत्मविश्वासावर आम्ही बोरवेल करण्याचा निर्णय घेतला. घराचा लांबी रुंदी नुसार व घर बांधकाम सर्व सोय सुविधायुक्त यावे याशिवाय आपल्यामुळे अन्य कुणाला अडचण भासू नये म्हणून जागेच्या अनुषगाने बोअरवेल बैठक हॉल मध्ये म्हणजेच घराचा ईशान्य कोपऱ्यात येणार होती. तसेच आज दोन खोलीचे नियोजन असल्याने व भविष्यात काही बदल केल्यास एक खोलीचे बांधकाम केल्यास सदर बोअरवेल ओट्यावर यावे म्हणून मंदिरापासून ६ फूट व पश्चिममे कडील असलेले शेजारी राजेंद्र बोरसे (शिंपी) यांच्या घराला लागून साधारणत: १७ फूट येवढे बोअर करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता ठेकदार दिलीप शिंदे, इंजि. आयुष्य गांधी यांनी प्रत्यक्ष भेटून मोजमाप करून जागा निश्चित केली.
गुरूवार (१ सप्टेंबर २०२२) रोजी आई-वडिलांचा आशीर्वादाने त्यांच्याच हस्ते बोरवेलचे पूजन करून सुरुवात केली. दुपारी उशिरा काम सुरू झाल्यामुळे पहिल्या दिवशी केवळ चाळीस फूट खोल बोरवेल करण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी दिनांक २ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजेपासून ते एक वाजेच्या दरम्यान पुन्हा ४० फूट खोल बोरवेल करण्यात आली. ऐंशी फुटावर मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याचे संबंधित बोरवेलकर्त्यांनी सांगितले. त्या अनुषंगाने या दिवशी दिवसभरात साधारणता १५० फूट खोल बोरवेलचे पाईप आम्ही उतरवले.
उद्या दिनांक ३ सप्टेंबर २०२२ रोजी देखील पुन्हा वीस ते तीस किंवा चाळीस फूट पावतो खोल बोरवेल जाऊ देण्याचा आमचा इरादा होता मात्र अखेर १६० फुटा पावेतोच बोअर गेले, बोरवेल झाल्या नंतर सुपर टेक कंपनीचे सहा इंची पाईप पीयुष गांधी, गांधी ट्रेडर्स यांच्याकडून १९०० रू प्रमाणे ८.५ पाईप खरेदी केले. सोलेशन ५०० रू व भाडे ५०० असा एकूण खर्च आला. काळ्या रंगाचे पीव्हीसी पाईप व डुक् कंपनीचे १.५ ची मोटार व स्विच शहरातील अण्णा भोई यांच्याकडून २२००० रू घेतला.
कष्टभंजन बोअरवेल बबलू महाजन (खान्देशी गल्ली) यांना ९० रू फूट प्रमाणे बोरवले करण्याचे काम दिले. सुरुवातीला ६०० रू खड्डे करण्यासाठी दिले. त्यानंतर दोन माणसे प्रकाश वळवी (बहुरूपा) व पिंटू वळवी (कढेल) येथील २ घे जणांनी बोअरवेलचे खड्डे केले. शेवटी बोअरवेल धुण्यासाठी ३२०० रू लागले. बोअरवेल करताना लागणारे पाण्याचे टँकर अनिलभाऊ मोरे (भोई) यांनी उपलब्ध करून दिले. अश्विनभाऊ परदेशी यांनी अग्निशमन वाहन उपलब्ध करून दिली. ४ सप्टेंबर २०२२ रोजी बोअरवेलचे होल साधारणतः ४ तास मोटार सुरू ठेवून धुण्यात आले. अपेक्षेप्रमाणे पाणी लागल्याने सर्वांचा सेहऱ्यावर समाधान पहावयास मिळाले.
बोअरवेल कुठे करावी कशी करावी, किती खोल करावी, पाईप किती उतरवावे, बोअरवेल दरम्यान लागलेली रेतीत असलेले लहान सफेद दगडांवरून पाणी साठा मुबलक असतो, बोअर खड्डे अधिकाधिक स्वच्छ करावे ज्यामुळे जमिनीतील झरे मोकळे होतात व पाण्याची क्षमता वाढते, कुठल्या कंपनीचे पाईप टाकावे, मोटार टाकावी अश्या बारीक सारीक बाबी व अन्य बारकावे गल्लीतील शशिकांत माळी, सचिन माळी, धीरज माळी, राहुल सागर, विलास हिवरे, जगन्नाथ अग्निहोत्री, व्ही.बी.पाटील, गौरव वाणी, सुनील सुर्यवंशी (कालू भाऊ), अक्षय जोहरी मोठे बंधू योगेश मराठे आदीनी समजवले यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचे खूपच सहकार्य लाभले...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा