कर्तृत्व सिद्ध करावे लागते
या उक्ती प्रमाणे राजकीय वारस असला तरीही ते सिद्ध करणे टिकवून ठेवणे व वारसा पुढे नेणे हे महत्वाचे असते असेच काही सिद्ध करत वारसा पुढे नेणारे युवा नेतृत्व म्हणजे शहरातील राजकारणात अवस्थेत येत असून अनेक तरुण राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शहरात सर्वच राजकीय पक्षात तरुण असले तरी एक नवीन सुशिक्षित चेहरा तळोदा शहराचा जनतेसमोर येत असून कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असल्याने ज्या व्यक्तीकडे भविष्यातील लोकप्रतिनिधी म्हणून जनता पाहत आहे असे जितेंद्र सूर्यवंशी.... असून तळोदा नगर पालिकेचे राजकारण असो अथवा सहकार क्षेत्र असो अथवा शैक्षणिक क्षेत्र असो सर्वच क्षेत्रात राजकीय वजन असणारे माळी कुटुंबातील एक तरुण नेतृत्व जितेंद्र सूर्यवंशी यांच्या रूपात पुढे येत आहे.
माजी नगरअध्यक्ष भरत माळी यांच्या राजकीय छत्रछायेखाली राजकीय क्षेत्रात अतिशय कमी वयात उडी घेतली असून राजकीय वारसा असल्याने विविध राजकीय डावपेच लहान पणा पासून जितेंद्र सूर्यवंशी यांनी गिरवले. याच काळात राष्ट्रीय काँगेसचा माध्यमातून त्यांचा संपर्क युवा काँग्रेस संघटनसाठी काम करत असताना सत्यजित तांबे यांच्या जवळ आला. एक विचार जुळले त्यामुळे राष्ट्रीय काँगेसचे तांबे यांचा विश्वास असल्याने त्यांना युवक काँग्रेसची जिल्ह अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली मागील काळात झालेल्या राजकीय घडामोडी तसेच जिल्हा व शहरातील राजकीय वातावरण पाहता अत्यंत धाडसी निर्णय घेत त्यांनी भाजप प्रवेशाबाबत निर्णय घेतला. दरम्यान हा निर्णय घेत असताना त्यांना अनेक स्वकीय यांनी निर्णय घाईत घेवू नका असे सांगितले. मात्र जितेंद्र माळी यांनी अतिशय विचाराअंती भाजप प्रवेश निश्चित केला. आपले कुटुंब जरी काँग्रेस संघटनेत सुरुवातीपासून काम करत असेल तरी विकास हा मुद्दा महत्वाचा असून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडवणीस तसेच डॉ विजय कुमार गावित तसेच विद्यमान आमदार राजेश पाडवी यांचा कामाचा झंझावात पाहून हा निर्णय घेतला आहे. आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शाखाली पुढील राजकीय वाटचाल ते आता चालणार आहेत. त्यांची तिसरी पिढी मागील राजकारणात पुढे येत असून त्यांचे बाबा स्व. बबनराव छगनराव माळी यांनी नगरअध्यक्षपद भूषविले होते. त्यांचा आजी विमलताई बबनराव माळी या देखील नगर अध्यक्ष व नगरसेविका होत्या. तर त्यांचे काका भरत माळी यांनी तळोदा नगर पालिकेवर तब्बल तीन दशके राज्य केले असून त्यांचे वडील लक्ष्मण बबनराव माळी हे समाजकार्य सोबतच शेक्षणिक संस्था सांभाळत आहेत. तर काका संजय माळी हे आज सभागृहातील सर्वात जेष्ठ नगरसेवक आहेत.
याबाबत जितेंद्र सूर्यवंशी यांची भेट घेतली असता त्यांनी त्यांचा राजकीय वाटचालीबाबत सांगितले ....... मला राजकीय वारसा जरी असला तरी मी स्वतः ग्राऊंडवर जाऊन काम केल्याने शहरातील युवकांचा मोठा प्रतिसाद मला या काळात मिळाला. मला पहिली संधी मिळाली ती म्हणजे स्वीकृत नगरसेवक म्हणून. ही नियुक्ती पद्माकरजी वळवी साहेब. भरतभाई माळी यांनी दिली त्यामुळे शहरातील लोकांचा समस्या जाणून सोडविण्यासाठी प्रयत्न केलेत.
मा.ना. के.सी पाडवी साहेब व सत्यजीतदादा तांबे यांनी जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्या माध्यमातून जिल्हाभरात हेल्पलाईन नंबर दिला. कोविड काळात लोकांची सेवा करू शकलो. जिल्ह्यात स्वतंत्र कॉविड तपासणीसाठी लॅब मंजुरीसाठी मागणी केली व तत्कालीन पालकमंत्री मा.ना.के सी.पाडवी साहेब यांनी मंजुरी दिली. त्याचा काळात सत्यजीतदादांच्या मार्गदर्शन खाली जिल्हाभरात गरजू लोकांना शिधा वाटप, गरजूंना दैनंदिन अन्नदान, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संधी -सोबत मिळाली हे कार्य करत असतानाच जिल्हा भरातून युवकांचा प्रतिसाद मिळाला.
कृषी उत्पन्न बाजार संचालक म्हणून मा. आ. उदेसिंग समितीच्या प्रशासकीय नियुक्त संचालक म्हणून दादा यांचा नेतृत्वाखाली काम करायची संधी मिळाली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या तळोदा शहरातील नामांकित ह शाळेच्या मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर शाळेचा 3 चेहरा मोहरा बदलला, गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केलंत यात सर्व कर्मचारी सहकाऱ्यांचे मन जिंकुन त्यांचा सोबत काम करून त्यांच्यातला एक सहकारी म्हणून वावरत असतांना त्यांचा समस्या समजल्या त्या एक संघ होऊन सोडविण्यासाठी प्रयत्न केलेत.
सत्यजीत दादा यांचा एस.एम. गर बी.टी. हॉस्पिटलच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक गरजु लोकांना पण वैद्यकीय मदत करून देता येत आहे. मा आ राजेश पाडवी यांचा वाढदिवसाच्या औचित्य साधुन महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले त्यात १०७७ रुग्ण तपासणी करून आवश्यक त्या शस्त्रक्रियासाठी घोटी येथील एस.एम. बी. टी. हॉस्पिटल येथे य रुग्णांना स्वखर्चाने पाठवले. अजूनही गरजू रुग्णांना जरी त्याठिकाणी सवलतीत योजनेतून उपचारासाठी मदत होत असते. शहरात एक नावीन्य उपक्रम राबविला मला wifi zone स्मारक चौक परिसरात सेवा आजही कार्यरत आहे. जेव्हा इतर शहरात जात असतो गून त्यावेळेस त्या त्या ठिकाणी जे जे चांगले आहे ते ते माझ्या शहरातही असले पाहिजेल या भावनेतूनच प्रामाणिकपणे सर्वच समाजातील युवकांना सोबत घेऊन काम सुरू आहे....
कोविड काळात लसीकरणचे विविध शिबिर राबविली. दरवर्षी गरीब व होतकरू विद्यार्थीसाठी शेक्षणीक साहित्य वाटप केले जाते. तसेच १७ जानेवारी सुधीर तांबे यांचा वाढदिवसानिमित्त पुस्तक दिवस म्हणून साजरा करत पुस्तकांचे वाटप केले जाते.
*वारसाने संधी मिळते कर्तव्य हे सिद्ध करावे लागते.*
यावडीप्रमाणे मी माझा काम गेली पाच वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे अविरत करत आहे प्रसिद्धीच्या मागे कधीही लागलो नाही माझा उद्देश एकच ठेवला आपण केलेल्या कार्याचा लाभ हा सरळ लाभार्थ्याला कसा होईल. यासाठी प्रयत्न करत आलो. तसेच जो नवीन काहीतरी करण्यासाठी धडपडत असतो त्याला माझी पाठिंबा असतो. .
*सर्व जाती धर्माला संधी देणारे कुटुंब*
भरतभाई माळी यांनी मागील ३५ वर्षात त्यांचा राजकीय वाटचालीत. कोणत्याही एका समाजाचे नेतृत्व न करता सर्व जाती धर्माचे समाजाचे लोकांना सोबत घेत वाटचालच केली नाही तर अनेकांना राजकीय दृष्ट्या उभे केले व राजकीय संधी दिल्या तसेच मोठ मोठ्या पदावर सन्मान दिला. विविध समाजाचे लोकांना नगरसेवक यात नगर अध्यक्ष, उपनगरअध्यक्ष, नगरसेवक स्वीकृत नगरसेवक त्यात आदरणीय दीपाली वळवी पहिल्या आदिवासी महिला नगराध्यक्ष बसवत असताना भरतभाई यांचा त्यात सिंहाचा वाटा होता. तसेच कलाल समाजाचा आदरणीय ताराबाई बागूल कलाल समाजातील नगराध्यक्ष केल्या. रत्ना चौधरी चौधरी समाजातील नगराध्यक्षा केल्या. वाणी समाजातील अल्पसंख्याक व्यक्ती गौरव वाणी याना उपनगराध्यक्ष केलं. रुकसनाबी सैय्यद उपनगराध्यक्ष, नंदूगिर गोसावी यांना उपसभापती पं.स. सदस्य मार्केट कमिटी मार्केट कमिटी, विजय क्षत्रिय यांना स्वीकृत नगरसेवक पद दिले. दत्तात्रय पाटील उपसभापती त्यांचा नेतृत्वखाली हितेंद्र क्षत्रिय तसेच संदीप परदेशी यांचा पत्नी अनिता परदेशी या नगरसेवक पदी निवडून आल्या असे अनेक लोकांना सर्व समाजातील घटकांना विविध क्षेत्रात संधी दिली.
*भरतभाईचे तळोदा शहरातील महत्त्वाचे निर्णय*
तापी पाणी शुद्धीकरण प्रकल्प अंतिम टप्यात आणला. तसेच राज्याचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित व तत्कालीन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कुमुदिनी गावित यांचा माध्यमातून १२ कोटी रुपये इतका निधी जलशुध्दीकरण प्रकल्पसाठी सतत पाठपुरावा करून मंजूर करून आणला. त्यात पहिल्या टप्प्याचा निधी त्याच काळात प्राप्त झाला. तसेच पालिकेचे व्यापारी संकुलाचे निधी मंजूर व भूमिपूजन त्यांच्याच काळात झाले. नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे निर्माण हद्दवाढ प्रस्ताव तयार करून मंजुरी मिळवली. नवीन वसाहतीत खुल्या जागा संरक्षण भिंती, गार्डन निर्माण शहादा रोड दुभाजक शहरातील जुने चिखलमय रस्ते चे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यास सुरवात त्यांचा नेतृत्व खाली असणाऱ्या माजी नगर अध्यक्षा रत्ना सुभाष चौधरी यांचा काळात झाली. शासनाकडे पाठपुरावा करत मोठा निधी याच काळात आला. भरतभाईकडे त्यांचे पिताश्री बबनराव पहेलवान यांचा समर्थ वारसा आहे. ते राज्यातील नामांकीत कुस्तीपटू होते. १९६५ साली तळोद्याचे नगराध्यक्ष होते. मातोश्री विमलताई माळीही नगरसेविका होत्या. पत्नी सौ. योजनाताई माळी ह्या विद्यमान नगराध्यक्षा आहेत. तसेच त्यांचे मोठे बंधू आप्पासाहेब लक्ष्मण माळी हे शेक्षनीक व सामजिक क्षेत्रात सदैव सक्रिय असतात तर लहान काका संजय माळी हे आज सर्वात ज्येष्ठ नगरसेवक म्हणून परिचित असून श्री गणेश सोशल ग्रुपचा माध्यमातून विविध उपक्रम राबवित असतात. आज या राजकीय दृष्ट्या संपन्न असणाऱ्या कुटुंबाचा राजकीय वारसा जितेंद्र सूर्यवंशी यांच्या खांद्यावर आला आहे. अनेक अडचणींवर मात करत आला त्याचा सोबत नाही आला त्याचा विचार न करता... राजकीय वाटचाल करत आहेत. कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी काय करावे लागते या बाळकडू त्यांना लहान पणी मिळाले असले तरी त्या काळातील राजकीय स्थिती व आजची राजकीय स्थिती या दोघांची सांगड घालून नवीन जे आवश्यक बदक ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबत कुटुंबाची अनुभवाची शिजोरी आहेच. येणाऱ्या काळात ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी सर्व समाज व जाती धर्मांना सोबत घेवून नवीन दृष्टीकोन घेत तळोदा शहराचा विकासासाठी पक्ष संधी देईल त्या पदावर राहून बदल करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
बबनराव पेहलवान यांचा तळोदा शहरातील सांस्कृतिक वाटचालीत एक वेगळेच महत्व होते. पूर्वी या कुटुंबाचा लाकूड व्यवसाय होता त्या वेळी शहरातील मानाचा दादा गणपतीचा मंडपासाठी लागणारे लाकडी खांब पुरवण्यासाठी स्व. बबनराव पेहलवान यांची मोलाची साथ लाभली होती.तसेच शहरातील कालिका मात्रा उत्सव काळात पूर्वी त्यांचा स्मारक चौकमधील हॉटेल गणेश समोर उंच लाकडी मंडप हे आकर्षण होते. त्यांना व्यायामाची प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यांनी त्यांचे कुस्ती प्रेम पाहता इतर तरुण मुलांना देखील कुस्ती खेळण्यासाठी संधी मिळावी म्हणून व्यायामशाळा काढली व तरुणांना व्यायामाबाबत प्रेरित केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा