Breking News

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

स्वकर्तृत्वावर उभारलेला व्यवसाय आणि दुर्लक्षित राजकीय कार्यकर्ता: गोकुळ पवार

15 डिसेंबर 2023
           

स्वतःच्या मेहनतीने आणि चिकाटीने यशस्वी व्यवसायिक बनलेला गोकुळ पवार हा एक उद्यमशील व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या प्रवासाची सुरुवात वडिलांकडून चालविल्या जाणाऱ्या सुतारकामाच्या पारंपरिक व्यवसायापासून झाली. शिक्षण अर्धवट ठेवून गोकुळने वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी रंधा हातात घेतला. प्रामाणिक मेहनत, कामाशी प्रचंड निष्ठा आणि हळव्या स्वभावामुळे गोकुळने या व्यवसायात आपले वेगळे स्थान निर्माण केले.
क्रिकेटमधील सुरुवात

९० च्या दशकात गोकुळ क्रिकेटमुळे परिसरात ओळखला जाऊ लागला. शनिगल्लीतील "जय महाराष्ट्र" संघ आणि "त्रिमूर्ती क्रिकेट संघात" खेळणाऱ्या गोकुळने आपल्या दमदार खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खेळातला लढवय्या स्वभाव आणि स्वभावातील विनोदबुद्धीमुळे तो सगळ्यांचा लाडका बनला.

व्यवसायिक यश

लाकडी सुतारकामाच्या पलीकडे पाहत, गोकुळने ॲल्युमिनियम सेक्शनमध्ये नशीब आजमावले आणि या क्षेत्रात यशस्वी ठरला. त्याने नंतर ग्लासच्या कामाकडेही वळण घेतले आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर तालुक्यातील एक प्रतिष्ठित व्यवसायिक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

राजकारणातील प्रामाणिक कार्यकर्ता

प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणी असलेला गोकुळ सुरुवातीपासूनच शिवसेना-भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता राहिला आहे. २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारीची अपेक्षा असतानाही वरिष्ठांच्या आदेशामुळे त्याला अर्ज मागे घ्यावा लागला. त्याच्या प्रामाणिकतेचा सन्मान म्हणून दरवर्षी स्वीकृत नगरसेवक पद देण्याचे आश्वासन मिळाले, पण त्याची पूर्तता झाली नाही. भाजपमधील एकनिष्ठ पण दुर्लक्षित कार्यकर्त्यांमध्ये गोकुळचे नाव आवर्जून घेतले जाते. भोळा आणि आपलेपणाने वागणाऱ्या गोकुळने गरिबीतून उभारी घेत कुटुंबाला यशस्वीपणे सक्षम केले आहे.

मस्तीखोर आणि आनंदी व्यक्तिमत्त्व

          गोकुळ पवार हे नाव जसे त्यांच्या व्यवसायिक कर्तृत्वासाठी परिचित आहे, तसेच त्यांच्या मस्तीखोर आणि आनंदी स्वभावासाठीही ते साऱ्यांच्या हृदयात खास जागा निर्माण करतात. स्वतः हसत राहणे आणि इतरांना हसवत ठेवणे हा त्यांचा स्वभावच, ज्यामुळे कुठलेही वातावरण त्यांनी आनंदी आणि जिव्हाळ्याचे बनवले आहे.

         गोकुळचा हा गुण फक्त दैनंदिन आयुष्यातच नाही, तर प्रवासातही तेवढाच ठळकपणे जाणवतो. त्यांच्या सोबत अमरनाथ यात्रा, केदारनाथ-बद्रीनाथ अशा पवित्र तीर्थयात्रा केल्या, ज्यामध्ये त्यांनी आपल्या मस्तीखोर स्वभावाने आणि विनोदबुद्धीने संपूर्ण प्रवास स्मरणीय बनवला. थकवा, अडचणी यांसारख्या गोष्टी त्यांच्या सोबत राहून कुणालाच जाणवल्या नाहीत. त्यांचा हास्यविनोद, गमतीदार किस्से आणि इतरांना आनंदी ठेवण्यासाठी लढवलेल्या विविध क्लृप्त्या या प्रवासाला नेहमीच लक्षात राहणारे क्षण बनवून गेल्या.
             गोकुळचा हा स्वभाव म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जिवंतपणा आणि समाजात ते जोडलेल्या नात्यांची साक्ष देणारा आहे. कुठल्याही प्रसंगात त्यांच्या सोबत राहिलेले लोक त्यांच्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांची सोबत सतत हवीशी वाटते. गोकुळ पवार यांनी आनंद देत आणि निखळ हसत-हसवत केलेले हे क्षण आपल्या सर्वांसाठी कायम प्रेरणादायी राहतील!

            कष्टातून स्वतःचे जीवन उभारणाऱ्या आणि समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या गोकुळ पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपले कर्तृत्व असेच प्रेरणादायी राहो आणि राजकारणातही योग्य स्थान मिळो, हीच सदिच्छा!

शनिवार, २ डिसेंबर, २०२३

दिपक परदेशी: चप्पलविरहित कार्यकर्ता आणि भाजपाचा निष्ठावंत

दिपक परदेशी हे नाव म्हणजे ऊर्जा, आत्मविश्वास, आणि निष्ठेचे प्रतिक. त्यांच्या साध्या राहणी, परंतु प्रभावी स्वभावामुळे ते आज लोकांमध्ये चर्चेचा विषय आहेत. पायात कधीही चप्पल न घालणारा, हाप चड्डी आणि टी-शर्ट असा नेहमीचा पेहराव करणारा हा माणूस मित्रांमध्ये आणि समाजात एक वेगळा ठसा उमटवत आहे.

हिंदुत्व आणि भाजपाच्या कार्यात अग्रणी

हिंदुत्वाच्या प्रचारासाठी असो किंवा भारतीय जनता पक्षाच्या पाठराखणीसाठी, दिपक कधीच मागे हटत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपाचा झेंडा हातात घेऊन तो अग्रस्थानी दिसतो. कुठलाही मतदारसंघ असो, दिपकचे काम नेहमीच पक्षासाठी उपयुक्त ठरते. पक्षाच्या विरोधकांना उत्तर देण्यासाठी वकीलपत्र घेऊन काम करण्याची त्याची तयारी नेहमीच तत्पर असते. त्याच्या "इस्की टोपी उसके सर" या कौशल्यामुळे तो नेहमीच चर्चेचा ठरतो.

सामाजिक बांधिलकी आणि जनसंपर्क

दिपकचा दांडगा जनसंपर्क हा त्याचा सर्वात मोठा गुण आहे. मित्रपरिवार असो किंवा कार्यकर्ते, दिपक नेहमी लोकांशी संपर्क ठेवतो. नवीन रेसिपी बनवून मित्रांना खाऊ घालणे हा त्याचा आवडता छंद आहे. किचनमध्ये प्रयोग करताना तो जितका आनंदी असतो, तितकाच तो मित्रांमध्ये त्याच्या स्वयंपाकाचा आस्वाद घेताना असतो. त्यामुळे दिपकचा मित्रपरिवार मोठा आहे, आणि त्याच्या या सवयीमुळे तो नेहमी सगळ्यांच्या जवळचा वाटतो.

साध्या जीवनातून प्रभावी भूमिका

पायात चप्पल न घालण्याची त्याची सवय म्हणजे त्याच्या साध्या जीवनशैलीचे प्रतीक आहे. मात्र, त्याचा साधेपणा म्हणजे कमजोरी नाही, तर त्याच्या धडाडीची साक्ष आहे. कोणत्याही कठीण प्रसंगी कुणाशीही भिडायला तो तयार असतो. त्याच्या धैर्याने आणि निष्ठेने भाजपामधील ज्येष्ठ नेतेही प्रभावित झाले आहेत.

दिपक: एक प्रेरणा

दिपक परदेशी हे नाव म्हणजे नुसतेच कार्यकर्त्याचे नाही, तर लोकांसाठी एक प्रेरणास्थान बनले आहे. त्याचे साधेपणा, जिद्द, आणि मित्रत्वाचे गुण समाजासाठी दिशादर्शक आहेत. दिपकचे हे कार्य नेहमीच भाजपाच्या यशाला चालना देणारे ठरेल यात शंका नाही.

दिपक परदेशी यांची ओळख म्हणजे संघर्ष, साधेपणा, आणि सगळ्यांना जोडणारा एक अद्वितीय दुवा. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात असे निष्ठावंत कार्यकर्ते समाजाला दिशादर्शक ठरतात.

गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०२३

क्रिडा शेत्रातील एक अवलिया ; सुनिल सुर्यवंशी उर्फ कालू

21 व्या शतकातील हरवत चाललेला शब्द म्हणजे “मैदानी खेळ” यापूर्वी अनेक लोक एकत्र येऊन खेळ खेळत होते परंतु आज प्रत्येकाच एक स्वतंत्र मैदान आहे ते म्हणजे “मोबाईल” 6 इंच च्या डिस्प्ले हेच एक मैदान आजच्या पिढीचे क्रीडांगण झाले आहे. वयाच्या 4 ते 5 वयापासून पालक हे मैदान मुलांच्या हातात सोपवतात आणि याच 6 इंच च्या मैदानात मुलं आपली आयुष्य सोपवून टाकतात. दोष फक्त फक्त मुलांचा नाही अगदी पालक वर्ग देखील मैदान आणि मैदानी खेळाबाबत उदासीन झालेत. पालक सायंकाळी मैदानावर घेऊन जाणारी पिढीच संपुष्टात येत असल्याचे धोकादायक चित्र आज आहे. 
        मात्र अश्या काळात देखील विद्यार्थ्यांना दररोज मैदानाची सवय लावण्याची कामगिरी तळोदा येथील गो.हु.महाजन हायस्कूलचे क्रीडा शिक्षक सुनील सूर्यवंशी मागील दोन दशकांपासून करत आहेत. अगदी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत केवळ मैदानावर ठाण मांडून विद्यार्थी घडवणाऱ्या एक अवलिया अशी ख्याती त्यांनी मिळवली आहे. आयुष्य जगत असताना देखील खेळाडू वृत्ती असलेले कुठल्याही खेळात मेहनतीचा व कठोर परिश्रमाचा जोरावर उत्तुंग भरारी घेणाऱ्या खेळाडूना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी धडपड करणारे अशी एक आगळी वेगळी ओळख त्यांच्या कठोर परिश्रमामुळे त्यांना प्राप्त केली आहे. खेळा बाबत असलेली आपली निष्ठा व प्रामाणिकपणा त्यांनी जोपासला आहे. त्यामुळे बऱ्याचदा संघाला त्याचे परिणाम देखील सोसावे लागले आहेत. खेळात होत असलेला लबाडी त्यांनी कधीच खपवून घेतली नाही, परिणामी जिंकत असलेला संघ त्यांनी मैदानातून काढून घेतल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्या जोरावरच शाळा, गाव, तालुका ते नाशिक विभागीय स्तरापर्यंत खेळाडू तयार करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. खेळाडू प्रती असलेला त्यांचा आदर व त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ते कायम तत्पर असतात. स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूना गणेवेश मिळावा म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक व माजी खेळाडू यांच्याशी संपर्क करून वेळोवेळी विविध खेळात सहभागी होणाऱ्या खेळाडूसाठी गणवेश उपलब्ध करून संघातील खेळाडू मध्ये एक वेगळा उत्साह निर्माण करतात.
       तळोदा येथील गो हू.महाजन (न्यू हायस्कूल) शाळेचे वरिष्ठ लिपिक सुरेश सूर्यवंशी यांचे ते लहान चिरींजव त्यांनी आपले शिक्षण बी.ए (इतिहास) बी.पी.एड. एम.पी.एड. जळगाव विद्यापीठातून पूर्ण केले. सुरुवातीचा काळ अतिशय संघर्षमय काढला, वीणा अनुदानित शाळेत आपले कर्तव्य बजावले त्यांच्यात असलेले परिश्रम क्षमता पाहून कालांतराने त्याच संस्थेत अनुदानित शाळेत त्यांना रुजू करून घेण्यात आले. त्यांचे आजोबा स्व.रणछोड सुर्यवंशी (गुरुजी) हे तळोद्यातील नामांकित शिक्षक होते. संपूर्ण गाव त्यांना गुरुजी नावाने ओळखत ज्यांनी तालुक्यात खेळा प्रती एक वेगळा आदर्श निर्माण केला. तळोदा शहर हे कुस्ती, मल्ल खांब, कबड्डी अश्या विविध खेळासाठी प्रसिद्ध होते.  पहेलवानाचं गाव’ म्हणून एकेकाळी तळोदा शहराची पहेचान होती. शहरात माजी नगराध्यक्ष स्व.बबनराव छगनराव माळी व स्व. संभाजी चौधरी असे नामांकित मल्ल त्यांच्या कसरतीत घडले. याशिवाय असंख्य यशस्वी व्यक्तिमत्त्व घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आजोबांच्या संस्कारात राहिलेले सुनिल सुर्यवंशी हे केवळ खेळाडू घडवत नसून समाजात आवश्यक असणारे विचार खेळाडूमध्ये निर्माण करून समाजात आदर्श तरुण घडवत आहे. 
 
          आदिवासी भागात खेळात मोठी प्रतिभा आहे. परंतू त्यांना संधी उपलब्ध होत नाही अशी खंत मनात असताना त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मागील अडीच दशकांपासून वर्षापासून पहाटे व सायंकाळी शालेय विद्यार्थ्यांना शालेय मैदानात खेळाडू सोबत घाम गाळत हँडबॉल या खेळाचे ते क्रीडा प्रशिक्षण देत आहेत. त्यांची सुरुवात दिवंगत क्रीडा मार्गदर्शक  व  त्यांचे गुरू प्रा.पी.पी.भोगे यांनी संघ क्रीडा मार्गदर्शक (कोच) म्हणून  वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय. चा  संघाची जबाबदारी टाकली त्यांचा मार्गदर्शनात क्रिकेट व हँडबॉल संघाला 1999 -2000 साली वरिष्ठ महावि्यालयीन संघ हँडबॉल आणि क्रिकेट या दोघे संघाने अंतर महाविद्यालयीन स्पर्धेत अजिंक्य पद पटकाविले. राजकारण विरहित असणाऱ्या अध्यापक शिक्षक  मंडळ संस्थेत संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई अरुण कुमार महाजन यांच्या व कॉलेज ट्रस्ट चे संचालक श्री अरुण कुमार महाजन दिवंगत प्रा पी.पी.भोगे संस्थेचे सचिव रमेश सूर्यवंशी यांनी क्रीडा क्षेत्रात शाळा व संस्थे मधील खेळाडूंना वाव मिळावा म्हणून त्यांची म्हणून नेमणूक केली. २००१ पासून शाळेचे क्रीडा संघ तयार करत आहेत. अनेक खेळ असले तरी त्यांनी त्यांचा आवडता खेळ हँडबॉल चे संघ तयार केले. पहिल्याच वर्षी १७ वर्षाचा संघ विभाग पातळीवर २००१ साली श्री गणेश केला. शाळा व संस्था त्यांना नेहमीच प्रोत्साहन देत आहे.आज शाळेचे प्राचार्य अमरदिप महाजन त्यांना सतत क्रीडा स्पर्धा बाबत सदैव उत्साह वाढवितात २००१ पासून हँडबॉल खेळ क्रीडा प्रकारात १४ वर्ष मुले मुली, १७ वर्ष मुले मुली, १९ वर्ष मुले मुली क्रीडा स्पर्धेत वर्चस्व राहिले आहे. नुकत्याच राज्य स्तरीय निवड समितीत  त्यांच्या संघातील ३ खेळाडूंची चाचणी घेण्यात आली. दुर्दैवाने त्यांची निवड झाली नसली तरी आगामी काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी निवड समिती समोर चांगली कामगिरी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजही सुनील सुर्यवंशी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेकरिता प्रोत्साहन देत असून क्रीडांगण हेच माझे विश्व आहे, असे मोठ्या अभिमानाने ते सांगतात. 

        विद्यार्थी व शिक्षकांचे नाते केवळ पुस्तकापर्यंत मर्यादित नाही. एक साधा शिक्षक मनात ठरवून कामाला झपाटले तर क्रीडा प्रशिक्षकाला जे सहज साध्य होत नाही ते अत्यंत कठीण काम करू शकतो हे त्यांच्या अथक परिश्रमातून दिसते. त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेत नाशिक येथे क्रीडा साधना व के.एन.डी. बहुउद्देशीय मंडळाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक तसेच क्रीडा महासंघ महारष्ट्र यांचा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार
तसेच मालती बाई नामदेव आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
*शालेय आवारात तयार केले दर्जेदार मैदान*
          शालेय आवारात हँडबॉल खेळण्यासाठी मैदान होते मात्र ते उंच सखल होते. परिणामी विद्यार्थ्यांना दुखापत होईल या भीतीने हँडबॉल मैदान तयार करण्यासाठी मदत मिळावी  म्हणून त्यांनी तत्कालीन आमदार उदेसिंग पाडवी यांच्याकडे मदतीची अपेक्षा बोलून दाखवली होती. पाडवी हे देखील पैसे देवू करत होते. मात्र पैसे न घेता लागणारे साहित्य उपलब्ध करून द्या अशी स्पष्ट भूमिका घेवून त्यांनी मैदान बनविण्यासाठी लागणारे मुरूम, विट, माती, विटाचा भुगा असे साहित्य मिळवून घेतले व प्रत्यक्ष मैदानावर घाम गाळून त्यांनी दिवस रात्र करून मैदान तयार केले.. त्यानंतर २०१७ साली  तत्कालीन आमदार उदेसींग पाडवी यांच्या हस्ते या मैदानाचे लोकार्पण करून आमंत्रित संघांच्या हँडबॉल स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

*रणछोड बाबा क्रीडा मंडळ नावाने स्पोर्ट्स क्लबची केली स्थापना*
        आजोबा स्व.रणछोड सुर्यवंशी यांचा नावाने रणछोड बाबा क्रीडा मंडळ या स्पोर्ट्स क्लबची स्थापना केली असून या माध्यमातून दरवर्षी बॅटमिंटन, हॉली बॉल या खेळासह अन्य विविध खेळाचा क्रीडा स्पर्धा दरवर्षी भरवल्या जातात. उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळाडूसाठी विनामूल्य उन्हाळी क्रीडा शिबिराचे देखील आयोजन करण्यात येते.

*आफ्टर ४० क्रिकेट लीगची केली सुरुवात*
          ९० चे दशक गाजवणाऱ्या सर्व खेडाळूना पुन्हा एकदा मैदानावर आणण्यासाठी क्रिडा शिक्षक सुनिल सुरेश सुर्यवंशी यांनी पुढाकार घेतला, सोशल मीडियावर समूह तयार करून  खेडाळूना एकत्रित केले. स्वतः मैदानावर उतरून मैदान आखणे, खेळ पट्टी तयार करणे त्यावर पाणी मारणे, रोलिंग करण्याचे कामे हाती घेतले, ७० खेडाळूनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. वेळोवेळी बैठका घेवून स्पर्धेचे नियोजन करून ६ संघ तयार करून खुल्या टेनिस बॉल वर ही स्पर्धा खेळवली. तळोदा शहर व तालुक्यातील असंख्य खेळाडू घडविणारे दिवंगत क्रीडा मार्गदर्शक प्रा.पी.पी.भोगे सरांचा स्मृती प्रित्यर्थ या स्पर्धेला त्यांचे नाव देण्यात आले. याशिवाय ६ संघाना भारतीय क्रिकेट संघाचे ज्येष्ठ खेळाडूंचे नावे देण्यात आले.

सोमवार, १७ जुलै, २०२३

सर्व सामान्यांचा जिंदादील नेता ; अजयभय्या परदेशी

सुधाकर मराठे: 
 काही व्यक्ती ह्या कितीही उंच, मोठ्या पदावर गेल्या तरी त्यांच्या सर्वसामान्यांशी असलेली नात घट्ट जुळलेली असते. त्यांच्यातील असणारा सामान्यपणा ते कधीही सोडत नाही आणि त्यांचा मोठेपणा ते समजला जातो.त्यांचा या सर्वसामान्य वागणूकीतून ते सर्वांना आपले वाटतात. त्यातूनच त्यांची लोकप्रियता दिवसागणिक वाढत जाते.तळोदा शहरातील असच एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकनियुक्त नगराध्यक्ष अजयभैय्या परदेशी. त्यांचा आज ......वा वाढदिवस.... अजयभैय्या यांच्या जन्म 17 जुलै 1973 मध्ये झाला. समाजकारण, राजकारण यांचा वारसा त्यांना घरातून लाभला. त्यांचे वडील स्व.छबुलाल ताराचंद परदेशी यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळवून देण्यासाठी संघर्ष उभा केला होता. त्यांच्या आई प्रमिलाबाई परदेशी 1984 मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांचे वडील छबुलाल परदेशी हे सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले.काही काळ त्यांनी तळोदा शहराचे उपनगराध्यक्षपदी देखील भूषवले आहे. आई-वडिलांकडून मिळालेला हा वारसा अजयभैय्या यांनी पुढे जपत आपल्या सामाजिक-राजकिय जीवनाची सुरुवात केली.


 1997 मध्ये अजयभैय्या यांच्या खांद्यावरभाजप युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून भाजपने जबाबदारी सोपविली. कमी कालावधीत त्यांच्याकडे तळोदा शहरातील लोकप्रिय युवा नेता म्हणून बघितले जाऊ लागले.सर्वसामान्य जनतेशी जुळून असलेली परदेशी कुटुंबाची नाळ व लोकांचा विश्वास म्हणून अजयभैय्या 2012 पावेतो सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले.2017 पर्यत नगरसेवक होते. 2009 भाजपा शहराध्यक्ष, 2012 साली विधानसभा क्षेत्र प्रमुख, 2015 भाजपा जिल्हा सरचिटणीस, अशी जिल्ह्याचे महत्वपूर्ण पदांची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. 2006  सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी श्रीराम सोशल ग्रुप स्थापन केला.श्रीराम सोशल ग्रुपच्या माध्यमातून शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.सार्वजनिक रामनवमी उत्सवाची सुरुवात शहरात ग्रुपच्या माध्यमातून केली गेली.याशिवाय शहरात शव वाहिनी,स्वर्ग रथ व रुग्णवाहिका ग्रुपच्या माध्यमातून चालविण्यात येते. कोरोणाच्या पहिल्या लाटेत श्रीराम सोशल ग्रुपने भरीव योगदान दिले गुजरातमधून स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोचवणे, त्यांच्या जेवणाची,शहरातील निराधार व्यक्तीना जेवण व निवासाची सोय देखील श्रीराम सोशल ग्रुपच्या वतीने सातत्याने दीड-दोन महिने करण्यात आली.  2017 मध्ये नगरपालिका निवडणूक लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळाली. त्यांना उमेदवारी मिळाल्यापासूनच त्यांचा विजय निश्चित मानला जात होता.त्यांचा जनसंपर्क त्यांच्यातील असलेल्या कणखरपणा विकास धोरण सुस्वभावी या जोरावर ते लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विराजमान झाले. लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अजयभैय्या यांनी शहरात विकासकामांचा सपाटा सुरू केला.

             शहरात विकास कामे करत असताना सुरुवातीला त्यांना तत्कालीन आमदार उदेसिंग पाडवी व विद्यमान आमदार राजेश पाडवी यांची मोलाची साथ लाभली आहे.तळोदा पालिकेत सत्ता स्थापनेपासून स्वच्छ व सुंदर शहर या मोहिमेला प्राधान्य देत आहेत. शिवाय शहरातील पायाभूत समस्या सोडवण्यावर त्यांनी भर दिला असून शहरातील रस्ते पाणी गटारीच्या समस्या पळवून शहराचा कायापालट करण्यामध्ये मोलाची भूमिका निभावली आहे शहरात प्रवेश करणारा चारही रस्त्यांना प्रवेशद्वार काम नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आले आहे. त्यापैकी शहादा रस्त्यावरील प्रवेशद्वाराचे काम गेल्या वर्षभरापूर्वी पूर्णत्वास आले असून त्याचे लोकार्पण केले गेले आहे. 'आप संत श्री गुलाब महाराज' यांचे नाव या प्रवेशद्वाराला देण्यात आले आहे. तर हातोडा रस्त्यावरील प्रवेशद्वाराचे काम पूर्णत्वास आले असून आज त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार' असे या प्रवेशद्वाराचे नामकरण करण्यात आले आहे. या शिवाय नेत्रग-शेवाडी राष्ट्रीय महामार्गावर अक्कलकुवाकडून तळोदा शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर देखील प्रवेशद्वाराचे काम हाती घेण्यात येणार आहे. 
सन 2021-22 मध्ये तळोदा नगरपालिका हद्दीतील चाचण्या रस्त्यावरील प्रवेशद्वाराचे बांधकाम, यमुना नगर मधील मोकळी जागा विकसित करणे,तळोदा शहरातील सर्वे नंबर 373 शहादा रोड कडील दक्षिण भागात दामोदर नगर अंतर्गत रस्त्यावर गटारीत बांधकाम करणे, भगवान सीताराम नगर मध्ये रस्ते पाईप गटार बांधकाम करणे,कालभैरव मंदिरापासून नगरपालिकाहद्द पावेतो गटार बांधकाम करणे, कॉलेज रोड डांबरीकरण दुभाजक व फुटपाथ, पाईप गटार बांधणे, विद्यानगरी अंतर्गत रस्ते व काँक्रिटीकरण गटार तयार करणे, आमराईफळी जवळ खर्डी नदीवर पूल बांधकाम करणे,आंबेडकर चौक ते 150 मीटर लांबी पावेतो गटारीवर स्लॅब टाकणे ही कामे सुरू आहेत.                                                                                                                                                            
 पायाभूत सुविधांच्या बाबतीत शहराचा कायापालट झाला तळोदा शहरात विकसनशील शहर म्हणून नावारूपाला आले आहे. नगराध्यक्ष अजय भैय्या परदेसी यांच्या नेतृत्वात तळोदा शहरातील बिरसा मुंडा चौकापासून तर थेट प्रवेशद्वारापर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे व गटारी वर स्लॅब टाकण्यात आहे.पथ मार्ग तयार केले गेले आहे. शहादा रस्त्यावर तीन छोट्या नाल्यांवर पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.मीरा कॉलनीत व प्रतापनगर येथे एक कोटी चार लाखांचा लॉन्च उभारला गेला असून अद्ययावत गार्डन याठिकाणी तयार झाले आहे. विमल नगर येथे ज्येष्ठ महिला व पुरुषांसाठी हक्काची खोली तसेच विरंगुळ्यासाठी उद्यान निर्मिती करण्यात आली आहे. देशपांडे फोटो स्टुडिओ पासून ते बिरसा मुंडा चौकापर्यंत नवीन नवीन रस्त्यांची कामे पालिकेच्यावतीने अजय भैय्या परदेशी यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेले आहे. बिरसा मुंडा चौक ते चिनोदा चौफुली पर्यत रुंदीकरण व दुभाजकाचे काम केले गेले आहे.हातोडा रस्ता पासून न्यायालयापर्यंत व रुंदीकरण देखील करण्यात आलेले आहे.  महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय मागील रस्तापासून मरीमाता मंदिरामार्गे हातोडा रस्त्यापर्यत रस्त्याचे रुंदीकरण व गटारी वर स्लॅब टाकण्यात आलेला आहे. विमल नगर, हरकलाल नगर, शिवरामनगर, गुरुकृपा कॉलनी, विक्रम नगर, बडा दादा नगर,खटाई माता मंदिर परिसरातील रस्ते डांबरीकरण करण्यात आले आहेत व गटारी देखील तयार करण्यात आलेली आहे. याशिवाय शहरातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी ठिकाणी ओपन जिम बसवण्यात आले आहेत त्यासाठी सुरुवातीला नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी स्वखर्चातून शहरात ओपन जिम बसवली होती.शहादा रस्त्यावर मॉर्निंग व इवेनिंग वॉकसाठी येणार्‍या नागरिकांना भक्तीमय आल्हाददायक वातावरण लाभावे यासाठी रस्त्यावर बसवण्यात आलेल्या सीट लॅम्प वर साऊंड सिस्टिम देखील अजय भैय्या परदेशी यांच्या संकल्पनेतून बसवण्यात आली आहे. याशिवाय एफ एस टी पी प्रकल्प पूर्ण कार्यान्वित आहे. कचऱ्यापासून खत निर्मिती मंजुरी प्रस्तावित असून अजयभैय्या परदेशी यांच्या पुढाकाराने पालिका राज्यात 49 क्रमांकावर आली असून पहिल्या 50 शहरात तळोदा शहराचा समावेश झालेला आहे. माझी वसुंधरा योजने अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात तळोदा शहराने दुसरा क्रमांक पटकावला आहे. या योजनेत 1250 वृक्ष लागवड करण्यात आली आहे। याशिवाय इलेक्ट्रिक व्हेकल चार्गिंग पॉइंत शहरात ठिकाणी बसवण्यात येणार आहेत.शहरात स्वच्छतेसाठी सहा घंटागाडी, व्याक्युम क्लिनर,शववाहिनी, रुग्णवाहिका पालिकेच्या माध्यमातून अजय भैया यांनी  कार्यान्वित करण्यात केली आहे. कोरोना काळात सफाई कामगारांना नगरपालिकेच्या वतीने अजयभैय्या यांच्या संकल्पनेतून अन्नधान्य वाटप करण्यात आले. नवीन वसाहतीत 2018-19 ला घरपट्टी लावलेली असताना लोकांच्या मागणीनुसार पहिल्या अपिलात दहा टक्के तर नंतरच्या अपिलात 15 टक्के अशी एकूण 25 टक्‍के घरपट्टी कमी करण्यात नगराध्यक्ष अजय भैय्या परदेशी यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.

           राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत महिला बचत गटांना आठ लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. 65 फेरीवाल्यांना पंतप्रधानपद विक्रेता निधीमधून प्रत्येकी दहा हजार रुपये कर्जाचे वाटप केले गेले आहे. प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधीतून 65 लाभार्थ्यांना पंधराशे रुपये अनुदान देण्यात आले आहे. स्वयंरोजगार पत्र विक्रेता सर्वेक्षण अंतर्गत 310 पत्र विक्रेत्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे.विविध प्रशिक्षण योजना प्रस्तावित केलेल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 300 घरकुल मंजूर असून 185 शासनाकडे मंजुरीसाठी पाठवले आहेत रामकडे 167 घरकुल मंजुरीसाठी शासनाकडे पाठवलेले आहेत 280 लक्ष घरकुल अंतर्गत लाभार्थ्यांना वितरित केले आहे पुढील अनुदान 450 लाखाची मागणी केलेली आहे.
          या सर्व कामांमध्ये तळोदा शहरातील रुपये पूर्णपणे पालटले असून नगराध्यक्षांनी जर ठरवले तर शहराच्या कसा विकास होऊ शकतो याचे उदाहरण अजय भैय्या परदेशी यांनी आपल्या कार्यशैलीने सर्वांपुढे पुढे ठेवले आहे. सामान्यांच्या नेता म्हणून अजयभैय्या परदेशी यांची ओळख आहे. शहरातील कोणत्याही नागरिकाला कोणत्याही प्रश्नावर जर काही समस्या असेल तर ते थेट अजयभैय्या परदेसी यांना फोन करतात व आपली समस्या त्यांच्या पुढे मांडतात. आपला हक्काचा माणूस म्हणून अजयभैय्या यांनी आपली ओळख आहे.भैय्या देखिल ती ओळख जगण्याच्या सतत प्रयत्न करतात. व्यक्ती किती मोठा आहे, किती सामान्य आहे याला भैय्या महत्त्व देत नसून 'प्रत्येक व्यक्ती हा माझा आहे व मी त्याच्या प्रती देणे लागतो', ही अजयभैय्या यांची कामाची शैली आहे. यातून त्यांनी शहरात जिवाभावाच्या मित्रांचा गोतावळा व मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. राजकीय मतभेद कितीही असले तरी अजय भैया या नावावर शहरातील सर्व नेते,लोकप्रतिनिधी विकासासाठी एकत्र येतात हा आजवरचा अनुभव आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून अजयभैय्या परदेशी यांच्याकडे बघितले जाते.अशा या दिलदार व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांना उदंड आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा......