21 व्या शतकातील हरवत चाललेला शब्द म्हणजे “मैदानी खेळ” यापूर्वी अनेक लोक एकत्र येऊन खेळ खेळत होते परंतु आज प्रत्येकाच एक स्वतंत्र मैदान आहे ते म्हणजे “मोबाईल” 6 इंच च्या डिस्प्ले हेच एक मैदान आजच्या पिढीचे क्रीडांगण झाले आहे. वयाच्या 4 ते 5 वयापासून पालक हे मैदान मुलांच्या हातात सोपवतात आणि याच 6 इंच च्या मैदानात मुलं आपली आयुष्य सोपवून टाकतात. दोष फक्त फक्त मुलांचा नाही अगदी पालक वर्ग देखील मैदान आणि मैदानी खेळाबाबत उदासीन झालेत. पालक सायंकाळी मैदानावर घेऊन जाणारी पिढीच संपुष्टात येत असल्याचे धोकादायक चित्र आज आहे.
मात्र अश्या काळात देखील विद्यार्थ्यांना दररोज मैदानाची सवय लावण्याची कामगिरी तळोदा येथील गो.हु.महाजन हायस्कूलचे क्रीडा शिक्षक सुनील सूर्यवंशी मागील दोन दशकांपासून करत आहेत. अगदी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत केवळ मैदानावर ठाण मांडून विद्यार्थी घडवणाऱ्या एक अवलिया अशी ख्याती त्यांनी मिळवली आहे. आयुष्य जगत असताना देखील खेळाडू वृत्ती असलेले कुठल्याही खेळात मेहनतीचा व कठोर परिश्रमाचा जोरावर उत्तुंग भरारी घेणाऱ्या खेळाडूना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी धडपड करणारे अशी एक आगळी वेगळी ओळख त्यांच्या कठोर परिश्रमामुळे त्यांना प्राप्त केली आहे. खेळा बाबत असलेली आपली निष्ठा व प्रामाणिकपणा त्यांनी जोपासला आहे. त्यामुळे बऱ्याचदा संघाला त्याचे परिणाम देखील सोसावे लागले आहेत. खेळात होत असलेला लबाडी त्यांनी कधीच खपवून घेतली नाही, परिणामी जिंकत असलेला संघ त्यांनी मैदानातून काढून घेतल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्या जोरावरच शाळा, गाव, तालुका ते नाशिक विभागीय स्तरापर्यंत खेळाडू तयार करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. खेळाडू प्रती असलेला त्यांचा आदर व त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ते कायम तत्पर असतात. स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूना गणेवेश मिळावा म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक व माजी खेळाडू यांच्याशी संपर्क करून वेळोवेळी विविध खेळात सहभागी होणाऱ्या खेळाडूसाठी गणवेश उपलब्ध करून संघातील खेळाडू मध्ये एक वेगळा उत्साह निर्माण करतात.
तळोदा येथील गो हू.महाजन (न्यू हायस्कूल) शाळेचे वरिष्ठ लिपिक सुरेश सूर्यवंशी यांचे ते लहान चिरींजव त्यांनी आपले शिक्षण बी.ए (इतिहास) बी.पी.एड. एम.पी.एड. जळगाव विद्यापीठातून पूर्ण केले. सुरुवातीचा काळ अतिशय संघर्षमय काढला, वीणा अनुदानित शाळेत आपले कर्तव्य बजावले त्यांच्यात असलेले परिश्रम क्षमता पाहून कालांतराने त्याच संस्थेत अनुदानित शाळेत त्यांना रुजू करून घेण्यात आले. त्यांचे आजोबा स्व.रणछोड सुर्यवंशी (गुरुजी) हे तळोद्यातील नामांकित शिक्षक होते. संपूर्ण गाव त्यांना गुरुजी नावाने ओळखत ज्यांनी तालुक्यात खेळा प्रती एक वेगळा आदर्श निर्माण केला. तळोदा शहर हे कुस्ती, मल्ल खांब, कबड्डी अश्या विविध खेळासाठी प्रसिद्ध होते. पहेलवानाचं गाव’ म्हणून एकेकाळी तळोदा शहराची पहेचान होती. शहरात माजी नगराध्यक्ष स्व.बबनराव छगनराव माळी व स्व. संभाजी चौधरी असे नामांकित मल्ल त्यांच्या कसरतीत घडले. याशिवाय असंख्य यशस्वी व्यक्तिमत्त्व घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आजोबांच्या संस्कारात राहिलेले सुनिल सुर्यवंशी हे केवळ खेळाडू घडवत नसून समाजात आवश्यक असणारे विचार खेळाडूमध्ये निर्माण करून समाजात आदर्श तरुण घडवत आहे.
आदिवासी भागात खेळात मोठी प्रतिभा आहे. परंतू त्यांना संधी उपलब्ध होत नाही अशी खंत मनात असताना त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मागील अडीच दशकांपासून वर्षापासून पहाटे व सायंकाळी शालेय विद्यार्थ्यांना शालेय मैदानात खेळाडू सोबत घाम गाळत हँडबॉल या खेळाचे ते क्रीडा प्रशिक्षण देत आहेत. त्यांची सुरुवात दिवंगत क्रीडा मार्गदर्शक व त्यांचे गुरू प्रा.पी.पी.भोगे यांनी संघ क्रीडा मार्गदर्शक (कोच) म्हणून वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय. चा संघाची जबाबदारी टाकली त्यांचा मार्गदर्शनात क्रिकेट व हँडबॉल संघाला 1999 -2000 साली वरिष्ठ महावि्यालयीन संघ हँडबॉल आणि क्रिकेट या दोघे संघाने अंतर महाविद्यालयीन स्पर्धेत अजिंक्य पद पटकाविले. राजकारण विरहित असणाऱ्या अध्यापक शिक्षक मंडळ संस्थेत संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई अरुण कुमार महाजन यांच्या व कॉलेज ट्रस्ट चे संचालक श्री अरुण कुमार महाजन दिवंगत प्रा पी.पी.भोगे संस्थेचे सचिव रमेश सूर्यवंशी यांनी क्रीडा क्षेत्रात शाळा व संस्थे मधील खेळाडूंना वाव मिळावा म्हणून त्यांची म्हणून नेमणूक केली. २००१ पासून शाळेचे क्रीडा संघ तयार करत आहेत. अनेक खेळ असले तरी त्यांनी त्यांचा आवडता खेळ हँडबॉल चे संघ तयार केले. पहिल्याच वर्षी १७ वर्षाचा संघ विभाग पातळीवर २००१ साली श्री गणेश केला. शाळा व संस्था त्यांना नेहमीच प्रोत्साहन देत आहे.आज शाळेचे प्राचार्य अमरदिप महाजन त्यांना सतत क्रीडा स्पर्धा बाबत सदैव उत्साह वाढवितात २००१ पासून हँडबॉल खेळ क्रीडा प्रकारात १४ वर्ष मुले मुली, १७ वर्ष मुले मुली, १९ वर्ष मुले मुली क्रीडा स्पर्धेत वर्चस्व राहिले आहे. नुकत्याच राज्य स्तरीय निवड समितीत त्यांच्या संघातील ३ खेळाडूंची चाचणी घेण्यात आली. दुर्दैवाने त्यांची निवड झाली नसली तरी आगामी काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी निवड समिती समोर चांगली कामगिरी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजही सुनील सुर्यवंशी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेकरिता प्रोत्साहन देत असून क्रीडांगण हेच माझे विश्व आहे, असे मोठ्या अभिमानाने ते सांगतात.
विद्यार्थी व शिक्षकांचे नाते केवळ पुस्तकापर्यंत मर्यादित नाही. एक साधा शिक्षक मनात ठरवून कामाला झपाटले तर क्रीडा प्रशिक्षकाला जे सहज साध्य होत नाही ते अत्यंत कठीण काम करू शकतो हे त्यांच्या अथक परिश्रमातून दिसते. त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेत नाशिक येथे क्रीडा साधना व के.एन.डी. बहुउद्देशीय मंडळाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक तसेच क्रीडा महासंघ महारष्ट्र यांचा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार
तसेच मालती बाई नामदेव आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
*शालेय आवारात तयार केले दर्जेदार मैदान*
शालेय आवारात हँडबॉल खेळण्यासाठी मैदान होते मात्र ते उंच सखल होते. परिणामी विद्यार्थ्यांना दुखापत होईल या भीतीने हँडबॉल मैदान तयार करण्यासाठी मदत मिळावी म्हणून त्यांनी तत्कालीन आमदार उदेसिंग पाडवी यांच्याकडे मदतीची अपेक्षा बोलून दाखवली होती. पाडवी हे देखील पैसे देवू करत होते. मात्र पैसे न घेता लागणारे साहित्य उपलब्ध करून द्या अशी स्पष्ट भूमिका घेवून त्यांनी मैदान बनविण्यासाठी लागणारे मुरूम, विट, माती, विटाचा भुगा असे साहित्य मिळवून घेतले व प्रत्यक्ष मैदानावर घाम गाळून त्यांनी दिवस रात्र करून मैदान तयार केले.. त्यानंतर २०१७ साली तत्कालीन आमदार उदेसींग पाडवी यांच्या हस्ते या मैदानाचे लोकार्पण करून आमंत्रित संघांच्या हँडबॉल स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
*रणछोड बाबा क्रीडा मंडळ नावाने स्पोर्ट्स क्लबची केली स्थापना*
आजोबा स्व.रणछोड सुर्यवंशी यांचा नावाने रणछोड बाबा क्रीडा मंडळ या स्पोर्ट्स क्लबची स्थापना केली असून या माध्यमातून दरवर्षी बॅटमिंटन, हॉली बॉल या खेळासह अन्य विविध खेळाचा क्रीडा स्पर्धा दरवर्षी भरवल्या जातात. उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळाडूसाठी विनामूल्य उन्हाळी क्रीडा शिबिराचे देखील आयोजन करण्यात येते.
*आफ्टर ४० क्रिकेट लीगची केली सुरुवात*
९० चे दशक गाजवणाऱ्या सर्व खेडाळूना पुन्हा एकदा मैदानावर आणण्यासाठी क्रिडा शिक्षक सुनिल सुरेश सुर्यवंशी यांनी पुढाकार घेतला, सोशल मीडियावर समूह तयार करून खेडाळूना एकत्रित केले. स्वतः मैदानावर उतरून मैदान आखणे, खेळ पट्टी तयार करणे त्यावर पाणी मारणे, रोलिंग करण्याचे कामे हाती घेतले, ७० खेडाळूनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. वेळोवेळी बैठका घेवून स्पर्धेचे नियोजन करून ६ संघ तयार करून खुल्या टेनिस बॉल वर ही स्पर्धा खेळवली. तळोदा शहर व तालुक्यातील असंख्य खेळाडू घडविणारे दिवंगत क्रीडा मार्गदर्शक प्रा.पी.पी.भोगे सरांचा स्मृती प्रित्यर्थ या स्पर्धेला त्यांचे नाव देण्यात आले. याशिवाय ६ संघाना भारतीय क्रिकेट संघाचे ज्येष्ठ खेळाडूंचे नावे देण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा