सुधाकर मराठे:
काही व्यक्ती ह्या कितीही उंच, मोठ्या पदावर गेल्या तरी त्यांच्या सर्वसामान्यांशी असलेली नात घट्ट जुळलेली असते. त्यांच्यातील असणारा सामान्यपणा ते कधीही सोडत नाही आणि त्यांचा मोठेपणा ते समजला जातो.त्यांचा या सर्वसामान्य वागणूकीतून ते सर्वांना आपले वाटतात. त्यातूनच त्यांची लोकप्रियता दिवसागणिक वाढत जाते.तळोदा शहरातील असच एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकनियुक्त नगराध्यक्ष अजयभैय्या परदेशी. त्यांचा आज ......वा वाढदिवस.... अजयभैय्या यांच्या जन्म 17 जुलै 1973 मध्ये झाला. समाजकारण, राजकारण यांचा वारसा त्यांना घरातून लाभला. त्यांचे वडील स्व.छबुलाल ताराचंद परदेशी यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळवून देण्यासाठी संघर्ष उभा केला होता. त्यांच्या आई प्रमिलाबाई परदेशी 1984 मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांचे वडील छबुलाल परदेशी हे सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले.काही काळ त्यांनी तळोदा शहराचे उपनगराध्यक्षपदी देखील भूषवले आहे. आई-वडिलांकडून मिळालेला हा वारसा अजयभैय्या यांनी पुढे जपत आपल्या सामाजिक-राजकिय जीवनाची सुरुवात केली.
1997 मध्ये अजयभैय्या यांच्या खांद्यावरभाजप युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून भाजपने जबाबदारी सोपविली. कमी कालावधीत त्यांच्याकडे तळोदा शहरातील लोकप्रिय युवा नेता म्हणून बघितले जाऊ लागले.सर्वसामान्य जनतेशी जुळून असलेली परदेशी कुटुंबाची नाळ व लोकांचा विश्वास म्हणून अजयभैय्या 2012 पावेतो सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले.2017 पर्यत नगरसेवक होते. 2009 भाजपा शहराध्यक्ष, 2012 साली विधानसभा क्षेत्र प्रमुख, 2015 भाजपा जिल्हा सरचिटणीस, अशी जिल्ह्याचे महत्वपूर्ण पदांची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. 2006 सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी श्रीराम सोशल ग्रुप स्थापन केला.श्रीराम सोशल ग्रुपच्या माध्यमातून शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.सार्वजनिक रामनवमी उत्सवाची सुरुवात शहरात ग्रुपच्या माध्यमातून केली गेली.याशिवाय शहरात शव वाहिनी,स्वर्ग रथ व रुग्णवाहिका ग्रुपच्या माध्यमातून चालविण्यात येते. कोरोणाच्या पहिल्या लाटेत श्रीराम सोशल ग्रुपने भरीव योगदान दिले गुजरातमधून स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोचवणे, त्यांच्या जेवणाची,शहरातील निराधार व्यक्तीना जेवण व निवासाची सोय देखील श्रीराम सोशल ग्रुपच्या वतीने सातत्याने दीड-दोन महिने करण्यात आली. 2017 मध्ये नगरपालिका निवडणूक लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळाली. त्यांना उमेदवारी मिळाल्यापासूनच त्यांचा विजय निश्चित मानला जात होता.त्यांचा जनसंपर्क त्यांच्यातील असलेल्या कणखरपणा विकास धोरण सुस्वभावी या जोरावर ते लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विराजमान झाले. लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अजयभैय्या यांनी शहरात विकासकामांचा सपाटा सुरू केला.
शहरात विकास कामे करत असताना सुरुवातीला त्यांना तत्कालीन आमदार उदेसिंग पाडवी व विद्यमान आमदार राजेश पाडवी यांची मोलाची साथ लाभली आहे.तळोदा पालिकेत सत्ता स्थापनेपासून स्वच्छ व सुंदर शहर या मोहिमेला प्राधान्य देत आहेत. शिवाय शहरातील पायाभूत समस्या सोडवण्यावर त्यांनी भर दिला असून शहरातील रस्ते पाणी गटारीच्या समस्या पळवून शहराचा कायापालट करण्यामध्ये मोलाची भूमिका निभावली आहे शहरात प्रवेश करणारा चारही रस्त्यांना प्रवेशद्वार काम नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आले आहे. त्यापैकी शहादा रस्त्यावरील प्रवेशद्वाराचे काम गेल्या वर्षभरापूर्वी पूर्णत्वास आले असून त्याचे लोकार्पण केले गेले आहे. 'आप संत श्री गुलाब महाराज' यांचे नाव या प्रवेशद्वाराला देण्यात आले आहे. तर हातोडा रस्त्यावरील प्रवेशद्वाराचे काम पूर्णत्वास आले असून आज त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार' असे या प्रवेशद्वाराचे नामकरण करण्यात आले आहे. या शिवाय नेत्रग-शेवाडी राष्ट्रीय महामार्गावर अक्कलकुवाकडून तळोदा शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर देखील प्रवेशद्वाराचे काम हाती घेण्यात येणार आहे.
सन 2021-22 मध्ये तळोदा नगरपालिका हद्दीतील चाचण्या रस्त्यावरील प्रवेशद्वाराचे बांधकाम, यमुना नगर मधील मोकळी जागा विकसित करणे,तळोदा शहरातील सर्वे नंबर 373 शहादा रोड कडील दक्षिण भागात दामोदर नगर अंतर्गत रस्त्यावर गटारीत बांधकाम करणे, भगवान सीताराम नगर मध्ये रस्ते पाईप गटार बांधकाम करणे,कालभैरव मंदिरापासून नगरपालिकाहद्द पावेतो गटार बांधकाम करणे, कॉलेज रोड डांबरीकरण दुभाजक व फुटपाथ, पाईप गटार बांधणे, विद्यानगरी अंतर्गत रस्ते व काँक्रिटीकरण गटार तयार करणे, आमराईफळी जवळ खर्डी नदीवर पूल बांधकाम करणे,आंबेडकर चौक ते 150 मीटर लांबी पावेतो गटारीवर स्लॅब टाकणे ही कामे सुरू आहेत.
पायाभूत सुविधांच्या बाबतीत शहराचा कायापालट झाला तळोदा शहरात विकसनशील शहर म्हणून नावारूपाला आले आहे. नगराध्यक्ष अजय भैय्या परदेसी यांच्या नेतृत्वात तळोदा शहरातील बिरसा मुंडा चौकापासून तर थेट प्रवेशद्वारापर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे व गटारी वर स्लॅब टाकण्यात आहे.पथ मार्ग तयार केले गेले आहे. शहादा रस्त्यावर तीन छोट्या नाल्यांवर पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.मीरा कॉलनीत व प्रतापनगर येथे एक कोटी चार लाखांचा लॉन्च उभारला गेला असून अद्ययावत गार्डन याठिकाणी तयार झाले आहे. विमल नगर येथे ज्येष्ठ महिला व पुरुषांसाठी हक्काची खोली तसेच विरंगुळ्यासाठी उद्यान निर्मिती करण्यात आली आहे. देशपांडे फोटो स्टुडिओ पासून ते बिरसा मुंडा चौकापर्यंत नवीन नवीन रस्त्यांची कामे पालिकेच्यावतीने अजय भैय्या परदेशी यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेले आहे. बिरसा मुंडा चौक ते चिनोदा चौफुली पर्यत रुंदीकरण व दुभाजकाचे काम केले गेले आहे.हातोडा रस्ता पासून न्यायालयापर्यंत व रुंदीकरण देखील करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय मागील रस्तापासून मरीमाता मंदिरामार्गे हातोडा रस्त्यापर्यत रस्त्याचे रुंदीकरण व गटारी वर स्लॅब टाकण्यात आलेला आहे. विमल नगर, हरकलाल नगर, शिवरामनगर, गुरुकृपा कॉलनी, विक्रम नगर, बडा दादा नगर,खटाई माता मंदिर परिसरातील रस्ते डांबरीकरण करण्यात आले आहेत व गटारी देखील तयार करण्यात आलेली आहे. याशिवाय शहरातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी ठिकाणी ओपन जिम बसवण्यात आले आहेत त्यासाठी सुरुवातीला नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी स्वखर्चातून शहरात ओपन जिम बसवली होती.शहादा रस्त्यावर मॉर्निंग व इवेनिंग वॉकसाठी येणार्या नागरिकांना भक्तीमय आल्हाददायक वातावरण लाभावे यासाठी रस्त्यावर बसवण्यात आलेल्या सीट लॅम्प वर साऊंड सिस्टिम देखील अजय भैय्या परदेशी यांच्या संकल्पनेतून बसवण्यात आली आहे. याशिवाय एफ एस टी पी प्रकल्प पूर्ण कार्यान्वित आहे. कचऱ्यापासून खत निर्मिती मंजुरी प्रस्तावित असून अजयभैय्या परदेशी यांच्या पुढाकाराने पालिका राज्यात 49 क्रमांकावर आली असून पहिल्या 50 शहरात तळोदा शहराचा समावेश झालेला आहे. माझी वसुंधरा योजने अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात तळोदा शहराने दुसरा क्रमांक पटकावला आहे. या योजनेत 1250 वृक्ष लागवड करण्यात आली आहे। याशिवाय इलेक्ट्रिक व्हेकल चार्गिंग पॉइंत शहरात ठिकाणी बसवण्यात येणार आहेत.शहरात स्वच्छतेसाठी सहा घंटागाडी, व्याक्युम क्लिनर,शववाहिनी, रुग्णवाहिका पालिकेच्या माध्यमातून अजय भैया यांनी कार्यान्वित करण्यात केली आहे. कोरोना काळात सफाई कामगारांना नगरपालिकेच्या वतीने अजयभैय्या यांच्या संकल्पनेतून अन्नधान्य वाटप करण्यात आले. नवीन वसाहतीत 2018-19 ला घरपट्टी लावलेली असताना लोकांच्या मागणीनुसार पहिल्या अपिलात दहा टक्के तर नंतरच्या अपिलात 15 टक्के अशी एकूण 25 टक्के घरपट्टी कमी करण्यात नगराध्यक्ष अजय भैय्या परदेशी यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.
राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत महिला बचत गटांना आठ लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. 65 फेरीवाल्यांना पंतप्रधानपद विक्रेता निधीमधून प्रत्येकी दहा हजार रुपये कर्जाचे वाटप केले गेले आहे. प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधीतून 65 लाभार्थ्यांना पंधराशे रुपये अनुदान देण्यात आले आहे. स्वयंरोजगार पत्र विक्रेता सर्वेक्षण अंतर्गत 310 पत्र विक्रेत्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे.विविध प्रशिक्षण योजना प्रस्तावित केलेल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 300 घरकुल मंजूर असून 185 शासनाकडे मंजुरीसाठी पाठवले आहेत रामकडे 167 घरकुल मंजुरीसाठी शासनाकडे पाठवलेले आहेत 280 लक्ष घरकुल अंतर्गत लाभार्थ्यांना वितरित केले आहे पुढील अनुदान 450 लाखाची मागणी केलेली आहे.
या सर्व कामांमध्ये तळोदा शहरातील रुपये पूर्णपणे पालटले असून नगराध्यक्षांनी जर ठरवले तर शहराच्या कसा विकास होऊ शकतो याचे उदाहरण अजय भैय्या परदेशी यांनी आपल्या कार्यशैलीने सर्वांपुढे पुढे ठेवले आहे. सामान्यांच्या नेता म्हणून अजयभैय्या परदेशी यांची ओळख आहे. शहरातील कोणत्याही नागरिकाला कोणत्याही प्रश्नावर जर काही समस्या असेल तर ते थेट अजयभैय्या परदेसी यांना फोन करतात व आपली समस्या त्यांच्या पुढे मांडतात. आपला हक्काचा माणूस म्हणून अजयभैय्या यांनी आपली ओळख आहे.भैय्या देखिल ती ओळख जगण्याच्या सतत प्रयत्न करतात. व्यक्ती किती मोठा आहे, किती सामान्य आहे याला भैय्या महत्त्व देत नसून 'प्रत्येक व्यक्ती हा माझा आहे व मी त्याच्या प्रती देणे लागतो', ही अजयभैय्या यांची कामाची शैली आहे. यातून त्यांनी शहरात जिवाभावाच्या मित्रांचा गोतावळा व मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. राजकीय मतभेद कितीही असले तरी अजय भैया या नावावर शहरातील सर्व नेते,लोकप्रतिनिधी विकासासाठी एकत्र येतात हा आजवरचा अनुभव आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून अजयभैय्या परदेशी यांच्याकडे बघितले जाते.अशा या दिलदार व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांना उदंड आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा