Breking News

रविवार, १० नोव्हेंबर, २०२४

शिमला ते मनाली: निसर्गसौंदर्य आणि साहसाने भरलेला रमणीय प्रवास


     शिमला ते मनाली प्रवास हिमाचल प्रदेशातील अत्यंत रमणीय आणि साहसी अनुभव देणारा आहे. साधारणतः २४५ किमी अंतराचे हे प्रवास, सुमारे ७-८ तासांचा असतो, त्यामुळे कंटाळा सुध्दा येतो. पण या प्रवासातील निसर्गरम्य दृश्ये मनमोहक असतात.
       प्रवासाच्या सुरूवातीस, शिमलाच्या हिरव्या टेकड्यांमधून बाहेर पडताना देवदार, ओक, आणि पाईनच्या झाडांनी सजलेली घनदाट वनराई स्वागत करते. या रस्त्यावर असलेल्या वळणांमधून प्रवास करताना उंच डोंगर, धुक्याचे दुलईसारखे थर, आणि गडद निळे आकाश यात मन गुंतून जाते.

कुल्लू भागात येताच, बियास नदी प्रवासाची साथी होते. नदीच्या काठावर छोटे छोटे गाव, रंगीबेरंगी फुलांची शेती, आणि सफरचंदांच्या बागा यांची झलक दिसते. कुल्लूमधील रिव्हर राफ्टिंग आणि अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्सची संधी प्रवासात अधिक थरार आणते.
मनालीच्या जवळ येताच, डोंगराळ भागातील थंड हवा आणि दूरवर दिसणारे हिमाच्छादित पर्वत आपले लक्ष वेधून घेतात. प्रवासातील शेवटच्या टप्प्यात सोलांग व्हॅलीची देखणी दृश्ये, बर्फाच्छादित शिखरे, आणि निसर्गाचा मनोहारी अनुभव मिळतो.

हा प्रवास केवळ डोंगर, नद्या, आणि जंगल यांचा समन्वय नसून, हिमाचल प्रदेशाच्या संस्कृती आणि जीवनशैलीचा अनुभव घेण्याची संधी देतो.
     
*मिरकुला कॉटेज आणि तारा हॉटेल: आल्हाददायक सेवा आणि सुंदर निवासाचा अनुभव*

शिमला आणि मनालीच्या प्रवासात आम्हाला मिरकुला कॉटेज आणि तारा हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळाली, आणि या दोन्ही हॉटेल्सचा अनुभव अतिशय सुंदर होता.

मिरकुला कॉटेजचे वातावरण अत्यंत आल्हाददायक वाटले मात्र आम्हाला ऐनवेळी हॉटेल तारा मध्ये एक रात्र राहण्यास विनंती केली.  त्या अनुषंगाने आम्ही विनंती स्वीकारली याठीकांच्या खोल्या आरामदायी आणि सुशोभित आहेत. खोलींच्या खिडक्यांतून बाहेर दिसणारे डोंगर, हिरवी झाडी, आणि धुक्याने आच्छादलेले निसर्ग दृश्य मनाला प्रसन्नता देतात. संपूर्ण हॉटेलमध्ये स्वच्छता आणि देखभाल उत्तम असल्याने राहण्याचा अनुभव सुखकर होतो. या हॉटेलच्या खोल्याही आरामदायी, प्रशस्त, आणि आधुनिक सोयींनी युक्त आहेत. हॉटेलमधील कर्मचारी अतिशय नम्र, मदत करणारे आणि तत्पर आहेत, त्यामुळे पाहुण्यांना घरच्यासारखी अनुभूती मिळते. त्यांनी दिलेल्या तत्पर सेवेमुळे आमचा मुक्काम अधिक आनंददायी झाला.

या हॉटेल्समध्ये राहण्याचा अनुभव सुखद आणि अविस्मरणीय ठरला, ज्यामुळे आमच्या प्रवासाची मजा अधिकच वाढली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा