दि.११ नोव्हेंबर २०२४
धर्मशाला, हिमाचल प्रदेशातील एक अद्वितीय ठिकाण, जिथे बर्फाच्छादित पर्वतरांगा, हिरवेगार जंगल, आणि मंद वाऱ्यांचा अनुभव मिळतो. या प्रवासात आर्मीत कार्यरत असलेला आमचा काकाचा मुलगा भाऊसाहेब सुर्यवंशी याच्या घरी थांबणे एक भावनिक आणि विशेष अनुभव ठरला.
भाऊसाहेब भविष्याच्या दृष्टीने भारतात होणाऱ्या आपत्कालीन बायलोजिकल, वारफेअर प्रशिक्षणासाठी पुणे येथे ट्रेनिंगला गेले होते. त्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही, यश व वहिनी साहेब यांनी आमचे य मनःपूर्वक स्वागत केले. यासह घरातील तन्मय व कुटुंबीयांशी भेटून दिलखुलास आनंद झाला. त्या चिमुरड्यांचा उत्साह आणि खेळकरपणा घरात आनंदाचे वातावरण निर्माण करत होता. रंगलेल्या गप्पांमध्ये जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, ज्यात घराघरातल्या कहाण्या आणि आठवणी सामील झाल्या.
गावाच्या साधेपणाने आणि हिरव्यागार निसर्गाने आम्हाला निसर्गाच्या सानिध्यात शांततेचा अनुभव दिला. ताजेतवाने करणारी थंड हवा, शांतता, आणि आकर्षक दृश्ये मनाला एक वेगळाच आनंद देत होती. धर्मशालाच्या सौंदर्यामुळे आम्ही निसर्गाच्या प्रेमात पडलो.
रात्री, गरमागरम पनीर व खीर वर ताव मारत आम्ही एकत्रितपणे आनंद घेतला, आणि त्या खास क्षणांची गोडी घेतली. प्रत्येक चवीने आनंद वाढत गेला, आणि आमच्या गप्पांनी घरातला वातावरण आणखी जीवंत झाला.
धर्मशालामधील शांतता, गडद निळ्या आकाशात घिरट्या घालणारे ढग, आणि पर्वतांच्या अंगणात निवांत क्षण घालवताना, आम्ही एकमेकांबरोबरचे स्नेहबंध अधिक घट्ट केले. तिथल्या शांततेने मनाला शांती दिली, आणि एकत्र बसून हसणे-खेळणे या क्षणांचे महत्त्व आमच्यात अधिक जागृत केले.
भाऊसाहेब सुर्यवंशी हे सुर्यवंशी परिवारातील एक महत्त्वाचा सदस्य आहेत, ज्यांचा देशाच्या सुरक्षेसाठी केलेला योगदान त्यांच्या कुटुंबाची ऊर्जा वाढवण्यात खूप महत्त्वाचा आहे. त्यांची मेहनत आणि समर्पण कुटुंबाला एकत्र आणत आहे आणि सर्वांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहे. त्यांच्या बद्दल एक वेगळाच आदर कुटुंबात बाळगला जातो.
भाऊसाहेबांच्या कार्यामुळे त्यांच्या कुटुंबात देशभक्तीची भावना बळकट झाली आहे, ज्यामुळे सर्व सदस्य एकमेकांमध्ये सहकार्य आणि समर्थनाचा भाव निर्माण करतात. हे सर्व एकत्रितपणे त्यांच्या कामात आणि जीवनात सामूहिक योगदान देते, ज्यामुळे सुर्यवंशी परिवाराची ऊर्जा आणखी वाढते. भाऊसाहेब यांचा व्यक्तीमत्वामुळे परिवारातील संबंध अधिक दृढ बनत आहेत, आणि एकत्रितपणे देशासाठी योगदान देण्याचा गर्व अनुभवला जात आहे.
भाऊसाहेबच्या पत्नीच्या साधेपणामुळे आणि बोलक्या स्वभावामुळे आम्ही खूप प्रभावित झालो. यश यांनी आम्हाला आर्मी कॅम्पस पासून ते कॉटेज पावेतो आणले. त्यांच्या मनमिळावू स्वभाव व कमी वयात असलेले समजदारी पाहून मनाला गर्वित वाटले. त्यामुळे या भेटीत एक खासता निर्माण झाली असेल.
त्यांना मिळालेले कॉटेज हे प्रशस्त आणि आरामदायी होतें. तसेच बाहेरच्या दृश्याने मनाला भुरळ घातली. बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि हिरवागार परिसर पाहण्याचा अनुभव अद्भुत ठरला. धर्मशालाच्या शांत वातावरणात थांबून आम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा अनुभव मिळाला, ज्यामुळे या ठिकाणाची अधिक गोडी वाढली. या शांत ठिकाणातील सौंदर्य आणि स्नेहाच्या गाठी, नेहमीच लक्षात राहील.
भाऊसाहेब हे भारतीय आर्मीतील एक महत्वाचे स्थान मिळवलेले अधिकारी आहेत. त्यांच्या धैर्याने आणि सेवा वृत्तीमुळे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांमध्ये आदर आणि सन्मान मिळवला आहे. त्यांनी देशसेवा करत असताना कुटुंबीयांची काळजी घेण्याची भूमिकाही अत्यंत जबाबदारीने पार पाडली आहे. भविष्याच्या दृष्टीने त्यांनी कुटुंबासाठी खास नियोजन केले आहे, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सुरक्षितता आणि भविष्याची दिशा मिळू शकेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा