'जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण' असे एक सुभाषित आहे. त्यानुसार ज्यांच्या स्वभाव वैशिष्ठ्यात मोठेपण आहे असा मित्र व्यक्तिगत स्वार्थ बाजुला ठेवून दुसऱ्यांसाठी त्याग करण्यासही मागेपुढे पाहत नाही, असाच एक अवलिया व्यक्तिमत्व स्वतःच्या महत्वाकांक्षेला महत्व न देता सर्वांशी समभावतेने वागणारा. माणसाला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कतृत्वाची गरज भासते, कतृत्व अंगी असेल तर नेतृत्व गुणही
आपसुकच येतो आणि सर्वसामान्यांच्या घरातूनही असे दृढ निशच्यी व मोठ्या मनाचे उभरलेले व्यक्तिमत्व विशाल सूर्यवंशी, लहानपणापासूनच अगदी खोडकर स्वभावाचा, घरची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित त्यात मामाचे घरही श्रीमंत त्यामुळे अतिशय लाडात वाढलेला सर्वांचा लाडका असा विशाल सूर्यवंशी उर्फ लखन आणि आम्ही त्यास लक्की म्हणून उलेखायचो, क्रिकेट खेळण्यात खूप पारंगत नसला तरी संघटन म्हणून एकत्रित राहण्याचा त्याचा हेतूमुळे तो कधी रायझिंग स्टार या संघाचा कर्णधार बनला कळलेच नाही डावखोरा फलंदाज व क्षेत्ररक्षक अशी ओळख त्यांची संघात होती. संघावर कुठलीही अडचण अथवा संकट आले सर्वात पहिले धावून जाण्याची त्याची तयारी असायची मग ती मैदानात शर्ट काढून समोरच्या संघाशी दोन हात करणे का असेना त्यातही तो कधी मागे सरकला नाही, आणि त्याचा या पाठीराखा स्वभावामुळे सर्वांचा मनात एक वेगळी जागा निर्माण करण्यात तो यशस्वी झाला.कुणाच्याही लग्नकार्य असले तरी लक्की हा पूर्ण दिवसभर त्या ठिकाणी थांबत होता लग्न मंडपात लागणाऱ्या सर्व बाबींवरती त्याचे बारीक-सारीक लक्ष होते मग अगदी लग्नात येणारे पाहुण्यांना सुद्धा तो मनोरंजन करत यासोबतच रसोडे सोबत थांबून संपूर्ण व्यवस्था करण्याचे कार्य विशाल हा लहानपणापासूनच पार पडत होता. एकत्रित कुटुंबाचा सहवासात वाढल्यामुळे कुटुंबाची समूह शक्ती त्याच्या मागे होतीच यामुळे भावंड मित्र गोतावळा यात कसे वावरावे हे त्याला सुरुवातीपासूनच अवगत होते. त्याची आई चंद्रकला सुर्यवंशी तिला हमी चंदा मावशी म्हणून संबोधत अतिशय मनमिळाऊ प्रेमळ निस्वार्थ सोज्वळ मनाची आईच जनु ती, कधीही आम्ही त्यांच्या घरी गेलो तर जेवण केल्या शिवाय तिने परत येऊ दिल्याचे आम्हाला आठवत नाही, अगदी प्रेमाने ये मनो बच्चो अशी आहिरानी भाषेत तिचे बोललेले शब्द आजही कानी घुमतात.. प्रभाकर मावसाजी ही अतिशय शांत संयमी आणि तेवढाच पाल्यांच्या भविष्याच्या विचार करणारे दृढ विचारी व्यक्तिमत्त्व, लक्की यास एक मोठा भाऊ कपिल
व एक मोठी बहीण पूनम ताई लक्की हा लहान असल्याकारणाने खोडकर व हट्टी होताच त्यांच्या घरी गेल्यानंतर नेहमी पूनम ताई व कपिल भाऊचे अभ्यासाबद्दल टोमणे असायचे त्यावेळेस ते टोमणे वाटत असले तरी भविष्यात त्या सर्व गोष्टींची जाणीव झालीच स्व.कपिल भाऊ हा खूप हरहुन्नरी होता, असे म्हणतात ना जेथे लाथ मारेल तेथे पाणी काढेल याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे कपिल भाऊ, तळोदा शहरात लग्न मंडपात वाढपी साठीची संघटन तयार करणारा सर्वप्रथम कपिल भाऊ त्याच्या माध्यमातून आम्ही देखील या वाढती सहभागी झालो कपिल भाऊ अंकलेश्वर येथे नोकरी कामे असताना त्याने बहुतांश तळोद्यातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली मात्र काळाचा घात झाला व बसच्या समोरासमोर अपघातात अंकलेश्वर येथून परतताना त्याचे निधन झाले त्यानंतर सूर्यवंशी कुटुंब हे या दुखात गेले.
अवघ्या दीड वर्षाचे बाळ पत्नी व कुटुंब सोडून घरातील कर्तव्यदक्ष स्व. कपिल भाऊ गेल्यामुळे घरची आर्थिक गणिते कोलमडली. संयुक्त कुटुंब नुकतेच विभक्त झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती देखील बऱ्यापैकी ढसाळली होती. अश्यातच तरुण वहिनी व मुलाची जबाबदारी लक्कीच्या खांद्यावर पडली कमी वयापासूनच त्यागाची भूमिका ठेवणारा कुठल्याही कामाची लाज न बाळगणारा लक्की हा सुरुवातीच्या काळात सेंटिंग काम, मजुरी यासह विविध कार्यालयांमध्ये त्याने कामे केले. काभाळ कष्ट करून त्याने कुटुंबाचा गाडा ओढण्याचा प्रयत्न केला अशातच आलेले संकटावर कशा पद्धतीने मात करावी हे त्याला उमजत नव्हते. त्याचे लग्न जमले होते साखरपुडा ठरला होता, ऐन लग्न तोंडावर आल्यानंतर भावाची दुर्दैवी घटना घडल्यामुळे काय करावे हे देखील त्याला कळत नव्हते, त्याने ते लग्न तात्काळ मोडून पाश्चिमात्य संस्कृतीला मागे टाकत आपला भावाचा संसाराची जबाबदारी घेत पुरोगामी विचारसरणी त्याने अवलंबली, भले मोठे मन करून वहिनीची जबाबदारी घेत तिच्याशीच लग्न फेऱ्या घेतल्या आणि एक उदार मन दाखवून त्याने समाजाला व तरुणाना एक वेगळी शिकवण दिली.. आश्विनी वहिनी ही तेवढीच प्रेमळ, समंजस, हुशार व विविध कला कौशल्य संपन्न असलेली आहे. त्या दोघांना एक मुलगा व एक मुलगी असून सुंदर असा परिवार आहे. आयुष्याचे गाडे खूप सिताफिने सर्वांना आनंद ठेवून ते दोघे ओढत असल्याचा अभिमान वाटतो.
आज लक्की हा एक यशस्वी व्यावसायिक असून त्याचे तळोदा शहरातील राजपत मार्गावर बिल्डिंग मटेरियल चे भले मोठे दुकान आहे. या माध्यमातून करोडोचा टन ओव्हर त्याचा आहे. आजही पुन्हा मित्रावर संकट आले की विशाल सर्वप्रथम धावून येतो दवाखाना असला तर सर्व कामे सोडून स्वतःचे असो वा दुसऱ्या कुणाचे वाहन आणून तो रुग्णास दवाखान्यात नेण्याचे कार्य सीताफिने करतो त्यासोबतच लागणारा खर्च सुद्धा पुरवण्याचे धाडस दाखवतो. अवघ्या आठ वर्षांपासून संपर्कात असलेला विशाल उर्फ लखन आजही त्याचा आणि माझा संपर्क तेवढाच विश्वासाचा व आपुलकीचा असल्यामुळे देवाने दिलेले एक सुंदर नात्यांपैकी त्याची ही मैत्री आहे आणि त्यात कुठलाही बडेजाव नाही आम्ही पहिले जसे होतो तसेच आजही गुना गोविंदाने सोबत आहोत याचा आम्हाला गर्व आहे.. विशेष म्हणजे सुरुवातीपासून सर्व मित्र परिवार एकजूट ठेवण्यात विशालचा ही खारीचा वाटा आहे......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा