१४ नोव्हेंबर २०२४
हरियाणाच्या कर्णाल येथील एन.एच ४४ हायवेवर असलेल्या हॉटेल अशोका ढाब्याचे मालक अमित गाभा यांच्या ढाब्यावर आमचा थांबा झाला. अमित गाभा यांच्या स्वभावातला शांतपणा, संयम, आणि मृदू बोलणे आम्हाला विशेष भावले. मित्र बनवण्याचा त्यांचा स्वभावही सहज लक्षात आला.
महाराष्ट्रातून आलो असल्याने त्यांनी आमच्या खाण्याच्या आवडीचा विचार करून आम्हाला पूर्ण मोकळीक दिली. त्यांनी खास आमच्या इच्छेप्रमाणे खिचडी बनवण्याची परवानगी दिली आणि संपूर्ण किचन आमच्यासाठी खुलं केलं. "लागेल तेवढे वापरा," असे त्यांनी सांगितले आणि त्यात त्यांच्या दिलदारपणाचा प्रत्यय आला.
अमित गाभा यांचा व्यवसाय मोठा असला, तरी त्यांचे मन त्याहून मोठे वाटले. अवघ्या २७०० रुपयांमध्ये त्यांनी आमच्या ३० जणांसाठी चविष्ट आणि आवडते जेवण उपलब्ध करून दिले. दिवसभराच्या थकव्याला आराम मिळावा म्हणून त्यांनी मनसोक्त, स्वादिष्ट भोजनाची सोय केली होती, ज्यामुळे आम्ही समाधानाने आणि आनंदाने भरून गेलो.
अमित गाभा यांचा आदरातिथ्याचा अनुभव अविस्मरणीय ठरला, आणि त्यांच्या ढाब्यावर मिळालेल्या या पाहुणचाराची आठवण कायम स्मरणात राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा