Breking News

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२५

सागर पाटील: परिस्थितीशी दोन हात करणारा एक कर्तव्यदक्ष योद्धा

दि.21 फेब्रुवारी 2025

        सागर अमृत पाटील यांचे जीवन म्हणजे एक संघर्षाची आणि कर्तृत्वाची गाथा आहे. लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. कुटुंबाच्या आर्थिक आणि मानसिक आधाराचा अभाव असतानाही सागर यांनी आपल्या आई आणि मोठ्या भावासोबत खांद्याला खांदा लावून काम केले. त्यांची आई आणि मोठा भाऊ त्यांना आधार देत राहिले, परंतु परिस्थितीच्या आव्हानांमुळे सागर यांच्यावर कुटुंबाच्या आधारस्तंभाचे काम करणे आले.
          सागर यास लहानपणापासूनच काहीतरी विशेष करून दाखवायची जिद्द होती, मात्र कुटुंबाच्या गरजा आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या दडपणामुळे त्यांनी व्यवसायात लक्ष केंद्रित केले. कुटुंबाला उभे करण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांच्या मामा यांनीही वेळोवेळी आर्थिक आणि मानसिक आधार दिला. सागर यास मामा यांच्या पाठिंब्याने आत्मविश्वास मिळाला आणि ते आपला व्यवसाय उभा करू शकले.
     शहरातील आदिवासी भागात कुटुंबीयांनी एक छोटंसं नाश्त्याचं दुकान सुरू केलं. साध्या गोष्टींपासून सुरुवात केली, परंतु त्यांच्या हाताला असलेली चव आणि मेहनत या गोष्टींमुळे ग्राहकांची संख्या वाढू लागली. त्यांच्या दुकानात दररोज गर्दी असायची. आदिवासी भागात अशा प्रकारचा व्यवसाय मोठ्या मेहनतीचा असतो, पण त्यांनी ही आव्हानं आनंदाने स्वीकारली. त्यांच्या दुकानात मिळणाऱ्या नाश्त्याची चव इतकी विशेष होती की लोकांनी त्याला मनापासून स्वीकारलं. हे दुकानच त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याचं मुख्य साधन बनलं.   
    सागर यास मित्रपरिवाराचा आणि नातेवाईकांचा मोठा गोतावळा आहे. तो नेहमीच आपल्या मित्रांना आणि कुटुंबीयांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या जीवनात आणखी एक मोठा आघात तेव्हा आला, जेव्हा त्यांच्या मोठ्या बहिणीचा विवाह सुरत येथे झाला तिच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. तिच्या मुलाला मोठ्या मानसिक आणि आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत सागर यांनी बहिणीला आणि तिच्या मुलीना आधार देण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. त्यांनी बहिणीला आर्थिक आणि मानसिक आधार दिला.
           त्यांच्या या कर्तृत्वामुळे आणि कुटुंबासाठी त्यांनी घेतलेल्या जबाबदारीमुळे सागर यास कुटुंबात विशेष मान आहे. त्यांनी आपल्या आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांना जपले आणि संपूर्ण कुटुंबासाठी एक आदर्श ठरले. 

        त्याच्या विवाह शिरपूर तालुक्यातील सोनल हिच्याशी झाला असून त्या दोघांना एक ओम नावाचे एक गोंडस बाळ आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा