Breking News

शनिवार, ८ मार्च, २०२५

केअर पब्लिक स्कूलच्या शिशुकुंज विभागात "Best Student of the Month" पुरस्कार प्रदान

नंदुरबार : केअर पब्लिक स्कूलच्या शिशुकुंज विभागात "Best Student of the Month" प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने प्रत्येक वर्गातील एका विद्यार्थ्याची निवड त्यांच्या अभ्यास, वर्तन, शिस्त आणि एकूणच सहभागाच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 
             या महिन्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये यथार्थ मराठे याचा देखील समावेश होता. शाळेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन त्याला गौरवण्यात आले. शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व वैयक्तिक प्रगतीसाठी प्रेरणा मिळत आहे, असे शिक्षक आणि पालकांचे मत आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा