उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जळगाव जिल्ह्यातील दो-यात धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नांवर आंदोलन होईल. या पार्श्वभूमीवर लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे याना तलोदा पोलिसांनी सकाळी 4:30 च्या सुमारास पोलीस ताफ्यासह चिनोदा चौफुलीजवळ रोखुन प्रतिबंधात्मक कारवाईसाठी त्यांना ताब्यात घेतले होते. या कारवाईच्या निषेधार्थ गावोंगावच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. तदनंतर रास्ता रोको देखील करण्यात आला. सदर बातमीचा आढावा आम्ही पत्रकार बांधव अगदी सकाळपासूनच घेत होतो. वातावरणात सतत विवीध मोड़ घेत होते. आता प्रतीभाताई शिंदे पुढे काय करतील ह्याची प्रतीक्षा माझ्यासह सर्वानाच लागली होती. मधेच माझा एका मित्राचा कॉल आला.
सायंकाळ खुपच तनावात जात होती. एका मित्राचा अचानक कॉल आला. काही दिवसापुर्वी त्याने नविन grand i ten कार घेतली होती. ब-याच दिवसानी त्या कार मधे बसून बाहेर कुठेतरी जाण्याचा प्लान होता मात्र वेळे अभावी ते शक्य होत नव्हते. मात्र आजचा प्रकरणाने दिवस खुपच तनावात गेला होता. सुट्टीचा दिवस, मात्र काहीच करता आले नाही. मित्राने कॉल केला कुठेतरी फिरायला जाऊया असे सांगीतले,
जुन्या मित्रासोबत फिरायला जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो नाही का ? लहानपणीच्या पावसाच्या गंमती आज कितीही मोठे झालो तरी आपल्या स्मरणात असतात. खरंच शालेय जीवनातल्या पावसाची मजा तर काही अनोखीच असते. कोणाचीही पर्वा न करता पावसाचा आनंद लुटायचा. शाळेत असताना पावसात भिजण्याचा, क्रिकेटच्या मैदानावर पावसाच्या सरी अंगावर घेत मैदानावर मज्जा करण्याचे दिवस आज पुन्हा आठवले तेच मित्र पुन्हा एकत्रित आले. निसर्गाच्या सांनिद्यात बाल मित्रासोबत वेळ घालवायला पुन्हा सज्ज झालो, असही मित्रासोबत वेळ घालवणे हां माझा छंदच आहे. शाळेतील आठवणी त्यांना आजही आठवल्या की, ते पुन्हा पुन्हा त्या पावसात भिजण्याचा अनुभव देतात. मी त्यांचा कडुन काही काळाचा अवधी मागितला. घरी जावून काही खाऊन परतावे असा विचार मनात होता. परंतु ते ही शक्य झाले नाही. एका मित्राच्या दुकानीवर जावुन फ्रेश झालो. प्याटीस खावुन पोटपूजा केली. निसर्गाचा सनिग्द्यात जाणार ह्या विचारानेच खर तर पोट भरले होते. त्यावर बाल मित्रांसह जाणे हां माझ्यासाठी एक सुखद असा अनुभव ठरणार होता. चेतन पाटील, प्रशांत पाटील, मनोज ढोले हे तिघे ही नवीन.............
कार घेवुन मला पिकउप करण्यासाठी आले. कुठे जायचे? कोणते स्पॉट चांगले आहे? हां प्रश्न विचारून त्यानी माझा समोर एक तिढाच निर्माण केला. सायंकाळचे 5:०० वाजले होते. आता जायचे कुठे हां ही एक गंभीर प्रश्नच होता. जास्त विचार न करता अगदी जवळचे व माझे आवडते असे ठिकाण मी सुचवले सर्वानी त्याला होकार दर्शवला. तलोद्यापासुन 4 ते 5 km अंतरावर निसर्गाचा कुशीत वसलेले, सबोताली नैसर्गिक खाण असलेले कोठार हे गाव आहे. उंच उंच टेकडयानी नसलेला हिरवा शालू, पक्षांची किलबिलाट, नागमोडी वळण असलेले रस्ते, विविध पक्षांचे थवे, उंचीवरुन वाहणारे धबधबे, विविध रंगी बेरंगी पक्षी, डोक्यावर चारा घेवुन घराकडे परतना शेतमजूर, सायंकाळच्या वेळी घराकड़े धाव घेणारी गुरे गुराना हाकणारा गुराखी, बैलगाडी हाकत घराकडे पलायन करणारा शेतकरी, अशी विविध दृश्य आम्हास पाहावयास मीळाल्या . रस्तालगत असलेल्या कोठार जलसिंचनात प्रकल्पात(तलाव) पोहण्याचा आनंद घेणारी लहान लहान मंडळी, तलावात विविध पद्धतीने उड्या मारून पोहन्याचा आनंद घेणा-या मुलानी आमचे लक्ष वेधले. तलावाच्या काठावर बांधलेल्या बांदावर सैरावैरा
धावणारी मुले त्यात काहीतर अगदीच लहान होती मात्र पोहंण्याचा शर्यतीत ते कोणालाही अगदी सहज हरवू शकतील असेच वाटत होते. आम्ही त्यांचे काही क्षण आमच्या कैमेरात कैद केले. त्यानंतर आम्ही कोठारच्या दिशेने पलायन केले. मधेच मनाला मोहित करणारा निसर्ग आमच्या कारला ब्रेक लावुन आमच्या कैमेरात कैद होण्यासाठी विविध रंग छटा दाखवत होता. कधी पहाडावर आलेले पांढृशुभ्र धुके आमच्या कैमरात कैद होत होती तर कधी नागमोडी वळण असलेले रस्ते , कधी खोल अश्या दरी, अश्या विवीध प्रतिमा आम्ही आमचा कैमेरात कैद करुण आपणासाठी देखील आणल्या.. आपण ही जरुर या..
सातपुडयातील सनिग्द्यात निसर्गाच्या खाणीत. निळे निळे आकाश अन उंच भरारी घेणारे पक्षी, रवी किरणांची उमटली सोनेरी नक्षी हिरवी हिरवी झाडे अन रंगीबेरंगी फुले मोर नाचरे साजरे, पिसारा फुलवून डुले धुंद, मंद वारा अन कोसळणाऱ्या धारा मखमली सुगंधाने भरला आसमंत सारा डोंगराच्या कुशीतून वाहणारी नदी फुला-फळांनी बहरलेली झाडाची फांदी सांजवेळी अवकाशी चंद्र आणिक चांदण्या लाजिरया, साजिरया अन रूपाने देखण्या वर्णू किती देवा ह्या निसर्गाची महती शब्द नाहीत मजकडे सांगण्यास किर्ती देवबाप्पा तुम्ही तर निसर्ग शिल्पकार अन तोच तर आहे मानवा तुझा जीवनाधार न जाणिलेस तू ह्या आविष्काराचे महत्त्व सृष्टी नव्हे तर दिसतेय तुला फक्त तुझे कर्तुत्त्व स्वार्थासाठी करत आहेस तू हे सारेच फस्त स्वतःहून बघणार का रे तूच तुझा अस्त? हे माणसा, आता तरी सोड तुझा अहंकार येईल रे तुझ्या जीवनात कायमचाच अंधकार वाचव ह्या वसुंधरेला सोडून मनातील अहंकार, जप निसर्गाचा स्वाभिमान सोड तु मनातील अहंकार,

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा