Breking News

शनिवार, ३० ऑगस्ट, २०१४

एस.टी. बसेसमध्ये आपत्कालीन सुविधांचा अभाव

एस.टी. बसेसमध्ये आपत्कालीन सुविधांचा अभाव जनतेच्या दळणवळणासाठी हक्काचे साधन म्हणजे
 बससेवा. दिवसभरातून अनेक प्रमाणात बसेसच्या माध्यमातून उलाढाल होते. प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद असणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये मेडिकल प्राथमिक उपचारासाठी कीट नसल्यामुळे आपात्कालीन स्थितीत अपघात घडला तर करावे काय असा प्रश्न निर्माण होतो. परिवहनाच्या नियमानुसार प्रत्येक वाहनामध्ये प्रथमोपचार पेटी तथा अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे आहे. अपघातप्रसंगी लवकरात लवकर कमीत कमी अपघाती प्रवाशाला प्राथमिक उपचार तरी मिळेल व तो स्वतःचा वेदना कमी करू शकेल अशी अपेक्षा असते. मात्र दररोज हजारांच्या संख्येने प्रवाशाची वाहतूक करणार्‍या महामंडळाच्या बससेमध्ये मेडीकल कीट उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. बससेच्या प्रवासाकडे सर्वात सुखाचा व सुरक्षित प्रवास म्हणून पाहिले जाते. मात्र अशा असुविधामुळे हाच प्रवास धोकादायक ठरू शकतो. अक्कलकुवा व शहादा येथील डेपोच्या बससेमध्ये प्रथमोपचार किट व
अग्निशामक यंत्रणा नसल्याचे आढळून येते. काही ठराविक बसेस सोडल्यानंतर अग्निशामक यंत्रणा जवळजवळ नाहीत तर प्राथमिक उपचार कीट बसेसमध्ये उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. तसेच आपात्कालीन खिडक्या देखील घडत नाही. आपात्कालीन प्रसंगात वरील अभावामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागु शकतो, अशी भिती व्यक्त होत आहे. अक्कलकुवा , शहादा आगारातील 60 टक्यांपेक्षा अधिक बसेसमध्ये मेडिकल कीट प्रथमोपचाराची व्यवस्था नाही. काही बसेसमध्ये खाली प्राथमिक पेटया आहेत. तर काही बसेसमध्ये पेटया असून त्यातील मेडीकल किट नाही. खेडया पाडयापावेतो पोहचणार्‍या प्रवाशांना खराब रस्त्यांमुळे नेहमी लहान मोठया अपघातांना सामोरे जावे लागते. तसेच मागील वर्षात व या वर्षात बरेच अपघात घडले आहेत. त्यातून प्रवाशांचे लहान मोठे अपघात झाले आहेत. मात्र त्यामध्ये आजपर्यंत कोणत्याही जखमीवर प्रथमोपचार होत नसल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. मागील 15 ते 20 दिवसापुर्वी धुळयाहून तळोद्याकरीता येणार्‍या शहाद्यालागत असणार्‍या प्रकाशाजवळ तब्येत खराब झाल्याने त्याला कुठलीही सेवा लवकर मिळाली नसल्याने ड्रायव्हरच्या व कंडक्टरच्या माथी हे प्रकरण पडू नये, याकरीता
त्यांनी तळोदा उपजिल्हा रूग्णालयात एस.टी. बस आणून प्रवाशांनी रूग्णाचा उपचार केला होता. तळोदा- अक्कलकुवा शहरातील कुठल्याही बसस्थानकातील मोजक्या बसेस सोडता अग्निशमन व्यवस्था आढळून आली नाही. बसेसमध्ये अचानक आग लागली तर ती विझविण्यसाठी महामंडळाने कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही. त्यावरच आपत्कालीन खिडक्यादेखील जाम झाल्या आहेत. यावरूनच एस.टी. महामंडळ प्रवाशांसाठी किती दक्ष आहे हे दिसून येत आहे. संबंधित यंत्रणेने याची दखल घ्यावी व प्रवाशांसाठी वरील सुविधा जनतेसाठी पुरवावी अशी मागणी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा