Breking News

रविवार, ३१ ऑगस्ट, २०१४

तळोदयातील श्री दादा गणपती

।।एकोप्याचे दर्शन घडविणारा तळोदयातील श्री दादा गणपती।। 

सातपुड्याचा पायथ्याशी वसलेले निसर्गाची खाण लाभलेले, स्वातंत्र संग्रामात सहभागी, वि.दा.सावरकर ह्यांचा पावन स्पर्शाने पावन झालेले तळदे, सर्वधर्म एकत्रीत एकोप्याने व गुण गौरवाने राहण्याची परंपरा जपणारे अशी सर्वदूर ख्व्याती तळोदा शहराने जपली आहे. भारताच्या स्वातंत्रप्रापतीच्या वर्षी सन 1947 साली एकोप्याचे प्रतिक म्हणून तळोदा शहरातील मराठा चौकात सार्वजनिक श्री दादा गणपतीची स्थापना करण्यात आली. सर्वदूर मानाचा व नवसाला पावणारा गणपती म्हणून दादा गणपतीची ओळख आहे. यंदा मंडळ आपले 68 वे वर्ष साजरे करीत आहे. लोकमान्य टिळकांनी सन 1893 पासून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यानंतर सण 1947 पासून तळोदे शहरात मराठा चौकात सार्वजनीक गणेशोत्सव साजरी करण्याची परंपरा सुरु झाली. यासाठी मराठा समाजातील शिवाजी मराठे (बोराळे) ह्यानी तळोदा शहरात श्री.दादा गणपतीची स्थापना केली. स्वत दोन महिन्यापुर्वीच गाड़े भरुन काळी माती आणून ती पाण्यात भिजत ठेवली जात होती. त्यात असणारे दगड धोंडे आदी काढून त्यात घोड्याचे लीद व पराळचे
मिश्रण करुण माती मळली जात होती. आषाड ते भाद्रपद ह्या दोन महिन्यात मूर्तीचे कामकाज पूर्ण केले जात होते. तदनंतर शेठ के डी हाईस्कूल येथील स्व प़ी व्ही पाटील सरांचा मदतीने मूर्तीला रंग रंगोटी करुण दादा गणपती तयार केला जात होता. ११ ब्राह्मण बोलवून लघुरूद्र व शास्त्रवर्तनाचे पाठ करूण श्री दादा गणपतीची स्थापना करण्यात येत होती. ह्या कामात त्यांचे सहकारी मित्र माजी नगरसेवक छबुलाल परदेशी, स्व:ताराचंद परदेशी, लाला हरी पाटील, स्व:रामभाऊ फोके, भास्कर पाटिल, आदिचा श्रीदादा गणपतीच्या स्थापनेत महत्वाची भूमिका होती. तर त्याना आर्थिक सहकार्यात तळोदा शहराचे नगराध्यक्ष भरत बबनराव माळी ह्याचे वडिल स्व बबनराव छगनराव माळी(पहेलवान) ह्यांचे आर्थिक सहकार्य लाभत होते. सुरवाती पासूनच श्री.दादागणपती हां अनंत चतुर्दशीला विसर्जन होण्याची प्रथा आहे. ती प्रथा अद्यावत सुरु आहे. या उत्सवासाठी मराठा गुरव, पाटील,माळी आदिवासी बांधवांसह इतर समाज बांधवांनीही गणेशोत्सव सुरू करण्यास सहकार्य केले. आणिबाणीच्या काळात देखील खंडन न पड़ता श्री दादा गणपतीची स्थापना करण्यात आली होती. तळोदा तालुक्यातुन मोठ्या प्रामाणात भाविक श्री.दादा गणपतीचा दर्शनासाठी उत्सकुतेने येवून मान मानतात.
त्यात नारळाची माळ, मोद्कांचा प्रसाद, पुढील वर्षासाठी गणेश मूर्तीला लागणारा खर्च, आदि सह विविध मानता मागितल्या जात होत्या. अद्यावत दादा गणपतीकड़े मागीतले सर्वच मानता पूर्ण झाल्या असल्याचे परिसरातील लोकांकडून सांगितले जाते. म्हणूनच श्री.दादागणपतीला मानाचा गणपती अशी सर्वदूर ख्व्याती प्राप्त झाली आहे. गणपती स्थापनेनंतर संपूर्ण गाव जागरण करुण भजन, कीर्तन, पोवाडे, आदि धार्मिक कार्यक्रम त्याकाळी घेण्यात येत होते. मात्र आता त्यांची जागा रंगोळी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमानी घेतली आहे. सुरवातीला फक्त काळ्यामातीचा गणपती बनवुन लाकडाच्या बंगोळीवर किवा बैल गाडीच्या चाकावर बसवण्यात येत होता. कालांतराने विविध आरास देखावे तयार करण्यात आले. मंडळाने विविध जागतीक विषयांवर प्रभोदनात्म्क देखावे, तयार केले. त्यात संस्कृतिक व धार्मिक देखाव्याचा सहभाग होता.
अंबरनाथची गुफा, बालाजी दर्शन, कलगी अवतार, अष्टविनायक दर्शन, वैष्णवी देवी,जालंधर नाताचा जन्म, भद्रा मारुती, पंढरपुर दर्शन, गेट ऑफ़ इंडिया, कारगिल युद्ध, राम मंदिर, व परिसराला गरुड़चे रूप देवून, विविध धार्मिक देखावे तयार करण्यात आले. तर मागील वर्षी शाहिदाना श्रदांजली देवुन सजीव देखावा तयार केला होता. सदर देखावे पाहण्यासाठी व नवस फेडण्यासाठी तालुक्यासह शेजारी असलेल्या गुजरात व मध्यप्रदेश राज्यातुन नागरिक गाडीबैलच्या साहयाने श्री दादा गणपतीचे दर्शन घेण्यास येत होते. दर्शनासाठी संख्या वाढत असल्याने मूर्तीची विटंबना होवू नये म्हणुन स्थापनेपासुन तर विसर्जना पावेतो ओंकार गाढे हे उपवास ठेवून ब्रमचर्याचे पालन करीत मूर्तीची देखभाल करत आहे. रात्री मंडपातच त्यांची झोपण्याची व्यवस्था केली जाते. ओंकार गाढे ह्यांची गणपतीवर विशेष
श्रदा असल्याने विसर्जनाच्या दिवशी विविध रूप धारण करुण, लाकडा पासुन विविध प्राणी घोड़ा, वाघ, हत्ती, उंदीर, रथ आदि बनवून ते ढोल ताश्यांचा तालावर आजही थिरकत आहेत. ह्यापुर्वी स्व: बाबू परदेशी हे सवा महीना उपवास करुण विसर्जनाच्या दिवशी हनुमानाचे रूप धारण करुण नृत्य करत होते. त्यांचे हे रूप पाहण्यासाठी कल्लोळ गर्दी दाटत होती. पुढच्या वर्षी स्व: बाबू परदेशी व ओंकार गाढे काय कल्पना सुचवतील ह्याची ओढ़ सर्वानाच लागायची. लाकडी तगद बनवुन श्री दादा गणपतीची गावभर मिरवणुक काढण्यात येत होती. सर्व धर्मातिल लोक एकत्रित येवून रात्रभर ढोल ताश्याचा तालावर थिरकत होते. सकाळच्या सुमारास गणेशजीचे विसर्जन केले जात होते. सध्या श्री दादा गणपती तळोदयातील माझी उपनगराध्यक्ष अनुप उदासी व नगरसेवक अजय परदेशी, जेष्ट शिवसैनिक संजय पटेल ह्यांचा मार्गदर्शनाने बसवीला जात आहे. मागील वर्षी पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या आरास स्पर्धेत व पोलीस स्टेशन कडून विविध बक्षिस प्राप्त केले. मागील वर्षा पासून राकेश गुरव हे मंडळ चे अध्यक्ष आहेत. तर उपाध्यक्ष सचिन उदासी, सचिव राजू गाढे, राहुल  पाटिल, मयूर पाटिल पंकज गुरव, योगेश गुरव, चद्रकांत पाटिल, राकेश शिंदे, दत्ता चित्ते, गणेश पाटील, विक्की गवळे आदी आहेत. ह्या वर्षी मंडलाने गो धन रक्षा ह्यावर सजीव आरास तयार केली आहे.
संकलन:- सुधाकर मराठे ९५९५००८८७४







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा