लेख वाचविण्यासाठी धडपडणारे सर्वोदय मंडळ
स्त्री भ्रूण ह्त्या एक सामाजिक कलंक, लेख वाचवा- बेटी बचाव, स्त्री भ्रूण ह्त्या थांबवा या ज्वलंत विषयावर स्वयंचलीत देखावा तळोद्यातील सर्वोदय गणेश मित्र मंडळाने साकारून वंशाचा दिवा म्हणजे मुलगीच आहे, पणती नसेल तर दिवा कसा लागणार, आता तरी विचार करा, चला सज्ज होऊ या स्त्री भ्रूण ह्त्या थांबवु या, अशा घोषवाक्यानी जनजागृती करण्याचे काम केले आहे. तळोदा शहरातील ठाणेदार गल्लीत सर्वोदय गणेश मित्र मंडळाची स्थापना २० वर्षापासून करण्यात येत आहे. यापुर्वी कारगिल युद्धातील शहीदाना श्रदांजली, बारा ज्योतिर्लिंग दर्शन गुफा, बाल कामगार रोखणे, भुत महल, शहिद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांचा स्वातंत्र्यसंग्रामातील यशोगाथा, धार्मिक, पौ राणिक, देशभक्तीपर स्वंयमचलित देखावे सादर करण्यात आले आहेत. हे मंडळ अनेकदा प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिकांचे मानकरी ठरले आहे. भारत भूमीत स्त्री शक्तीच्या रुपात आदिशक्ती जगदंबेचे पूजन केले जाते. पण त्याच भुमीत नतभ्रष्ट भ्रूण हत्येचे महापाप करतात. त्यामुळे मंडळाने जनजागृती स्त्री भ्रूण ह्त्या एक सामाजिक कलंक हां ज्वलंत विषय घेवुन आरास सादर केली आहे. एक गृहस्थ आपल्या पत्नीला गर्भजल तपासणी करण्याकरिता डॉक्टरांच्या क्लिनीकमधे आणतो. डॉक्टर मला माझ्या पत्नीच्या गर्भजल तपासणी करायची आहे हो, मला मुलगी नको, मुलगा हवा, असे ते डॉक्टराना सांगतात तेव्हा डॉक्टर यास नकार देतात. तेवढ्यात आईला गर्भातील भ्रूणाची आर्त हाक ऐकू येते. माँ, अभी तो भगवानने मेरे हातो में किस्मत की लकीर भी नहीं बनाई और ईसके पहले ही आपणे तकदीर का फैसला सूना दिया, मुझे जीने दो माँ, अशी आर्त हाक त्या मातेच्या कानी पड़ते, अशी भावनात्मक आरास साकारण्यात आली आहे. सर्वोदय गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक चौधरी, सचिव किरण ठाकरे, सह मंडळाचे पदाधिकारीनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा