Breking News

मंगळवार, ९ सप्टेंबर, २०१४

गणपती बाप्पा

'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा गगनभेदी घोषणा, वाद्यांचा दणदणाट, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि अधूनमधून येणार्या पावसाच्या हलक्या सरी अंगावर झेलत अभूतपूर्व उत्साहाच्या लाटेवर स्वार होऊन अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाला सोमवारी गणेभक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. किरकोळ घटना वगळता सार्वजनिक तसेच घरगुती गणेशांना निर्विघ्नपणे निरोप देण्यात आल्याने पोलिसांसह सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. तालोद्यात दादा गणपती व बड़ादादा गणपतीची ११ तासांच्या शाही मिरवणुकीनंतर मंगळवारी सकाळी तापी नदीत विसर्जन करण्यात आले. भव्यदिव्य देखावे आणि मोठमोठय़ा वाद्यपथकांचे आकर्षण असलेली सार्वजनिक दादा गणपतीची विसर्जन मिरवणूक तब्बल 08 तास पेक्षा जास्त वेळ चालली. पासवाच्या हलक्या सरी येत असतानादेखील विसर्जन मिरवणुकांमधील उत्साह कमी झाला नव्हता. राज्यातील अनेक भागांत विसर्जन मिरवणुका मंगळवार सायंकाळपर्यंत चालल्या. ११ दिवसांसाठी मुक्कामी आलेल्या गणपती बाप्पाला निरोप देताना अनेकांच्या भावना अनावर झाल्या होत्या.




















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा