Breking News

सोमवार, २२ सप्टेंबर, २०१४

समाजकार्यासाठी धडपडणारा युवा राजकारणी

दिलखुलास व्यक्तीमत्व, चेहऱ्यावर नेहमी आनंद, गोरगरीब सामान्य माणसाच्या मदतीला धावून जात
 प्रत्येकाच्या हाकेला साद देणारे संजय बबनराव माळी यांनी समाजात व मित्र परिवारात आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे़ आपल्या १४ वर्षाच्या राजकीय जीवनात तीन वेळा पालिका व तालुक्यातील विविध संस्थांवर प्रतिनिधीत्व करतांना संजू आबांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिले़ आज शहरातील आपत्ती, सामान्य माणसाच्या सुखदुखात सर्वात आधी आबा व त्यांची टीम आधी मदतीला पोहचते़ राजकारण करतांना आधी समाकारण हे व्रत अंगीकारलेले आबा आज तळोद्यातील समाजकार्यासाठी धडपडणारा युवा राजकारणी म्हणुन आज सर्वांना परिचीत झाले आहेत़ तळोदा शहरातील पेहलवान घराण्यात जन्मलेले संजय माळी पेहलवानीत तरबेज नसले तरी राजकारण व समाजकारणात त्यांचा हात धरणे कठीण आहे़ मनमिळावू स्वभाव, दांडगा जनसंपर्क, सदैव गरजूंना मदत करण्याची धडपड, कोणतेही काम स्वत: लक्ष घालून करून घेण्यावर भर, आलेल्या अडचणींवर योग्य तो मार्ग काढण्याची खुबी, सहकाऱ्यांना नेहमी प्रोत्साहन देत त्यांच्यात समाजसेवेसाठी उर्जा निर्माण करण्याची कला हा आबांचा मूळ स्वभाव़ आपल्या स्वभावातील महत्वाचे गुण वैशिष्टयांमुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या फार मोठी झाली आहे़ संजयआबा त्यांचे पिताश्री बबनराव पहेलवान यांचा समर्थ वारसा आहेत़ कै़बबनराव पेहलवान हे त्याकाळात राज्यातील नामांकीत कुस्तीपटू होते. तर १९६५ साली तळोद्याचे नगराध्यक्ष होते. मातोश्री विमलताई माळी नगरसेविका होत्या. बंधू भरतभाई माळी तळोदा
 तालुक्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू असून माजी नगराध्यक्ष तथा पालिकेचे गटनेते म्हणुन आजही धुरा त्यांच्या हातात आहे़ मोठे बंधू आप्पासाहेब लक्ष्मण माळी हे पी.ई.सोसायटीचे अध्यक्ष असून दुर्गम भागातील गोरगरीबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वता लक्ष घालतात़ वहिनी सौ.योजनाताई माळी या देखील तळोदा पालिकेच्या माजी नगराध्यक्षा आहेत. भरतभाई, लक्ष्मणआप्पा त्यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा शहराचा सर्वांगिण विकास होतो आहे, हे कोणी नाकारू शकत नाही़ आबासाहेबांनी राजकारण व समाजकारणात भरतभाईंचा आदर्श घेत तळोदा शहराचा विकासाच्या ध्यास नेहमी त्यांच्या डोळ्यासमोर असतो़ संजयआबा माळी यांनी २००२ साली राजकारणात प्रवेश केला़ भरतभाई यांच्या मार्गदर्शनातून आबांनी २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण हे सुत्र नेहमी पाळले़ शहरातील कोणावरही संकट येवो, त्यास मदतीसाठी आबा व त्यांचे सहकारी नेहमीच पुढे असतात़ आपल्या मनमिळावू स्वभावामुळे आबांनी आज दांडगा जनसंपर्क जोडला आहे़ आपल्या सामाजिक कामामुळे संजय माळी हे तळोदेकरांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत़ यामुळेच संजयआबा माळी हे तळोदा पालिकेत सलग तीनवेळा बहुमताने विजयी झाले आहेत़ त्यांनी समाजकारण, राजकारण यात स्वतंत्र स्थान मिळविले असून ते तालुक्यातील विविध संस्थांवर प्रतिनिधीत्व करीत आहेत़ सध्या ते पालिकेत बांधकाम सभापती, वि.वि.का.सो.चे अध्यक्ष, पीपल्स एज्यूकेशन सोसायटीचे संचालक, दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष, गणेश सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आहेत. गणेश सोशल ग्रुपच्या माध्यमातून व आपले एकनिष्ठ सहकारी योगेश मराठे, हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, भरत चौधरी, कमलेश पाडवी व सदस्यांच्या सहकार्याने सतत नवनवीन उपक्रम राबवित आहेत़ तळोदा शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले आहे़ वेळोवेळी गोरगरीब जनतेला मदतीला धावून जाणे, शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या मदत करण्यासाठी आबा व त्यांचे सहकारी नेहमीच धावून जात असतात़ तळोदा शहरात शांतता नांदावी, एकता निर्माण व्हावी यासाठी राम रहीम गणेश
मंडळ उत्सव साजरा केला जात आहे़ दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन, शहरातील रूढी परंपरा जपण्यासाठी रावण दहन कार्यक्रम, गणेश आरास स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आदींसह विविध कार्यक्रमात अग्रेसर राहून तळोदा शहरात एक वेगळी छाप गणेश सोशल ग्रुपने निर्माण केली आहे़ सदर ग्रुप समाजकारणात अग्रेसर असून तळोदा शहरवासीयांच्या सेवेसाठी अंबुलेन्स सेवा, विकलांगासाठी सायकली वाटप, पूरग्रस्तांना अन्न वाटप, गरीब कुटुंबातील कोणी मयत झाले तर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी मदत करण्यासाठी संजय आबांच्या नेतृत्वातील गणेश सोशल गृपची टीम नेहमीच अग्रेसर राहत आहे़ प्रत्येकाशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणुन घेवून आधी त्या कशा सोडविता येतील यासाठी संजय आबांचे नेहमीच प्रयत्न राहतात़ आबांचे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध, सामान्यांसह शहरातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुखात हजर राहणारे आबांचे राजकारणातील विरोधक देखील मित्र आहेत़ आज आबांचा वाढदिवस... आबा करीत असलेल्या सामाजिक कामाला शहरातील पत्येकाची साथ लाभत आहे़ आबांच्या हातून नेहमी अशीच सामान्य व शहरवासियांची सेवा घडत राहो हीच त्यांना हार्दीक शुभेच्छा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा