भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा बोरद येथील गरबा
तलोदा तालुक्यातील बोरद गावात गरब्याचा माध्यमातुन भारतीय संस्कृती दर्शन घडविले जात आहे. विविध रुप धारण करुण गरबा उत्सव साजरी करण्याची एक आगळी वेगळी प्रथा दत्त गरबा मंडळ तर्फे गावात रुजवंण्यात आली आहे. सदर गरबा पाहण्यासाठी तलोदा तालुक्यासह शहादा,प्रकाशा, नंदुरबार, आदि परिसरातील नागरीकांची गर्दी होत आहे.
ह्यावरून सविस्तर वृत्त असे की गुजरात सीमेलगत असलेल्या तलोदा तालुक्यातील बोरद गावात श्री. काशीनाथभाई पटेल ह्यानी अंबिका मातेचे मूर्तीची स्थापना करुण गावात मंदीर उभारले. तदनंतर त्यांचे सुपुत्र दत्तात्रय काशीनाथ पाटील ह्याचा मार्गदर्शनाने सन 1990 मधे दत्त गरबा मंडळाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला सर्वसामन्य गरबे होवु लागले. आसपासच्या गावातील अनेक मंडळी गरब्यात सहभागी होवु लागले. मात्र कालांतराने गरब्याचे स्वरुप बदलत गेले. नवरात्रीच्या नऊ दिवस रोज विविध अवतार परिधान करुण गरबा नृत्य करण्याचा
एक आगळा वेगळा पायंडा गावात रुजला ,
गावातील युवाकानी प्रचंड प्रमाणात ह्या गरबा नृत्याला साथ दिली. ह्यावर्षीही नवरात्रच्या पहिल्या व दुस-या दिवशी यमाचा अवतार धारण करुण गरबा नृत्य सादर केले. तर तिस-या दिवशी आदिवासी समाजातील कुलदैवत देवमोगरा मातेचा अवतार धारण करुण विविध दाग दागिने परिधान करुण शिबली नृत्य सादर करण्यात आले. तसेच चौथ्या दिवशी विष्णु अवतार, पाचव्या दिवशी महिषासुर अवतार, सहाव्या दिवशी भारत मातेचे अवताराचे दर्शन घडवले. वरील सर्वच अवतारमय गरबे पाहण्यासाठी आसपासच्या गावातील नागरिकांची प्रचंड प्रामाणात गर्दी उसळत आहे. वरील सर्वच अवतरापैकी भारत मातेचा अवतार पाहण्यासाठी
तलोदा न.पा.चे नगराध्यक्ष सौ योजना माळी व लोकसंघर्ष मोर्चाचा नेता प्रतिभाताई शिंदे, तलोदा शहरातील जहांगीरदार विद्या बारगळ आदी मान्यवर उपस्थीत होते. दत्त गरबा मंडळाच्या एका सद्स्यानी भारत मातेचा अवतार धारण केला होता. तर काही सद्स्यानी संपूर्ण शरीराला भारतीय ध्वजाचा रंगाचे कपडे परिधान केले होते. व अंगाला देखील तसाच रंग लावला होता. एका युवकाच्या हातात अशोकचक्र देण्यात आले होते. तसेच बदलत चाललेली भारतीय संस्कृतीचे रूप ह्यावेळी दाखवण्याचा प्रयत्न दत्त गरबा मंडळातर्फे करण्यात आला. त्यात महिलांचे आधुनिक फैशन चश्मा, स्कुटी सह शोर्ट पोशाख धारण करुण गरब्यात स्कूटीवर बसुन स्कुटिचा फेरा मारण्यात आल्या. तर काही युवकानी हत्ती सह विविध प्राण्यांचे रूप धारण करुण नृत्य सादर केले. लहान बालकांसह उपस्थीत मान्यवरांचे मन जिंकली. सदर गरबे पाहण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील अनेक मान्यवर दररोज भेटी देत आहेत. त्यात नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद्माकर वळवी, तलोदा न.पा.चे गट नेते भरतभाई माळी, लोकसंघर्ष मोर्चाचा नेता प्रतिभाताई शिंदे, निसार मक्रानी, अरविंद मगरे आदीसह अनेक मान्यवरानी उपस्थिती दर्शवली आहे.सर्वानिच दत्त गरबा मंडळाचे कौतुक करुण
पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर अश्या आधुनिक युगात युवक मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुशनासह पैशाचा चुराळा करत भारतीय संस्कृती विसरत चालले आहे. मात्र तश्याच वातावरणात संस्कृतीची विविधता जपुन ठेवण्याचे कार्य बोरद ह्या गावातुन होत असल्याचा अभिमान वाटतो. दत्त गरबा मंडळाचे अनुकरण करुण सर्वत्र अश्याच प्रकारे गरबे साजरी व्हावे अशी इच्छा उपस्थीत गरब्याच्या सत्कार प्रसंगी तलोदा न.पा.चे गटनेते भरतभाई माळी ह्यानी दिली. गरबा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय पाटील, विद्यमान अध्यक्ष किशोर पाटील उपाध्यक्ष योगेश पाटील सचिव जयेश पाटीलसह गायक व वाजक ह्यांचा उपक्रमाची स्तुती करुण शुभेच्छा दिल्या.....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा