सावरकरांची तळोदयाला भेट
स्वातंत्राच्या धगधगत्या अग्निकुंडात सर्वस्व झोकून देणारे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांनी संपुर्ण भारतात भेटी देवून निधी गोळा कला. तसेच स्वातंत्रयसमर अधिक चेतविला. त्याच अभियानाअंतर्गत दि.१३ मार्च १९४० रोजी त्यांनी तळोदा शहराला भेट दिली. दि.१३ मार्च १९४० रोजी स्वातंत्रवीर वि.दा.सावरकरांचा शहरातील इतिहास प्रसिद्ध् बारगळाच्या गढ़ीत सत्कार करण्यात आला. येथील सामाजिक कार्यकर्ते अमरजीत बारगळ यांनी सावरकरांना मानपत्र देवून त्यांचा सत्कार केला.... दुपारी दोन वाजता बारगळाच्या गढ़ीत स्वातंत्रवीर सावरकर यांचे आगमन झाले. त्यांचा सत्कार करुण त्यांचा कार्याबद्दल त्यांना मानपत्र देण्यात आले. गावकऱ्यातर्फे त्यांना देशकार्यासाठी निधीही देण्यात आला. याप्रसंगी सावरकर यांनी देशभक्तीपर भाषणही केले. त्यांची देशप्रेमाने भरलेली अमृतवाणी ऐकण्यासाठी आजुबाजूच्या परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. स्वातंत्र्याचे धगधगते अग्निकुंड चेतविण्याचे देशप्रेमाचे मंतरलेले ते दिवस होते.अनेकांनी त्यावेळी स्वातंत्रवीर सावरकरांचे दर्शन घेतले.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा