Breking News

शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०१४

तळोदा वासियांचे श्रद्धास्थान असलेली कालीका माता

तळोदा शहराच्या खर्डी नदीकाठावर सुमारे ११४ वर्षांपूर्वी बारगळ जहागीरदारांनी कालिकादेवी मंदिराची उभारणी केली होती. गावाच्या वेशीवर असलेल्या या मंदिरातील कालिकादेवीवर शहरासह तालुक्यातील भाविकांची श्रद्धा आहे. या ठिकाणी दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची नवस फेडण्यासाठी गर्दी होत असते. उत्सव काळात जिल्हाभरातील भाविकांकडून कालिका मातेला साडीचोळीचा अहेर करण्याची परंपरा आहे. यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरावर रोशणाई करण्यात आली आहे. परिसरातील भाविक पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी करतात. मंदिराची देखभाल वत्सलाबाई गुरव ह्या करीत आहेत. तालुक्यासह गुजरात व मध्य प्रदेशातील भाविकांची कुलदेवता असल्याने येथे नवरात्रोत्सवात नवस फेडणार्‍यांची मोठी गर्दी होते. नवरात्रोत्सवानिमित्त दररोज सकाळी आणि सायंकाळी महाआरती करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांकडून वर्षभर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली जाते. तळोदा शहरातील जुनेजाणते नागरिक आजही कोणतेही नवीन कार्य मंदिरावर दर्शन घेऊनच सुरू करतात. नवसाला पावणार्‍या कालिकामातेला नारळ वाहून नागरिक प्रवासाला प्रारंभ करतात. तळोदावासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या कालिकामाता मंदिरात नवरात्रोत्सवात गरब्याचे आयोजन केले जाते. शहराच्या वेशीवर असलेल्या कालिका मातेचा दरवर्षी अक्षय्यतृतीयेला मोठा यात्रोत्सव होतो. या यात्रोत्सवात हजारोंच्या संख्येने जिल्ह्यासह गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील भाविक येऊन नवस फेडतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा