Breking News

सोमवार, १६ मार्च, २०१५

तळोदा येथे पहिल्या दिवशी १20 अतिक्रमणे काढली

तळोदा येथे पहिल्या दिवशी १20 अतिक्रमणे काढली  ■ एकीकडे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना
दुसरीकडे अनेक व्यावसायिक स्वत:हून आपली अतिक्रमणे हटवित असल्याचे दृश्य सकाळनंतर दिसून आले. तसेच ज्यांनी आपल्या घरापुढे अतिक्रमणे केली होती असेही नागरिक नुकसानीच्या भीतीपोटी स्वत:हून अतिक्रमित भाग काढत असल्याचे दिसत होते. तळोदा :शहरात पालिकेमार्फत सोमवारी सकाळी नऊ वाजेपासून कॉलेज रोड येथून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली. १२ जानेवारी २०१५ रोजी ५७९ अतिक्रमण धारकाना नोटिसा बजावल्यानंतर आज १६ मार्च रोजी अतिक्रमणाला उत्साही सुरुवात
करण्यात आली. पहिल्या दिवशी शहरातील एकूण १२० अतिक्रमणे काढण्यात आली. अतिक्रमण काढताना व्यापारी व मुख्याधिकार्‍यांमध्ये छोटे मोठे वाद देखील झाले. अतिक्रमणात असलेली घरे, दुकाने, इमारती, टपरी, ओटे, पायर्‍या इत्यादी बुलडोझर व जेसीबी मशीनच्या साहाय्याने काढण्यात आले. शहरातील कॉलेज रस्त्यावर येणाऱ्या किरण गॅस
ऐजंसीचे मालक ह्यांच्या ३ फुट अतिक्रमण ओटा काढण्यात आला. तर त्याच परिसरात घरचा वरच्या मजल्यावर मोती बँकेचे कार्यालय तर खाली वीज वितरण कंपनीचे कार्यालय असलेल्या इमारतीचा १० ते १२ फुट पुढील भाग येत असल्याने तो पालिकेने तोडला. या मोहिमेचा फौजफाटा,
अधिकारी-कर्मचार्‍यांचा लवाजमा पाहून अनेक दुकानदारांनी स्वत:हून आपल्या दुकानांचे शेड काढून घेतले. काहींनी स्वत: अतिक्रमणे काढून घेतली. हुतात्मा चौकातील हॉटेल समाधानचे अतिक्रमण काढताना हॉटेल मालक मोहन कलाल, व मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्यात वाद झाला. या वेळी दुकानदाराचे म्हणणे होते की, आम्हाला पालिकेने नोटीस दिलेली नाही. आमचे अतिक्रमण नाही, यावर मुख्याधिकार्‍यांनी सांगितले की, हे अतिक्रमण आहे. ह्याविषयावरुण यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावर मुख्याधिकार्‍यांनी नगर भूमापन अधिकार्‍यांकडून दुकानाची रीतसर मोजणी करून घेऊ, अतिक्रमण नसल्यास पालिकेकडून त्यांना नुकसान
 झाले असल्यास भरपाई मिळणार असल्याचा दावा केला. स्मारक चौकात जंगशहीद बाबांचा दर्गा आहे. या दग्र्याचा काही भाग अतिक्रमणात येतो, असे पालिकेचे म्हणणे आहे. येथे मुस्लीम समाज पंचाने समजूतदारपणा दाखवून जो भाग अतिक्रमणात येतो, तेवढा भाग स्वत:हून काढून घेतला. यामुळे येथील वाद टळला. या मोहिमेत पालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलीस निरीक्षक सतीश भामरे, फौजदार डी.बी. लोंढे, दिलीप चौधरी, युवराज साळुंखे यांच्यासह स्थानिक तसेच बाहेरील पुरुष व महिला कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे जवान मोठय़ा प्रमाणात तैनात करण्यात आले आहे.
ही मोहीम सुरू होताच शहरातील बघ्यांची प्रचंड गर्दीजमा झाली. या गर्दीला आवरणे पोलिसांनाही अवघड झाले होते. पालिकेच्या सर्व विभागाचे कर्मचारी, बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी कार्यालय, नगर भूमापन यांच्यासह इतरांचा प्रचंड ताफा हजर होता. शहरातील अनेक घरांवरून विजेच्या तारा गेल्याने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना कोणताही अनर्थ घडू नये यासाठी वीज वितरण कंपनीनेही वीजपुरवठा बंद केलेला होता. ही मोहीम तीन दिवस चालणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. सोमवारी सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात कॉलेज रस्ता, हुतात्मा चौक, स्मारक चौक, मेन रोड या भागातील १२० अतिक्रमणे काढण्यात आली. नगर भूमापन अधिकारी उपस्थित नसल्यामुळे याबाबत तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या.
शहरात आज सलग दुसर्‍या दिवशी अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. यात एकुण २५० अतिक्रमण धारकांवर हतोडा फिरवण्यात आला. हयात अनेक प्रतिष्ठीत, व्यापार्‍यांची अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात आली. शहरात कालपासून अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येत आहे. अतिक्रमण काढतांना कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता मोहिम राबविण्यात येत आहे. अनेक उच्चभ्रू, प्रतिष्ठीत नागरिक, व्यापारी यांची अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात आली.त्यामुळे अतिक्रमण धारकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सदर मोहिमेत
शहरातील ५७९ अतिक्रमण धारकांना पालिका प्रशासनातर्फे यापुर्वीच नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या मोहिमेत आज मारोती मंदिरापासून मेनरोड, गणपती गल्ली, तेथून पुढे थेट हातोडा रस्त्यावरील शेठ के.डी. हायस्कूलपर्यंत, स्मारक चौकापासून पुढे देशपांडे फोटो स्टुडिओपर्यंत बसस्थानकाकडे जाणारा मार्ग, त्यापुढे जुनी सुभाष टॉकीज मार्गावरील पोलीस ठाण्यापर्यंतची अतिक्रमणे काढण्यात आली. अतिक्रमण हटाव मोहीम राबवित असताना अनेक ठिकाणी  दुकानदार व मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्यात दुसर्‍या दिवशीही वाद  झाले. पण
 मुख्याधिकार्‍यांनी कोणत्याही वादात न पडता, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता आपले काम सुरू ठेवले. पहिल्या दिवसाप्रमाणे दुसर्‍या दिवशीही बंदोबस्तासाठी प्रचंड फौजफाटा होता.  तळोदा पालिका हद्दीत तिस-या दिवशी अतिक्रमण हटाव मोहिमेत आज 209 अतिक्रमण काढण्यात आले बस स्थानका पासून अंतरावर असलेल्या शिवराम नगर जवळ अतिक्रमण काढण्यात येत असतांना अचनक काही अतिक्रमण धारक व शहरात प्रतिष्ठित असलेल्या लेखी निवेदन घेऊन मुख्याधिकारी पवार यांना न्यायालयात याबाबत दावा सुरु आहे व स्थगिती आली असल्याचे सांगत अतिक्रमण हटाव बंद करा मात्र मुख्याधिकारी यांनी तसा आदेश द्या सांगिल्यावर वाद घातला यामुळे काही काळ तनाव निर्माण झाला होता तळोदा पालिकामार्फत गेल्या तीन
 दिवसा पासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली पहिल्या दिवशी 120 दुस-या दिवसी 250 तर आज तिस-या दिवशी209अतिक्रमण काढण्यात आले तीन दिवस सुरु असलेल्या मोहिमेत एकूण 579 अतिक्रमण हतविन्यात आले. आज देशपांडे फोटो ते बस स्थानका पर्यन्त शहादा रोड शिवराम नगर हरकलाल नगर मेनरोड नंतर चिनोदा रोड, बडरी कॉलनी, मुख्य रोड, अदि पर्यन्त अतिक्रमण हट्विन्यात आले प्रांतधिकारी देवद्त्त केकांत तहसीलदार श्रीमती उषारानी देवगुणे यांनी लक्ष्य ठेवून होते. हयात पालिका प्रशासन मुख्याधिकारी जनार्दन पवार, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्रीमती. उषारानी देवगुणे तथा पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा