Breking News

रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

पुण्यनगरीचा परिणाम* स्मशानभूमी नसलेल्या गावांना अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश

माझ्या बातमीची दखल  दि १९ रोजी प्रसारित झालेल्या तळोदा तालुक्यात ५१ गावात स्मशानभूमीचा अभाव या माझ्या वृताची दखल नंदुरबार जिल्ह्याधिकारी कलशेट्टी यांनी तत्काळ घेवून संबंधित प्रशासनाला अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले....  धन्यवाद साहेब..

 स्मशानभूमी नसलेल्या गावांना अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश
`पुण्यनगरीचा दणका' : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बीडीओनी दिल्या सूचना.... 
 पुण्यनगरीच्या बातमीनानंतर प्रशासनाला आली जाग    
तालुक्यातील आदिवासी बहुल गावांमधील पक्क्या स्मशानभूमी नसलेल्या व शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या नसलेल्या गावांचा परिपूर्ण प्रस्ताव व ग्रामपंचायत निहाय बांधकामाचे अंदाजपत्रक बाबत माहिती उपलब्ध करण्याचे आदेश गटविकास अधिकारी शरद मगर यांनी संबंधित ग्रामसेवकाना दिले आहेत. याबाबत दै.`पुण्यनगरी' तुन तळोदयातील स्मशानभूमी नसलेल्या गावातील स्थिती व नागरिकांच्या अडचणी मांडण्यात आली होती. या वृताची दखल घेवून संबंधित अधिकाऱ्याना सूचना केल्या आहेत. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यानी संबंधित ग्रामसेवकांना आदेश बजावले आहेत. तळोदा तालुक्यातील ५१ग्रामपंचायतींना स्मशानभूमीचा अभाव ` अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून प्रशासन याकडे दुर्लक्ष असल्याची बातमी दि-१९ रोजी `दै. पुण्यनगरी'वृत्त प्रसारित करण्यात आले होते. या वृताची दखल  घेतली आहे. जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये तळोदा गटविकास अधिकारी शरद मगर यांनी ग्रामसेवकाना आदेश बजावले आहेत. या आदेशात शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या नसलेल्या गावातील पक्क्या स्मशानभूमी नसलेल्या गावांचा परिपुर्ण प्रस्ताव  व
  ग्रामपंचयाती निहाय बांधकामाचे अंदाजपत्रक तात्काळ मागविण्यात आले आहेत. तळोदा तालुक्यात दुर्गम अतिदुर्गम भागातील ६७ ग्रामपंचायतीपैकी ५१ गावांना स्मशानभूमी नसल्याने मयतांवर अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातील बहुतेक गावांमध्ये जागा असून देखील स्मशानभूमी नाही. तर काही गावात जागेअभावी स्मशानशेड बांधण्यात आलेले नाहीत. अशी अवस्था आहे. त्यामुळे नदी नाल्याच्या काठावर तर काही गावात शेतावरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. याबाबत वृत्त प्रकाशित होताच जिल्हाधिकारी कलशेट्टी यांनी दखल घेतली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने गटविकास अधिकारी शरद मगर यांनी पक्क्या शेड नसलेल्या  अंमलपाडा, रामपूर, रतनपाडा, अमोनी, रापापुर, धवळीविहीर,कोठार, चौगाव खुर्द, खर्डी बु, चौगाव बु, छोटा धनपुर, चिनोदा, दलेलपुर, धनपुर, सिंलिंगपूर, खर्डी, खु,सावरपाडा, अलवान,इच्छागव्हाण, करडे, काझीपुर, खरवड (गोसावी वस्ती), खेडले, खुशगव्हाण, बेलीपाडा, लाखापुर फो, लाखापुर रे, लोभानी, मोहिदा, मोरवड, नवागाव, न्यूबन, पिंपरपाडा, राणापुर, बंधारा, पाडळपुर, जीवननगर (गोपाळपूर पुन), रोझवे, सलसाडी, सरदारनगर, शिर्वे,सोमावल खु, तळवे , तऱ्हावद, (आदिवासी वस्ती) गंगानगर (तऱ्हावद पुन),वाल्हेरी, झिरी आदी स्मशानभूमी नसलेल्या ४७ गावांचे प्रस्ताव व स्मशान भूमी बांधकामाचे ग्रामपंचायती निहाय अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी मगर यांनी बजावले आहेत.

 *प्रतिक्रिया*- जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने तळोदा तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या नसलेल्या, स्मशानभूमी नसलेल्या गावांचे प्रस्ताव व बांधकामांचे अंदाजपत्रक तात्काळ ग्रामसेवकाना सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 




शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

तळोदा तालुक्यात 51 ग्रामपंचयातीना स्मशानभूमीचा अभाव......

आयुष्यभर सुख दु:खाचे चटके सोसणाऱ्या माणसांची मृत्यूनंतरही अवहेलना होत असल्याचे चित्र समोर आले आहे.आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील तळोदा तालुक्यातील 50 पेक्षा अधिक गावांना स्मशानभूमी नसल्याने मयतावर अंत्यसंस्कारासाठी समस्यां निर्माण होण्याची दुर्दवी प्रकार संबंधीत प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे उदाहरण आहे. अनेक गावांमध्ये जागा असून देखील स्मशानभूमी नाहीत. तर काही गावात जागेअभावी स्मशानशेड बांधन्यात आलेले नाहीत. अशी अवस्था आहे. त्यामुळे नदी, नाल्याच्या काठाणवर तर काही गावांत शेतावरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.                          
तळोदा तालुक्यात बहुतेक गावांना स्मशानभूमीचा अभावी मरणानंतर हि मरण यातना भोगाव्या लागत आहेत. अनेक गावांमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी उघड्या जागेचा वापर करावा लागत असल्याने पावसाळ्यात अनेक अडचणी निर्माण होत आहे. तालुक्यातील 67 ग्रामपंचायतीपैकी 51 ग्रामपंचायतींना स्मशान भूमी नसल्याने ऐन पावसाळ्यात मयतावर अंत्यसंस्कार करावेत कुठे असा प्रश्न नाग्रीकांसमोर उपस्थित होत आहे.  
तळोदा तालुक्यात एकूण 67 ग्रापंचायती आहे. 67 ग्रामपंचायत पैकी केवळ 16 गावानाच ग्रामपंचायतीच्या पक्क्या स्मशानभूमी आहेत. उर्वरित 51 गावांना स्मशानभूमी अभावी मरणानंतरही मृत्यू देहाचा अवहेलना होत आहे. स्मशानभूमी शेड नसल्यामुळे पावसाळ्यात गावातील एखाद्या व्यक्तीच्या निधन झाल्यास अंत्यसंस्काराची प्रमुख अडचण निर्माण होत आहे.
चिखलात बसूनच मृतदेहाला अग्निडाग द्यावा लागण्याची वेळ नातेलगांवर येत असल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे. स्मशानभूमीत शेड नाही, पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था व पाऊस यामुळे मृतदेहासह नातेवाईकांना जीवंतपणे नरक यातना सहन करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे समस्यां असलेली गावे हि आदिवासी बहुल लोकसंखेच्या आहेत. निवडणुकीसाठी आदिवासींच्या नावावर मतांचा जोगवा मागणाऱ्या प्रतिनिधनीही याकडे दुर्लक्ष केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधीत विभागाने लक्ष घालून गावांमध्ये उभारावी, अशी मागणी करण्यात येत आहे...
*स्मशान भूमी नसलेली अथवा कच्ची स्मशानभूमी असलेले गावे* अंमलपाडा, रामपूर, रतनपाडा, अमोनी, रापापुर, धवळीविहीर,कोठार, चौगाव खुर्द, खर्डी बु, भंवर, चौगाव बु, छोटा धनपुर, चिनोदा,दलेलपुर, दसवड, धनपुर, सिंलिंगपूर, खर्डी, खु,सावरपाडा, अलवान,इच्छागव्हाण, करडे, काझीपुर, खरवड, खेडले, खुशगव्हाण, बेलीपाडा, लाखापुर फो, लाखापुर रे, लोभानी, मोहिदा, मोरवड, नवागाव, न्यूबन, पिंपरपाडा, राणापुर, बंधारा, पाडळपुर, जीवननगर (गोपाळपूर पुन), रोझवे, सलसाडी, सरदारनगर, शिर्वे,सोमावल खु, तळवे , तऱ्हावद, गंगानगर (तऱ्हावद पुन),वाल्हेरी, झिरी आदी
 पक्की स्मशानभूमी असलेली गावे  बोरद, नर्मदा नगर, नलगव्हाण, रांझणी, प्रतापपुर, राजविहिर, राणापुर, रोझवे पुन, सोमावल बु, तुळाजे, आमलाड, बुधावल, धानोरा, मालदा, मोड, मोदलपाडा या बोटावर मोजण्या इतक्या गावांना शेड असलेली स्मशानभूमी आहेत.

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०१६

खान्देशी चिमटा गाजतोय सोशल मिडियावर

तळोदा तालुक्यातील शिक्षकांच्या खान्देशी भाषेतील चिमटा गाजतोय सोशल मिडियावर, राज्यभरातून मिळतोय प्रतिसाद, सध्या सर्वत्र सोशल मीडियाचे वेड लागलंय, अगदी लाहान्यान पासून वयोवृद्ध व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करताना दिसतोय. फेसबुक, व्हाट्टसअप्प, ट्विटर आदी सोशल साईटवर खाते उघडून वेगवेगळी माहिती शेयर करण्यात तरुण पुढे आहेत. त्यातच कॉपी पेस्ट करणारे, स्वतंत्र लिखाण करणारे असे अनेकजण सोशल मिडियावर दिसतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतंत्र लेखक तयार होत आहेत. त्यातच आपल्यात असलेले कला कौशल्य सादर करण्यासाठी सोशल मीडिया हि एक हक्काची जागा बनली आहे... यांवरूनच तळोदा तालुक्यातील तळवे माध्यमिक शाळेतील मिलिंद धोदरे या शिक्षकाने सोशल मीडियाच्या वापर करत फेसबुक वर खान्देशी चिमटा म्हणून स्वतंत्र पेज बनवले आहे. आपल्या अफाट वाचनाच्या फायदा व शब्द यमकात जुडवण्याच्या त्यांच्या कलेने अनेक कविता तसेच जागतिक विषयांवर मार्मिक व टीकात्मक भाष्य ते करीत आहे आहे. शिक्षक धोदरे हे ज्ञानदाना सोबतच आपल्यात असलेले कौशलगुण सोशल मीडियाच्या साह्याने शेयर करत आहे. अहिराणी भाषेची गोडी निर्माण व्हावी, भाषेचा प्रसार व्हावा, हा हेतू मनात बाळगून जागतिक विषयावर खान्देशी भाषेवर मार्मिक लेखानाच्या माध्यमातून (चिमटा) ते दररोज फेसबुक पेजवर लोड करीत आहे. राजकारण, समाजकारण चालू घडामोडी आदी विविध विषयांवर मिलिंद ढोढरे यांनी मार्मिक (टीकात्मक) लेखन केले आहे.
    त्यात नुकत्याच घडलेल्या घटना बाबत

यंदा ना पावसाळा तर भलताच चावट शे! 
कोठे कमी ते कोठे त्यानं भीतीनं सावट शे! 
जुना जमाना ना, जरी त्या पूल शेतस!  तुना कहर माँ त्या पण आज गुल शेतस!  चुक्या आमन्या शेतस तरी बोट तूनाजकडे दाखवसुत,  आते पासून आम्हे आश्या जुना पुल्सना मागे लागसुत! 

अश्या जागतिक व ताज्या विषयावर चिमटा घेतला आहे. तसेच

पेट्रोल भरले आले हेल्मेट न्या जरी सक्त्या शेतस!*  त्यांना पहिलेच जनता या भारी-भारी युक्त्या शेतस!  काही काही गोष्टी  पल पल घडी वर,  फक्त मरण स्ले सांगाले जरी सजवा नई!  नाईलाजे पेट्रोल भरापुर्त मांगाले तरी कोणी लाजव नई!  कोणा पण .... डोकास्वर कोणी लन टोपी ऱ्हास ! ज्याफा हेल्मेट नई! त्याले आई बत सोफी ऱ्हास!

पाचोरा बारी येथील घडलेल्या घटनेवर


                                         रातना टाईम, सार काही पल भर मा घडी गय!  दुसरा च क्षण ले घर ना पण वर पाणी चढी गय!  सारं काही वाही गय! फक्त डोया मा धारा राहेल शेत!  त्या ढग फुटी माँ गणज जीव पाचोरा बारी मा जायेल शेत!
तो महापुर निघी गया गरीब दुब्यासले मारीनी! 
तुमले जी पण मदत करता येई, ल्या गरिबस्ले तारी नी!.... 


अश्या प्रकारे मार्मिक चिमटा तयार करून पाचोरा बारीत वाहून गेलेल्या घरे, व्यक्ती यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची मागणी त्यांनी चिमटाद्वारे केली होती.. अश्या प्रकारचा शासनाने हेल्मेट निर्णय कोपर्डी घटना, अश्या विविध विषयांवर त्यांचे मार्मिक चिमटे प्रसिद्ध झाला होता. सदर चिमटयाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. आतापावेतो त 150 खान्देशी चिमटे सोशल मीडियावर अपलोड झाले आहेत. साहित्याची आवड असलेल्या मिलिंद धोधरे यांच्या कविता साहित्य संमेलनात गाजल्या आहेत. अनेक साहित्यिक त्यांना साहित्य संमेलनात आवर्जून बोलवतात. या व्यतिरिक्त खान्देशी चिमटा ह्या लेखनाने त्यांना एक वेगळी ओळख दिली आहे. सदर चिमटा हा खान्देशसह राज्यभरात सोशल मीडियावर फिरत आहे. राज्यभरातून विविध ठिणाहून चिंमटयाला दाद मिळत आहे. विशेष म्हणजे सदर चिमटा हा खान्देशी भाषेत असल्याने सर्वत्र खान्देशात हे पेज प्रसिद्ध झाले आहे. सदर लेखनाला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 
पुणे येथून अहिराणी कस्तुरी या मासिकाचे संपादक तथा अहिराणी साहित्यिक विजयाताई मानमोळे, आदींसह अनेक जेष्ठ लेखकांनी मिलिंद धोधरे यांची भेट घेतली आहे. धुळे येथील जेष्ठ साहित्यीक रमेश यांच्या त्र्यमासिक खान्देशनी वानगी यात खान्देशी चिमटा प्रसिद्ध होत आहे...*
 इंग्रजी भाषेचा वाढता कल त्यामुळे अहिराणी भाषेला आलेली मरगड, आदी पाहता भाषा टिकून राहावी भाषेचा ओलावा निर्माण व्हावा ह्या हेतूने खान्देशी चिमटा हे पेज तयार केले आहे. खान्देशी चिंमटयाला आधुनिकतेची जोड म्हणून त्यात विविध रंग इफेक्ट्स चित्र आदींचा वापर करून अधिक आकर्षित बनविण्याचा प्रयत्न आहे. साधारणतः 1 चिंमट्या करिता 5 तास लागतात. मात्र लेखनाला मिळालेली दाद ऊर्जा वाढवण्याचे काम करते. चिंमटयाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे.
 मिलिंद धोदरे...



चॉकलेट खाल्ल्याने विषबाधा

तळोदयात किंडर जॉय चॉकलेट खाल्ल्याने चार वर्षाचा मुलीला विषबाधा झाल्याची घटना घडली.
ह्याबाबत पालकांमध्ये भीती निर्माण झाली असून. डॉक्टरांकडून दूषित अन्न किंवा चॉकलेट्स आदी खाद्य खाद्य पदार्थापासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.. ह्यावरून अधिकवृत्त असे की तळोदा येथील ओमप्रकाश चौधरी यांची 4 वर्षांची मुलगी कोमल ओमप्रकाश चौधरी ह्या चिमुरडीला किंडर जॉय नामक चॉकलेट्स खाल्याने तिला लगेचच अस्वस्थ वाटू लागले. मळमळ व पोटदुखीचा त्रास झाला. तत्काळ जागेवर जाऊन कोसळली. सदर घडलेल्या प्रकाराने पालक घाबरले त्यांनी तत्काळ तळोदा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले..... डॉक्टरानी तिच्यावर उपचार केले. पालकांना प्रश विचारल्या नंतर अनेक दिवसापासुन पडून असलेल्या किंवा दूषित असलेले चॉकलेट्स खाल्याच्या कारणांने बाधा झाली असल्याचा डॉक्टरांनी प्राथमिक अंदाज वर्तविला.. रंगबिरंगी गोळ्या-चॉकलेट, खाद्य पदार्थासोबत विविध वस्तूंची आमिष अशा नाना प्रकारच्या खाद्य पदार्थांकडे लहान मुले पटकण आकर्षीत होतात व खरेदी करतात. बालकांच्या हट्टीपणापुढे पालकांना झुकावे लागते. मात्र सदर खाद्य पदार्थामुळे गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंडेर जॉय चॉकलेट्समध्ये विविध प्रकारची खेडणी येत असल्याने लहान मुलांमध्ये सदर चॉकलेट्सबाबत मोठ्या प्रमानात आकर्षण आहे. सदर चॉकलेट साधारणतः 30 ते 35 रु दरम्यान येत असल्याने सर्वसामान्य ते खरेदी करण्याचे टाळतात. त्यामुळे ते अनेकदिवस दुकानात पडून राहते. व ते खान्यालायक नसते. मात्र तरी देखील अनेक दुकानदारांनाकडून एक्सपायरी चॉकलेट्स आदी विकली जाते. यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हीबाब अतिशय गांर्भीयाने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण अशा प्रकारच्या गोळ्या-बिस्टिक व इतरा खाद्यपदार्थातून विषबाधा होऊन मृत्यू झाला तर उत्पादन करणाऱ्या व्यक्तीस पकडणे कठीण जाईल यात शंकाच नाही. असल्या प्रकारच्या चॉकलेट्स अथवा खाद्यपदार्थाची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६

वाढदिवसाच्या मोरपंखी शुभेच्छा....

।। वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा ।।
प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफिलीचे गीत व्हावे सूर तुझ्या मैफिलीचे दूर दूर जावे तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने बागडावे तू नभी उंच उडावे तू बनून मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू ....