
तळोदा पालिकेची करवसूलीसाठी पालिका विविध क्लुप्ती वापरतांना दिसून येत आहे. मालमत्ता व इतर कर वसूलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवून वसूली करण्यात येत आहे. घरासमोर ढोल वाजत असल्याने मालमत्ताधारक आलेल्या पथकाकडे कराचा भरणा करीत आहे. यामुळे पालिकेच्या या क्लुप्तीमुळे वसूलीला प्रतिसाद मिळत आहे. मार्च ऐंडींगमुळे सर्वच विभागांनी वसूली मोहीम हाती घेतली आहे. सर्वाधिक मालमत्ताधारकांकडे पालिकेची कर थकीत आहे. वारंवार नोटीसा बजावून नागरीकांनी कर न भरल्याने आता विविध क्लुप्ती वापरुन वसुलीवर भर दिला जात आहे. शुक्रवारी सकाळपासून शहरातील विविध भागात ढोलचा आवाज घुमू लागला. यामुळे कोणाकडे कार्यक्रम आहे का हे पाहण्यासाठी नागरीक बाहेर येवू लागले. मात्र, ही वाजंत्री कार्यक्रमाची नसून थकबाकीदाराच्या घरापुढे वसूलीसाठी वाजविण्यात येत असल्याने एकच चर्चा सुरु झाली. पालिकेच्या या नवीन वसूलीच्या क्लुप्तीमुळे थकबाकीदार स्वताहून पैसे काढुन देत असल्याचे दिसून आले. यामुळे बर्यापैकी करवसूली झाल्याची माहिती पथकाने दिली. शहरातील अनेकांकडे विविध करांची मोठी थकबाकी आहे. वारंवार सूचना, नोटीस देऊनही कर भरण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. यामुळे कर वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर पथक ढोल वाजवून वसूलीची नामी शक्कल लढविली आहे. मुख्याधिकारी जनार्दन पवार, वसुलीप्रमुख राजेंद्र पाडवी यांच्यासह पथकातील कर्मचारी कर वसूलीसाठी प्रयतम्न करीत आहेत. १५-२0 जणांचे पथक, घरासमोर वाजणारी वाजंत्री यामुळे थकबाकीदार कर भरणा करीत आहेत. या वसुली पथकात राजेंद्र सैंदाने, विजय सोनवणो, सुनील माळी, राजेंद्र माळी, मनोज परदेशी, दिगंबर माळी, नितीन शिरसाठ, गणोश गावित, दिलीप वसावे, मोहन माळी, अश्विन परदेशी, अनिल माळी, राजेंद्र माळी याचा सामावेश आहे. शहरात ७७ थकबाकीदारांकडे एक कोटी २0 लाख कराची थकबाकी आहे. यापैकी ५0 लाखाची वसूली झाली असल्याची माहिती राजेंद्र पाडवी यांनी दिली.
शंभर टक्के वसुलीचे शासन आदेश आहेत. थकबाकीदारांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. अनेक थकबाकीदार पालिकेत येऊन थकबाकी जमा करीत आहेत. काही थकबाकीदार टाळाटाळ करीत असल्याने त्यांच्या घरासमोर ढोल-ताशे वाजवून वसूली केली जात आहे. कराची थकबाकी न भरणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. - जनार्दन पवार मुख्याधिकारी तळोदा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा