तळोदयातून 51 हजाराची मदत----
समाजशक्तीमध्ये किती ताकद असते याचा प्रत्यय वारंवार येत असतो. संघटीतपणे केलेल्या कामाचे निश्चितच चांगले फलित येत असते. याच सामाजिक कामाचा अनुभव पारोळा तालुक्यातील देवगाव येथील एका कुटुंबाने घेतला. मोठय़ा भावाचे प्राण वाचविण्यासाठी लहान भावाने गळ्यात झोळी बांधुन भिक मागीतली. समाजमन धावले यानी मृत्यूच्या दाढेतील राहुलला बाहेर आणल्याची घटना घडली. तर 'त्या' युवकाच्या बाबतीत 'देव तारी त्याला कोण मारी' याचा अनुभव त्याचा कुटुंबियांनी घेतला. याबाबत सविस्तर माहिती अशी की. पारोळा तालुक्यातील देवगांव येथील मजूर कुटुंबातील राहुल मराठे (वय १५) यास देवीचा (गौर) आजार झाला. यामुळे त्याच्या डोक्यात ताप शिरला व त्यास प्रचंड अशक्तपणा जाणवू लागला. त्यास उठताच चक्कर येवू लागल्याने त्यास उभे राहणेही शक्य होत नव्हते. त्याचे वडील नितीन मराठे यांनी त्याला तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे दाखल केले. मात्र, परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने त्यास पारोळा तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथेही परिस्थितीत सुधारणा झाली नाही, उलट आजाराला वेगवेगळे फाटे फुटू लागले. राहुलची प्रकृती दिवसेंदिवस चिंताजनक बनत होती. त्यामुळे त्याला तात्काळ धुळे जिल्हा येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. धुळे येथे राहुलवर डॉक्टरांनी प्रचंड मेहनत घेऊन प्रकृतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरत होते. राहुलचे वडील नितीन मराठे यांची अतिशय बिकट परिस्थिती. मोलमजूरी करुन कुटुंबाचा गाडा चालवित असतांना मुलगा राहुल याचा जीव वाचविण्यासाठी धडपड करीत होते. प्रयत्न करूनही पैशांअभावी ते अडले होते. डॉक्टरांनी राहुल यास अतिदक्षता विभागात ठेवावे लागेल, आमचे प्रयत्न सुरु आहेत. ७२ तासात प्रकृतीत सुधारणा झाली तर ठिक नाहीतर आमच्या हातात काही नाही, असे सांगितल्याने नितीन मराठे पूर्णता खचले. आता देवच राहूलला वाचवू शकतो, अशी भावना होवून कुटुंबीय, नातलाग, मित्र, हितचिंतकांनी देवाना साकडे घातले. पैशांचे सोंग घेता येत नाही असे आपण नेहमी म्हणतो. त्यातच अतिदक्षता विभागातील राहुलच्या उपचारासाठी दररोज हजारो रुपयांची आवश्यकता. त्यामुळे मृत्यूशी झुंज देणार्या मुलाचे प्राण कसे वाचतील या विवंचनेत मराठे कुटुंब होते. पैशांची जुळवाजुळव करूनही आवश्यक पैसा उपलब्ध होत नव्हता. नातलगांकडे हात पुढे केले, जवळच्यांनी काही प्रमाणात साथ दिली. शेवटी लहान मुलगा रोहित याच्या गळ्यात झोळी बांधून नितीन मराठे यांनी मुलाच्या उपचारासाठी दान मागण्याचा निर्णय घेतला. आपल्या मोठा भाऊचे प्राण वाचावेत यासाठी रोहितने गळ्यात झोळी घेवून परिसरातील देवगाव, तामसवाडी, मुंदाने, पिंपरी, उंदीरखेडा, शेवंगे, हनमंतखेडे, शिवरे आदी आसपासचे खेड्यापाड्यातून झोळी पुढे करत भीक मागितली. मोठय़ा भावाचे प्राण वाचविण्यासाठी अनवानी झोळी घेवून फिरणार्या रोहितला पाहून अनेकांचे मन हेलावले. त्याला अनेकांनी आपापल्या परीने मदत दिली. तसेच नितीन मराठे यांचे तळोदा येथील काका शांताराम मराठे यांचे दोन्ही मुले योगेश मराठे व सुधाकर मराठे यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने नितीन मराठे यांना मदतीचा हात दिला. राहुलच्या उपचारासाठी आवश्यक पैसा जमा झाला. देवाची कृपा, डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न आणि माणुसकीच्या सामाजिक बांधलकीतून राहुलवर उपचार होवू लागल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. आठ दिवस अतिदक्षता विभागात अखेरच्या घटका मोजणारा राहुल मृत्युच्या दाढेतून परत आला. शेवटी देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय राहुलबाबत आला. राहूलला जीवदान देण्यात धुळे रुग्णालयात डॉ.जगदिश पाखरे, डॉ.जयवंत देवरे, डॉ.विलास वाडीवाले, सचिन ढोले, डॉ.सुनिल पगारे, डॉ.राजेश शहा, डॉ.महेश अहिरराव, डॉ.योगेश साळुंखे, डॉ.संदिप जोशी यांच्यासह नितीन मराठेंचे बंधू ज्ञानेश्वर मराठे, काका राजाराम मराठे, आनंदा मराठे, छगन मराठे, देविदास मराठे, जगदिश रगडे यांनी दरम्यानच्या काळात प्रचंड मेहनत घेतली. या सर्वांच्या मेहनतीनेच राहुल पुन्हा जग पाहात असल्याची भावना त्याचे वडील नितीन मराठेंनी 'पुण्यनगरी'शी बोलतांना व्यक्त केली....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा