Breking News

रविवार, २ एप्रिल, २०१७

माझ्या बातम्या नंतर सलग चौथ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल.

तळोद्यात चौथ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल....

 पथकाची कारवाई सुरुच : अनेकांनी गुंडाळला गाशा!

 शासनातर्फे राबविण्यात येत असलेली बोगस डॉक्टर शोध मोहीमेने तालुक्यात चांगलाच जोर धरल्याने बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे. एकट्या तळोदा तालुक्यात डॉ.रेखा शिंदे व यांच्या पथकाने राबविलेल्या कारवाईत आतापर्यंत चार डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी पथकाने तळोदा शहरातील एका रुग्णालयात तपासणी करुन सदर डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शासनाच्या आदेशान्वये जिल्हाभरात बोगस डॉक्टर शोध मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी नियुक्त पथक शहरांसह दुर्गम भागात धाड टाकून तपासणी करीत आहेत. दरम्यान, कारवाईच्या भितीने अनेक बोगस डॉक्टरांनी आपला गाशा गुंडाळत पलायन केले आहे. मोहीम सुरु झाल्यापासून आतापर्यंत तळोदा तालुक्यात चार डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. काल शुक्रवारी पथक प्रमुख डॉ.रेखा शिंदे यांच्या पथकाने तळोदा शहरातील सिटी मार्केट समोरील डॉ. प्रितेश डी.चौधरी यांच्या कुबेर बालरोग व जनरल हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी पथकाने डॉ.चौधरी यांच्याकडे पदवी प्रमाणपत्राची मागणी केली. डॉ.चौधरी यांच्याकडील कागदपत्रांची व औषधांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत डॉ.चौधरी यांच्याकडे महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमीओपॅथी या पदवीचे प्रमाणपत्र आढळून आले. तसेच अँलोपॅथी औषधी वापरण्याची परवानगी नसतानाही रुगालयात अँलोपॅथी औषधी, प्रिस्क्रिप्शन व लॅब लेटर आढळून आले. तसेच संबंधित डॉक्टराची पदवी बीएचएमएस असताना अँलोपॅथीचे औषधी बाळगण्याबाबत व रुग्णांना देत असल्याचे आढळून आले. तसेच क्लिनिक चालवण्यासाठी तळोदा नगर पालिकेच्या नाहरकत दाखला, इंडियन मेडिकल कोन्सिलचा परवाना, महाराष्ट्र मेडिकल प्रक्टिशनर अँक्ट १९६१ नुसारचा परवाना मिळून न आल्याने त्यांच्यावर पथक प्रमुख रेखा शिंदे यांच्या फिर्यादीवरुन इंडीयन मेडीकल कौन्सिल अँक्ट १९५६ चे कलम १५/२, इंडियन मेडीकल कौन्सिल अँक्ट १९५६ चे १५ (२) तसेच महाराष्ट्र मेडीकल पॅ्रक्टिशनर अँक्ट १९६१ चे कलम ३३ (२) भादंवि कलम ४१९, ४२0, १७५, १७९ नुसार तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आहे. डॉ.प्रितेश चौधरी यांच्याकडे भरारी पथकाने धाड टाकल्याची माहिती गावात पसरताच इतर बोगस डॉक्टरांनी आपला गाशा गुंडाळत दवाखाने बंद करुन पलायन केले. बोगस डॉक्टर शोध मोहीमेतंर्गत तळोदा पथकातील तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रेखा शिंदे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.संजय पटेल, नायब तहसिलदार मंगला पावरा, पो.कॉ.प्रवीण अहिरे, औषध निर्माता गौतम वळवी यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाई सत्राने तळोदा तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा