Breking News

शनिवार, १ एप्रिल, २०१७

बातमी नंतर त्या डॉक्टरावर गुन्हा दखल.....

अखेर 'त्या' डॉक्टरवर तळोद्यात गुन्हा दाखल

बोगस डॉक्टर शोध मोहीमेंतर्गत आलेल्या पथकासोबत हुज्जत घालुन एका मंत्र्यांशी दुरध्वनीवरुन संवाद साधुन पथकासोबत दबंगगीरी करणार्‍या 'त्या' डॉक्टर विरोधात अखेर तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी चक्क पथकाला आव्हान दिल्याने या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची हिंमत न झाल्याने पथकाला खाली हात परतावे लागले होते. याबाबत दै.'पुण्यनगरी' ने घटलेल्या प्रकाराबाबत वृतांकन करुन सदर प्रकार जनतेसमोर उजेडात आणला होता. दरम्यान काल गुरुवारी वरिष्ठांच्या आदेशावरुन पथकप्रमुख डॉ.रेखा शिंदे यांच्या फिर्यादीवरून संबंधित डॉक्टरावर तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत ठिकठिकाणाहून बोगस डॉक्टर आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी तालुक्यातील बोरद गावात पथकाने भेट देवून तपासणी मोहीम राबविली. गावातील एका खाजगी दवाखान्यास पथकाने भेट देऊन संबंधित डॉक्टराकडून वैद्यकीय पदवी प्रमाणपत्राची मागणी केली होती. यावेळी डॉक्टराकडे बीईएमएसची एलक्ट्रोपॅथीची पदवी प्रमाणपत्र असताना संबंधित डॉक्टर अलोपॅथिक व्यवसाय करीत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले होते. तसेच दवाखान्यात प्रतिजैविक सलाईन, इंजेक्शन आदींसह अलोपॅथीची औषधी आढळून आल्याने सदर औषधी बाळगणो व रुग्णांवर उपचार करणो कायदेशीर गुन्हा असल्याचे सांगत याबाबत विचारणा करून संबधित डॉक्टरला तंबी दिली होती. मात्र, संबंधित डॉक्टरने यावेळी आलेल्या पथकासोबत चांगलीच हुज्जत घातली होती. माझ्यावर गुन्हे दाखल करुन दाखवावेत, संबंधीताच्या सर्व कुंडल्या मी उघडून त्यांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही! असे आव्हान पथकाला गावकर्‍यांसमोर दिले होते. अनेकवेळा बोरद रुग्णालयात रात्री-बेरात्री गरोदर मातेचे बाळंतपण करण्यास मला या पथकातीलच एका अधिकार्‍याने बोलविले आहे, त्यावेळी माझी पदवी नाही पाहीली का? असा प्रती सवाल देखील आलेल्या पथकाला विचारत वाद घातला तसेच बोरद गावातील रुगणालाय निष्क्रिय असल्याचा आरोपासह विविध आरोप यावेळी डॉक्टरने केले होते. एवढय़ावर न थांबता या महाशयाने एका केंद्रीय मंत्र्यांना फोन करुन संबंधीत पथक हे मला त्रास देत असल्याची माहिती दिल्याचे पथकाने काढता पाय घेतला होता. मात्र घडलेल्या प्रकाराबाबत दै.'पुण्यनगरी' गुरुवारच्या अंकात वृत्त प्रकाशीत करण्यात आल्याने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटल्या. तर पथकाबाबतही सांशक वातावरण निर्माण झाले होते. पथकातील अधिकार्‍यांनी घडलेल्या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ क्लशेट्टी यांना माहिती दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकृष्ण पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भोये आदींच्या आदेशांव्ये काल पथक प्रमुख डॉ.रेखा विठ्ठल शिंदे यांच्या फिर्यादीवरून डॉ.अनिल धनगर यांच्यावर तळोदा पोलीस ठाण्यात गुरन ६१/ २0१७ भादवी कलम ३५३, ४१९, ४२0, १७५, १७९ इंडियन मेडिकल कौन्सिल अँक्ट १९५६ चे कलम १५ (२) महाराष्ट्र मेडिकल प्रक्टिशन अँक्ट १९६१ चे कलम ९३ (२) प्रमाणो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई डॉ.रेखा शिंदे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय पटले, नायब तहसीलदार मंगला पावरा, असई जेरमा पावरा, औषध निर्माता गौतम वळवी यांच्या पथकाने केली. मोड येथील डॉक्टरवर कारवाई..

                           मोड येथील डॉक्टरावर ही गुन्हा दाखल.... 

तळोदा तालुक्यातील मोड येथील बसस्थानक जवळील मातोश्री क्लिनिकचे डॉ.नंदकिशोर चौधरी यांच्याकडे वैद्यकीय पदवीचे प्रमाणपत्र न आढळ्याने तसेच अलोपेथची परवानगी नसतांना त्यांचाकडे सदर ओषधी आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील मोड येथे गुरुवारी बोगस डॉक्टर शोध मोहीम पथकाने भेट देवून तपासणी केली. यावेळी पथकाने डॉ.नंदकिशोर चौधरी यांच्या मातोश्री क्लिनिक यांच्या दवाखान्याला भेट देवून तपासणी केली. डॉ.नंदकिशोर चौधरी यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली असता त्यांच्याकडे बीएचएमएस ही पदवी आढळून आली. सदर पदवी ही महाराष्र्ट् प्रॅक्टिशन अँक्ट १९६१ आणि इंडियन मेडिकल कौन्सिल अँक्ट १९५६ शेड्यूल मध्ये नमूद नसतांना त्यांच्याकडे अँलोपॅथी औषधी आढळून आली. याबाबत पथक प्रमुख तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रेखा शिंदे, नायब तहसीलदार मंगला पावरा, वैद्यकीय अधिकारी संजय पटले यांच्या पथकाने कारवाई करीत त्यांच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा